अन्नत्याग आंदोलनाचा समारोप, शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात संघर्ष सुरुच राहणार : आ. पाटील

लातूर येथे गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू होते. 72 तासाच्या अन्नत्याग आंदोलनाचे लोण महाराष्ट्रात पोहचेले होते. शिवाय या आंदोलनात शेतकऱ्यांचाही सहभाग वाढत होता. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत म्हणजे शेतकर्‍यांच्या तोंडाला पाणे पुसण्याचे काम आहे. जोपर्यंत शेतकर्‍यांना योग्य न्याय मिळणार नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा इशारा माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला आहे.

अन्नत्याग आंदोलनाचा समारोप, शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात संघर्ष सुरुच राहणार : आ. पाटील
लातूर येथे सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा समारोप
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 2:30 PM

लातूर : मराठवाड्यातील (Marathwada) शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची सरसकट भरपाई मिळावी याकरिता लातूर (Latur) येथे गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू होते. 72 तासाच्या अन्नत्याग आंदोलनाचे लोण महाराष्ट्रात पोहचेले होते. शिवाय या आंदोलनात शेतकऱ्यांचाही सहभाग (Participation of Farmers) वाढत होता. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत म्हणजे शेतकर्‍यांच्या तोंडाला पाणे पुसण्याचे काम आहे. जोपर्यंत शेतकर्‍यांना योग्य न्याय मिळणार नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा इशारा माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला आहे.

लातूर येथील शिवाजी चौकात जिल्ह्यातील 127 शेतकर्‍यांना सोबत घेवून आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी 72 तासाचे अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. नुकसानभरपाईच्या अनुशंगाने सुरु करण्यात आलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. केवळ बारामतीचा विकास करत आपण महाराष्ट्राचा विकास केला आहे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण खंबीर आहोत असे सांगणार्‍या या जाणत्या राजाच्या सरकारने आता जी मदत घोषीत केली आहे ती मदत आम्हा शेतकर्‍यांना मान्य नसून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तर मराठवाडा महाराष्ट्रात आहे की नाही असेच वाटू लागलेले आहे.

कदाचितही मराठवाडा हा महाराष्ट्राचा भाग आहे याचा विसर पडला असावा असा प्रश्‍न उपस्थित केला. शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपयांची मदत द्यावी अशी मागणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यानीच आता एकरी चार हजार रूपयांची मदत घोषीत करून शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोपही यावेळी आ. संभाजी पाटील यांनी केला.

14 शेतकऱ्यांची प्रकृती खालावली होती

अन्नत्याग आंदोलनात सहभागी झालेल्या 127 शेतकर्‍यांपैकी 14 शेतकर्‍यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंदोलनाची सांगता जिल्ह्यातील वयोवृध्द शेतकर्‍यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत लिंबूपाणी देवून करण्यात आली. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जिल्ह्यातील शंभर पेक्षा अधिक सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आणि आपल्या समर्थनाचे पत्र दिले. मात्र, हे आंदोलन एक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचे व्यासपीठ होते. आंदोलनाचा समारोप झाला असला तरी शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्याविरोधात लढा हा सुरुच असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले आहे.

लातूरच्या पालकमंत्र्यावर नाव न घेता टीकास्त्र

मराठवाड्यातील कांहीजण मंत्री म्हणून काम करत आहेत. मात्र हे मंत्री केवळ आपली खुर्ची सांभाळण्यात व्यस्त असून त्यांना जनतेच्या आणि शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाशी कांहीच देणे-घेणे नसल्याचे वारंवार स्पष्ट झालेले आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजा मोठ्या संकटात सापडलेला असतांना त्यांना सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करून त्यांनी सरकारला भाग पाडणे क्रमप्राप्त होते. या सर्वच मंत्र्यांचे तोंडावर बोट आणि हाताची घडी अशी स्थिती असून या मंत्र्यांकडून आता कोणतीच अपेक्षा ठेवू नये असे म्हणत त्यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावर टीका केली.

हेक्टरी 50 हजार रुपये मदतीची मागणी

72 तासाच्या या आंदोलनात शेतकऱ्यांनीही एकच मागणी लावून धरली ती म्हणजे हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची. महाविकास सरकार सत्तेत येण्यापूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. त्या दरम्यान, त्यांनी हेक्टरी 50 हजार रुपये मदत करण्याची मागणी केली होती. आता तोच मुद्दा विरोधकांनी समोर आणला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून हेक्टरी 50 हजार रुपये देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. (Food sacrifice agitation in Latur concludes, demands rs 50,000 per hectare assistance)

संबंधित बातमी :

कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू, ग्राहकांचे मात्र वांदे..!

आगोदर प्रोत्साहन अन् आता हात आखडता, शेतकरी कंपन्या अडचणीत

सोयाबीन 5 हजार रुपये क्विंटल तर काढणीला मजुरावर एकरी 5 हजाराचा खर्च

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.