Sugarcane: अगोदर अतिरिक्त ऊसाचा अहवाल मग तोडणीचे नियोजन, नगदी पिकातून शेतकऱ्याचे नुकसान
यंदाचा ऊसगाळप हंगाम मध्यावर आल्यापासून अतिरिक्त ऊसाचा प्रश्न समोर आला आहे. आता हंगाम काही दिवसावर येऊन ठेपला आहे. असे असतानाही याबाबत ठोस निर्णय प्रशासनाने घेतलेला नाही. पश्चिम महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांनी परतीची वाट धरली आहे. आतापर्यंत अतिरिक्त ऊसाला घेऊन एक ना अनेक पर्याय सुचवण्यात आले होते. परंतू, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांची समस्या तर कायम आहे. पण आता या ऊसाची तोड होणार की शेतकऱ्यांनाच होळी करावी लागणार हा प्रश्न आहे.
औरंगाबाद : यंदाचा (Sugarcane Sludge) ऊसगाळप हंगाम मध्यावर आल्यापासून (Excess Sugarcane) अतिरिक्त ऊसाचा प्रश्न समोर आला आहे. आता हंगाम काही दिवसावर येऊन ठेपला आहे. असे असतानाही याबाबत ठोस निर्णय प्रशासनाने घेतलेला नाही. पश्चिम (Maharashtra) महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांनी परतीची वाट धरली आहे. आतापर्यंत अतिरिक्त ऊसाला घेऊन एक ना अनेक पर्याय सुचवण्यात आले होते. परंतू, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांची समस्या तर कायम आहे. पण आता या ऊसाची तोड होणार की शेतकऱ्यांनाच होळी करावी लागणार हा प्रश्न आहे. प्रशासनाच्या नियोजनानंतर आता अतिरिक्त ऊस किती क्षेत्रावर आहे याचा आढावा किसान सभेच्या माध्यमातून घेतला जात आहे. पहिल्या टप्प्यात बीड जिल्ह्यातील नोंदी घेण्यास सुरवात झाली आहे. प्रशासन आणि शेतकरी संघटनांमध्ये अतिरिक्त ऊसाला घेऊन विविध अंगाने चर्चा होत असली तरी शेतकऱ्यांचा जीव हा टांगणीलाच लागलेला आहे. असे असले तरी यंदा मराठवाड्यात 2 कोटी 45 लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे.
आतापर्यंत अतिरिक्त ऊसाबाबत झालेले निर्णय
हंगामाच्या मध्यापासूनच अतिरिक्त ऊसाचा प्रश्न समोर येऊ लागला होता. तेव्हापासून वेगवेगळ्या उपाययोजना सुचवण्यात आल्या मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत आहे. यापूर्वी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत साखर कारखाने बंद होणार नसल्याचे सांगितले. एवढेच नाही तर साखर कारखान्यांना त्याअनुशंगाने पत्र ही देण्यात आले होते. यानंतर कारखान्यांनी आपल्या क्षेत्राचा विचार न करता ऊसतोडीवर भर देण्याचे आदेश देण्यात आले होते. शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाचे गाळप अंतिम टप्प्यात असल्याने या भागातील कारखान्यांकडून मराठवाड्यातील ऊसाचा प्रश्न मार्गी लावावा असा मधला मार्ग आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सुचवला होता. त्यानुसार ही जबाबदारी 35 साखर कारखान्यांवर सोपवण्यात आली होती. असे एक ना अनेक पर्याय समोर आले पण प्रत्यक्षात अंमलबजावणीच झालेली नाही. त्यामुळे अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे.
किसान सभेची रणनिती काय?
किसान सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जातात. यापूर्वी बीड जिल्ह्यातील पीकविम्याचा प्रश्न या संघटनेने हाती घेतला होता. त्यानुसारच अतिरिक्त ऊसाचा ज्वलंत प्रश्न असल्याने याबाबत नियोजन केले जात आहे. त्याअनुशंगाने अगोदर जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाचे क्षेत्र किती याचा अहवाल तयार केला जात आहे. मराठवाड्यातच अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा वाढत आहे. या अहवालानंतर साखर आयुक्त यांच्या माध्यमातून हा ऊसाचा प्रश्न मार्गी लावणार जाणार आहे.
मराठवाड्यात यंदा विक्रमी गाळप
एकीकडे अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम असला तरी याच विभागाच विक्रमी ऊसाचे गाळप झाले आहे. 27 मार्चअखेर 2 कोटी 45 टन ऊसाचे गाळप झाले होते. यामध्ये 59 साखर कारखान्यांनी सहभाग नोंदवला होता. आतापर्यंत 2 कोटी 46 लाख 52 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा साखर उत्पादकतेच्या अनुशंगाने सर्वकाही पोषक असले तरी वाढलेल्या ऊसाच्या क्षेत्रामुळे हंगाम संपला तरी हा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागतो की नाही अशीच मराठवाड्यातील अवस्था आहे.
संबंधित बातम्या :
चाळीसगाव बाजार समिती उभारणार शेतकऱ्यांच्या हिताची गुढी, निर्णय छोटाच पण शेतकऱ्यांसाठी महत्वाचा
Banana : अवकाळीतून सुटका आता वाढत्या ऊन्हाच्या झळा, केळी उत्पादकांसाठी ‘बुरे दिन’
Sugarcane : वर्षभर जोपासलेला ऊस शेतकऱ्यानेच पेटवला..! काडी लावताच फडात कारखान्याची गाडी