बनावट किटकनाशकातून शेतकऱ्यांची फसवणूक, असे ओळखा बनावट किटकनाशके

खरीपातील पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच सोयाबीन, कापूस यावर मावा, बुरशी आणि आळ्यांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. बाजारपेठेत बनावट किटकनाशकांची विक्री केली जात असून शेतकऱ्यांना  आर्थिक नुकसानीबरोबरच पिकांनीही मोठा फटका बसत आहे. गतवर्षीही जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात अशा किटकनाशकांची विक्री झाल्याचे निष्पन्न झाले होते. असे असतानाही कारवाईकडे मात्र, कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

बनावट किटकनाशकातून शेतकऱ्यांची फसवणूक, असे ओळखा बनावट किटकनाशके
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 5:04 PM

बीड : एकीकडे शेतकऱ्यांवर निसर्गाची अवकृपा असताना दुसरीकडे किटकनाशक कंपन्यांकडूनही फसवणूक होत आहे. खरीपातील पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच सोयाबीन, कापूस यावर मावा, बुरशी आणि आळ्यांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. बाजारपेठेत बनावट किटकनाशकांची विक्री केली जात असून शेतकऱ्यांना  आर्थिक नुकसानीबरोबरच पिकांनीही मोठा फटका बसत आहे. गतवर्षीही जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात अशा किटकनाशकांची विक्री झाल्याचे निष्पन्न झाले होते. असे असतानाही कारवाईकडे मात्र, कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

पावसाने उघडीप दिल्यानंतर खरिपातील कापूस, सोयाबीन ही पिके वाढीस लागलेली आहेत. मात्र, सोयाबीन आणि कापसावर कीडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यापासून बचाव करण्यासाठी शेतकरी फवारणीच्या कामात व्यस्त आहे. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत नामांकित कंपन्यांच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. कायद्यानुसार ज्या किटकनाशकांच्या विक्रवर बंदी आहे असे किटकनाशकही अंबाजोगाईच्या बाजार पेठेत आहेत. केवळ पीजीआर क्रमांकाच्या आधारावर ही विक्री केली जात आहे.

गतवर्षी अशाच बोगस किटकनाशकामुळे एक हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. असे असतानाही कृषी विभागाकडून कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचा शेतकऱ्यांमधून होत आहे. शिवाय आपल्याकडे तक्रारच दाखल नसल्याचा निर्वाळा कृषी विभागाकडून दिला जात आहे. बियाणे न उगवल्यामुळे गतवर्षी अनेक कंपन्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. असे असताना बोगस किटकनाशके बाजारात विक्री होतानाचे चित्र आहे.

गुणनियंत्रकाच्या मार्फत तपासणीच होत नाही

किटकनाशकांची तपासणी करूनच ती बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करुन द्यावीत असा नियम आहे. मात्र, तपासणी ह करताच ती शेतकऱ्यांवर लादली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शिवाय खरेदीनंतर शेतकऱ्यांना अधिकृत पावतीही दिली जात नाही.

असे ओळखा बनावट किटकनाशक

किटकनाशकाच्या किमतीाधील फरक यावरवरुनही बनावट किटकनाशके हे ओळखता येते. शेतकरी किटकनाशके खरेदी करण्यात गेला असता विक्रेत्याकडून एमआरपी नुसार विक्री न करता अगदी कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना दिले जाते. त्यामुळे शेतऱ्यांनीही कमी किमंत आहे म्हणून त्याची खरेदी करू नये असा सल्ला कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी दिला आहे.ज्या कंपनीच्या किटकनाशकाला अधिकची मागणी आहे त्याच नामांकित कंपनीच्या नावानेच बोगस किटकनाशके ही बाजारात दाखल होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याची अंतिम मुदतीची तारिख व इतर बाबी तपासूनच खरेदी करणे आवश्यक आहे.

संबंधित इतर बातम्या :

शेकऱ्यांची जबाबदारी अन् विमा कंपनींची अट, यामध्येच अडकणार विम्याची रक्कम !

ढगाळ वातावरणामुळे खरिपातील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

कांद्याचा वांदाच ; रब्बीती कांदा जोपासण्याचे शेतकऱ्यांसमोर मोठे अव्हान, कृषी तज्ञांचा मोलाचा सल्ला

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.