Video : शॉर्टसर्किटमुळे शेतीमालाची होळी, डोळ्यासमोरच स्वप्नांचा चुराडा झाल्याने शेतकऱ्याचा टाहो

साठवणूक करुन ठेवलेल्या सोयाबीन आणि कापसाला अधिकचा दर मिळत आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात तर कापसाला विक्रमी असा 11 हजार 500 रुपये दर मिळत आहे. असाच दर आपल्या शेतीमालाला मिळावा म्हणून केज तालुक्यातील पन्हाळवाडी येथील शेतकरी दादाराव जोगदंड यांनी शेतीमालाची साठवणूक केली होती. गेल्या पाच महिन्यांपासून त्यांनी रात्रीचा दिवस करुन सोयाबीन आणि कापसाचे संरक्षण केले होते.

Video : शॉर्टसर्किटमुळे शेतीमालाची होळी, डोळ्यासमोरच स्वप्नांचा चुराडा झाल्याने शेतकऱ्याचा टाहो
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागल्याने शेतीमालासह संसारउपयोगी साहित्याचे नुकसानImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 1:07 PM

बीड : साठवणूक करुन ठेवलेल्या ( Agricultural commodities) सोयाबीन आणि कापसाला अधिकचा दर मिळत आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात तर (Cotton Rate) कापसाला विक्रमी असा 11 हजार 500 रुपये दर मिळत आहे. असाच दर आपल्या शेतीमालाला मिळावा म्हणून (Keij) केज तालुक्यातील पन्हाळवाडी येथील शेतकरी दादाराव जोगदंड यांनी शेतीमालाची साठवणूक केली होती. गेल्या पाच महिन्यांपासून त्यांनी रात्रीचा दिवस करुन सोयाबीन आणि कापसाचे संरक्षण केले होते. शिवाय या दोन्ही शेतीमालाला सध्या विक्रमी दर सुरु आहेत. दादारावही शेतीमाल विक्रीच्या तयारीतच होते पण महावितरणने त्यांना असा काय शॉक दिला आहे की, अवघ्या काही क्षणात त्यांच्या स्वप्नांचा चकणाचूर झाला आहे. शॉर्टसर्किटमुळे घडलेल्या दुर्घटनेत शेडमध्ये साठवलेल्या शेतीमालाचे तर नुकसान झालेच पण संसारुपयोगी साहित्याचीही होळी झाली आहे. हे सर्व डोळ्यासमोरच होत असल्याने दादाराव यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.

वाढीव दरासाठी शेतीमालाची साठवणूक

खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापसाला सध्या विक्रमी दर मिळत आहे. यंदा उत्पादनात घट झाली होती किमान वाढीव दराने झालेला खर्च तरी पदरी पडेल या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापसाची विक्री न करता साठवणूकीवर भर दिला होता. हाच प्रयत्न पन्हाळवाडी येथील शेतकरी दादाराव जोगदंड यांचा देखील होता. सोयाबीन, कापसाची काढणी होताच त्यांनी शेतातील शेडमध्ये सोयाबीन, कापूस, हरभऱ्याची साठवणूक केली होती. त्यांना वाढीव दराची प्रतिक्षा होती. मात्र, दुर्घटनेमुळे सर्वकाही मातीमोल झाले आहे. शेतीमालासह त्यांच्या संसारउपयोगी साहित्याची देखील होळी झाली आहे.

ग्रामस्थांचे शर्थीचे प्रयत्न दादारावांचा टाहो

शेतामधील पत्र्याच्या शेडला लागलेली आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र, ऊन आणि वाऱ्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले होते. अवघ्या काही वेळेमध्ये होत्याचे नव्हते झाले होते. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार शेतकरी दादाराव यांच्यासमोरच घडल्याने वर्षभर केलेली मेहनत, साठवणूकीचा उद्देश सर्वकाही आगीत भस्मसात झाले होते. हे सर्व पाहून त्यांना अश्रू अनावर झाले होते.

संबंधित बातम्या :

Turmeric Crop: अवकाळी, अतिवृष्टीनंतरही हळदीचा रंग अधिकच गडदच, कृषितज्ञांचेही अंदाज फोल ठरले

Chickpea Crop : हरभऱ्याला हमीभावाचा आधार, हंगामाच्या मध्यावर आवक वाढली

Photo Gallery | वृक्षवेलींची हिरवी माया अन् पिवळ्या फुलांचा शालू, रखखत्या उन्हाळ्यात भुरळ घालणारं ‘वनराई’तलं घर पाहिलंय?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.