सण-सुदीमुळे फुलांचा बाजार ‘फुलला’, व्यापाऱ्यांमध्ये नवचैतन्य

पोळ्यानंतर वातावरण हे बदलले आहे. गणेश उत्सव, महालक्ष्मींच्या आगमण या सणामध्ये बाजारात फुलांची आवक वाढूनही दर हे वाढलेलेच आहेत. साधारण: कोणत्याही मालाची आवक वाढली तर दर हे कमी होतात. मात्र, फुलांची मागणी तर वाढलेली आहेच शिवाच फुलांपासून बनवलेले हारही भाव खात आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

सण-सुदीमुळे फुलांचा बाजार 'फुलला', व्यापाऱ्यांमध्ये नवचैतन्य
फुलांचे संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 1:27 PM

मुंबई : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून सणामध्ये देखील बाजारपेठेत कमालीचा शुकशुकाट पाहवयास मिळत होता. मात्र, पोळ्यानंतर वातावरण हे बदलले आहे. गणेश उत्सव, महालक्ष्मींच्या आगमण या सणामध्ये बाजारात फुलांची आवक वाढूनही दर हे वाढलेलेच आहेत. साधारण: कोणत्याही मालाची आवक वाढली तर दर हे कमी होतात. मात्र, फुलांची मागणी तर वाढलेली आहेच शिवाच फुलांपासून बनवलेले हारही भाव खात आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. कोरानाची दुसरी लाट ही ओसरली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत का होईना बाजारपेठेत नवचैतन्य निर्माण होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता.

गणरायाचे आगमन आणि महालक्ष्मी सणामुळे फुलांचा बाजार चांगलाच फुलल्याचे चित्र आहे. विशेष: चंद्रपूर जिल्ह्यात फुलांचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. गेल्या चार दिवसांपासून येथील बाजारपेठेत झेंडू, मोगरा आणि गुलाबच्या फुलाची आवक ही वाढलेली आहे. या दरम्यान, झेंडूची फुले 150 ते 200 रुपये किलो, गुलाबाची फुले ही 600 ते 800 रुपये तर शेवंतीच्या फुलाला 300 ते 400 रुपये किलोप्रमाणे दर मिळाला आहे. हे फुलांचे दर असून यापेक्षा अधिकचा दर फुलापासून बनवलेल्या हारांना मिळत आहे. गणेश चतुर्थी दिवशी तर एक गुलाबाचे फुल हे 10 ते 20 रुपयेप्रमाणे विकले जात होते.

सणामध्ये हार आणि फुलांना वेगळे असे महत्व आहे. त्यामुळे या दोन्ही बाबींचा वापर हा होतोच. सणासुदीत बाजार पेठेत तर वर्दळ सुरू झाली आहे. बाप्पांच्या आशिर्वादाने आणि लक्ष्मींच्या आगमनामुळे बाजारातील चित्र बदलत असल्याने व्यापाऱ्यांमध्येही चैतन्य निर्माण झाले आहे.

नुकसान भरपाईची व्यापाऱ्यांना आशा

कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बाजार हा फुललेलाच नव्हता. काही दिवसांपासून कोरोनाचे निर्बंध हे शिथील करण्यात आले आहेत. यातच सण उत्सवाचे दिवस सुरु झाल्याने बाजारात ग्राहकांची गर्दी होत आहे. विशेष: फुलांची मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. याचा शेतकरी आणि व्यापाऱ्यांना देखील फायदा होणार असल्याचे अतिख शेख यांनी सांगितले.

फुलांचे उत्पादन घेणारी ही आहेत प्रमुख राज्य

देशामध्ये तब्बल 65 हजार हेक्टरहून अधिकच्या क्षेत्रावर फुलाचे उत्पादन हे घेतले जाते. यामध्ये प्रामुख्याने कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि हरियाना या राज्यांचा समावेश आहे. देशात कर्नाटकामध्ये सर्वात जास्त फुलाचे उत्पादन घेतले जाते.

गजऱ्याच्या दरातही वाढ

एकीकडे फुलाचे दर तर वाढतच आहेत. पण फुलापासून बनवलले हार आणि गजरे यांनाही चांगला दर मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मोगरा फुलांचा गजरा हा 15 रुपयांना मिळत होता तोच आता 20 रुपयांवर गेला आहे. त्यामुळे कामगारांच्या हातालाही काम मिळाले आहे. (Flower prices rise during festival, satisfaction among traders)

संबंधित इतर बातम्या :

सौर पंप मिळवायचाय, कुसुम योजनेसाठी अर्ज करण्याचं आवाहन, अर्ज कुठं करायचा वाचा सविस्तर

मातीमोलः नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला किलोमागे फक्त 1 रुपयाचा भाव

यंदाच्या नुकसान भरपाईचं सोडाच, दोन वर्षापासून आठशे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.