शेतकऱ्यांसाठी महत्वाचे: अखेर शेतकरी अपघात विम्याचा मार्ग मोकळा, काय आहे प्रक्रिया? वाचा सविस्तर

मध्यंतरी काही दिवस शेतकरी अपघात विमा योजनेची प्रक्रिया ही खंडीत होती. त्या दरम्यान नुकसानभरपाईसाठी दावे तर दाखल करण्यात आले होते. पण प्रत्यक्ष मदत ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नव्हती. मात्र, दाखल झालेल्या दाव्यांपोटी मदत लवकरच संबंधितांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. त्यामुळे 1 हजार 168 अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या तर 17 अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ होणार आहे. विम्याच्या रकमा बॅंक खात्यामध्ये त्वरीत जमा करण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत.

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे: अखेर शेतकरी अपघात विम्याचा मार्ग मोकळा, काय आहे प्रक्रिया? वाचा सविस्तर
पिकविमा योजने
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 11:57 AM

लातूर : मध्यंतरी काही दिवस (Farmer Accident Insurance) शेतकरी अपघात विमा योजनेची प्रक्रिया ही खंडीत होती. त्या दरम्यान नुकसानभरपाईसाठी दावे तर दाखल करण्यात आले होते. पण प्रत्यक्ष मदत ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नव्हती. मात्र, दाखल झालेल्या दाव्यांपोटी मदत लवकरच संबंधितांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. त्यामुळे 1 हजार 168 अपघातामध्ये (Farmer Death) मृत्यूमुखी पडलेल्या तर 17 अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ होणार आहे. विम्याच्या रकमा बॅंक खात्यामध्ये त्वरीत जमा करण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवासांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकरी कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. (Commissionerate of Agriculture) कृषी आयुक्तालयाने खंडीत कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या शिफारशी राज्य सरकारकडे पाठविल्याने याला मंजूरी मिळाली असून विम्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

कशामुळे झाली होती योजना खंडीत?

1 डिसेंबर 2016 पासून स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना ही राबवली जात आहे. शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आले तर मदत रक्कम ही दिली जाते. डिसेंबर 2020 ते 7 एप्रिल या दरम्यानच्या कालावधीत योजनेचा करार संपल्याने ही योजना बंद होती. दुसरीकडे शेतकऱ्यांचे दावे स्वीकारले जात होते पण प्रत्यक्ष मदत ही मिळत नव्हती. शेतकऱ्यांच्या दाव्यांना प्रशासकीय मंजूरी नव्हती. मात्र, आता नव्याने करार झाल्याने विम्याचा मार्ग खुला झाला आहे.

असे आहे मदतीचे स्वरुप

ज्या काळात योजना ही खंडीत होती त्या दरम्यान, 1 हजार 168 शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू तर 17 शेतकऱ्यांना अपंगत्व आल्याचे दावे कृषी विभागाकडे दाखल झाले आहेत. अपघातामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर 2 लाख आणि अपंगत्व आले तर 1 लाख असे स्वरुप आहे. त्यानुसार आता 23 कोटी 36 लाख अपघाती मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणार आहेत. तर अपघातामुळे ज्यांना अपगंत्व आले आहे अशा शेतकऱ्यांना 17 लाख रुपये मिळणार आहेत.

अपघात विमा मिळण्याची प्रक्रिया

अपघात झाल्यास पोलिस पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट, सातबारा, आठ ‘अ’, 6 क, 6 ड, मृत्यृ प्रमाणपत्र, ज्यांचा अपघात झाला आहे त्या शेतकऱ्याचे वारसा प्रमाणपत्र, वारसा अर्जदार इत्यादी कागदपत्रे ही कृषी विभागात जमा करावी लागतात. कृषी विभाग नियुक्त केलेल्या विमा कंपनीकडे या कागदपत्रांची पूर्तता करतात. त्यानंतर योग्य ती चौकशी होऊन संबंधित शेतकऱ्यास किंवा शेतकरी कुटुंबास विमा रक्कम ही अदा केली जाते.

संबंधित बातम्या :

Nanded : अतिवृष्टीचा असा हा परिणाम, खरिपात नुकसान तर रब्बी हंगामात कायापालट

उत्तर महाराष्ट्र, कोकणनंतर आता नंबर कुणाचा? ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

Photo Gallery : निसर्गाचे धुमशान, लाल-केशरी रंगांची उधळण, उन्हाळ्याच्या चाहुलीनं पळसाला बहार

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.