गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळ विक्रीला ऑनलाईन शुभारंभ, शेतकऱ्यांमध्ये दसपट दर मिळाल्यानं आनंदाचं वातावरण

महाराष्ट्र शासनाच्या विकेल ते पिकेल याअंतर्गत ही शेतकरी उत्पादक कंपनी निर्माण करुन जांभूळ विक्री सुरु करण्यात आलीय. गडचिरोलीच्या जांभळांची दसपट दरात विक्री होत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळ विक्रीला ऑनलाईन शुभारंभ, शेतकऱ्यांमध्ये दसपट दर मिळाल्यानं आनंदाचं वातावरण
Gadchiroli Jambhul Sale
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 11:17 AM

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळ विक्रीला ऑनलाईन शुभारंभ झाला आहे. शेतकऱ्यांमध्ये दसपट दर मिळाल्यानं आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोलीच्या जांभळांची दसपट दरात विक्री होत आहे. शेतकऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या विकेल ते पिकेल याअंतर्गत ही शेतकरी उत्पादक कंपनी निर्माण करुन जांभूळ विक्री सुरु करण्यात आलीय. (Gadchiroli Farmer sale Jambhul Java Pulm online and get reasonable price)

जांभूळ उत्पादकांना सक्षम बनवणार

जांभूळ उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्धार केला आहे. दरवर्षी जांभूळ 10 रुपये किलोनं विक्री केलं जायचं. यंदा मात्र 100 रुपये किलो दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे. वंदना अ‌ॅग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे जांभूळ विक्री करण्यात येत आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीद्वारे जांभूळ विक्री करण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्याला सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्हणून ओळख मिळवून देण्याचा निर्धार देखील एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

गडचिरोलीतील कोरची तालुक्यातील जांभळाला नागपूर सारखी मोठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी नागपूर मध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत जांभूळ विक्रीला प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे पहिल्याच दिवशी गडचिरोलीच्या जांभळांना दसपट किंमत मिळाली. जांभूळ विक्रीतून आदिवासी शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल व त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

कोरची तालुक्यात जांभळाचे वन आहे. येथील जाभळांना संपूर्ण राज्यभर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जांभळाची शेती करण्यासाठी प्रोत्साहन देतानाच याठिकाणी प्रक्रिया उद्योग देखील सुरू करण्यात यावा, असे एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी सांगितले होते.

स्ट्रॉबेरी शेतीला चालना मिळावी

गडचिरोली जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवड यशस्वी झाल्याचे सांगतानाच आपण स्वत: सहा शेतकऱ्यांना महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरीची रोपे उपलब्ध करून दिली होती. त्याची लागवड यशस्वी होऊन शेतकऱ्यांना लाभ झाल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले होते. गडचिरोली जिल्ह्यात स्ट्रॉबेरी शेतीला चालना मिळावी अशा सूचना देखील एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या.

संबंधित बातम्या:

शरद पवार-प्रशांत किशोर भेटीचा अजेंडा काय?; ‘ते’ 5 मुद्दे ज्यांच्यावर भेटीत चर्चा होऊ शकते!

आषाढी एकादशी वारी प्रतिकात्मक स्वरुपात करण्याचा प्रस्ताव, पुढच्या आठवड्यात अंतिम निर्णय शक्य

(Gadchiroli Farmer sale Jambhul Java Pulm online and get reasonable price)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.