पितृपक्षामुळे सुक्यामेव्याला मागणी, भाजीपाला विक्रेत्यांनाही ‘अच्छे दिन’

सध्या पितृपंधरवाडा हा सुरु झाला आहे. त्यामुळे सुकामेव्याची मागणी वाढली आहे तर भाजीपालाही भाव खात असल्याचे चित्र आहे. निमित्त कोणते का असेना शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचा उठाव झाला असून समाधानकारक दर मिळत आहेत. शेतकऱ्यांपेक्षा घरोघरी जाऊन भाजीपाल्याची विक्री करणाऱ्यांना अधिकचा फायदा होत आहे. तर परराज्यातून दाखल होणाऱ्या सुकामेव्याचीही मागणी ही वाढलेली आहे.

पितृपक्षामुळे सुक्यामेव्याला मागणी, भाजीपाला विक्रेत्यांनाही 'अच्छे दिन'
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 12:09 PM

लातूर : खरीपातील मुख्य पिकांचे दर हे कमी होत असले तरी भाजीपाल्याच्या माध्यमातून का होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. सध्या पितृपंधरवाडा हा सुरु झाला आहे. त्यामुळे सुकामेव्याची मागणी वाढली आहे तर भाजीपालाही भाव खात असल्याचे चित्र आहे. निमित्त कोणते का असेना शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचा उठाव झाला असून समाधानकारक दर मिळत आहेत. शेतकऱ्यांपेक्षा घरोघरी जाऊन भाजीपाल्याची विक्री करणाऱ्यांना अधिकचा फायदा होत आहे. तर परराज्यातून दाखल होणाऱ्या सुकामेव्याचीही मागणी ही वाढलेली आहे.

भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून पितृपंधरवाड्याला सुरवात झाली आहे. तिथीनुसार घरोघरी हा पितृपक्ष केला जातो. यावेळी भेंडी, कारले, दोडके, काकडी आणि पालक भाज्यांची मोठी मागणी असते. सध्या पावसामुळे भाज्यांची आवक ही कमी झाली आहे. शिवाय पावसामुळे भाजीपाल्यांची काढणी कामेही रखडलेली आहेत. याचा परिणाम हा दरावर होत असून ज्या शेतकऱ्यांचा भाजीपाला बाजारात दाखल झाला आहे. त्याला योग्य दरही मिळत आहे.

किरकोळ बाजारात कारले 40 रुपये, शेवगा 60 रुपये, गवार 80 रुपये किलो, वांगी दोडका ही 60 रुपये किलोप्रमाणे विकले जात आहे. तर मसाल्याचे पदार्थ तसेच काजू, बदाम, पिस्ता या सुकामेव्यालाही मागणी वाढलेली आहे. पितृपक्षानंतर लगेच इतर सणाला सुरवात होणार असल्याने हेच दर नवरात्र पर्यंत टीकून राहतील असा अंदाज व्यक्त होत आहे.

बाजारात काजू 750 ते 1150 किलो तर पिस्ता 1850 ते 1900, बदाम 700 ते 750 आणि चारोळे 1200 रुपयेपर्यंत किलोप्रमाणे मिळत आहेत. बाजारात मागणी वाढल्याने इतर वेळच्या दरापेक्षा अधिकचे पैसे ग्राहकांना मोजावे लागत आहेत.

आवक घटली अन् मागणी वाढली

सध्या मराठवाड्यात पावसाचे प्रमाण हे वाढलेले आहे. त्यामुळे भाजीपाल्याची काढणीची कामे ही रखडलेली आहेत. पण ज्या भाज्यांची आवक होत आहे त्याला समाधानकारक दर मिळत आहे. पितृपक्षात लागणाऱ्या भाज्या वगळता सिमला मिरची, फ्लावर याचेही दर वाढत आहेत. आता सणासुदीमुळे भाज्यांचे दर चढेच राहतील असा अंदाज व्यक्त होत आहे.

ठोक बाजारापेक्षा किरकोळ बाजारातील विक्रत्यांची चांदी

ठोक बाजारात भाजीपाल्यांना माफक दर मिळत असला तरी किरकोळ बाजारात विक्री करणाऱ्यांना अधिकचा फायदा होत आहे. शेतकरी हे ठोक बाजारातच मालाची विक्री करतात. पण अनेकजण हे घरोघरी जाऊन भाजीपाल्याची विक्री करीत असल्याने त्यांना अधिकचा फायदा होत आहे.

आगामी काळातही सुक्यामेव्याला चढे दर

साधारण: ता नवरात्र महोत्सवात सुक्यामेव्याला मागणी असते. पण यावर्षी पितृपक्ष आणि त्याला लागूनच नवरात्र महोत्सव व दिवाळी हे सण आले आहेत. या सणामध्ये सुक्यामेव्याला मागणी ही राहतेच त्यामुळे दर हे वधरणारच आहेत. कोरोनाच्या काळात परराज्यातील आवकही बंद होती पण आता काश्मीमधून आक्रोड पीकाची आवक सुरु झाली आहे. (Festival swells vegetable prices, demand for dry fruits also increases, farmers get relief)

संबंधित बातम्या :

आघाडी सरकारची शिफारस शेतकऱ्यांसाठी घातक : डॉ. अनिल बोंडे ; एफ.आर.पी. रकमेवरून राजकारण

प्रधानमंत्री ‘कुसुम’ योजना : सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना उत्पन्नाचीही संधी

व्यथा शेतकऱ्याची : दोन एकरामध्ये दीड लाखाचा खर्च अन् पपईला दर 4 रुपये किलो

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.