ज्याला मागणी, त्याच फळाची होणार लागवड ; सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना होणार फायदा

आजही राज्यातील शेतकरी हे बाजारपेठेचा विचार न करता पारंपारिक पध्दतीने फळ लागवड करतात. मात्र, त्यामुळे उत्पादन वाढले तरी उत्पन्न पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे आता ज्या फळांना 'जीआय टॅग' मिळाले आहे त्याच फळांच्या लागवडीसाठी प्रोत्साहित केले जाणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ज्याला मागणी, त्याच फळाची होणार लागवड ; सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना होणार फायदा
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 12:32 PM

लातूर : आजही राज्यातील शेतकरी (Farmer) हे बाजारपेठेचा (Marker) विचार न करता पारंपारिक पध्दतीने फळ लागवड करतात. मात्र, त्यामुळे उत्पादन वाढले तरी उत्पन्न पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे आता ज्या फळांना ‘जीआय टॅग’ मिळाले आहे त्याच फळांच्या लागवडीसाठी प्रोत्साहित केले जाणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे ‘जीआय’ प्रदान झालेल्या फळाचे महत्व वाढणार आहे शिवाय शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. वाढत्या उत्पादनाबरोबर त्या उत्पादनाचा इतिहास, दर्जा, सातत्य, वैशिष्ट आणि मागणी यावर भौगोलिक मानांकन दिले जाते. यावरून फळाचा दर्जा ठरतो तर फळाची एक वेगळी ओळख निर्माण होते. फळ उत्पादकांना मानांकन मिळाल्याने अधिक उत्साह वाढतो व त्या फळाविषयी आपलेपणा निर्माण होतो. आता एवढ्यावरच न थांबता याचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहे. राज्यात नाशिकच्या द्राक्षांपासून ते कोकणच्या आंब्यापर्य़ंत भौगोलिक मानांकन मिळालेले आहे. याचा फायदा इतर शेतकऱ्यांना होण्याच्या आता उत्पादन वाढीवर भर देण्यात येणार आहे.

मागणी आहे, पण मार्केटींग गरजेची

भौगोलिक मानांकन मिळालेल्या फळाला देशात आणि परदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, या फळांची मार्केटींगच होत नसल्याने सर्वसामान्य ग्राहकच या वैशिष्टपूर्ण फळाबाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळे जीआय प्रदान करण्यात आलेल्या फळांची मार्केटींग करुन त्याचे महत्व सर्वसामान्य जनतेच्या निदर्शनास आणून देण्याचा उपक्रम आता राज्य सरकारच राबवणार आहे.

जीआय मानांकन मिळाल्याचा फायदा इतर फळांनाही

नाशिकच्या द्राक्षाला जीआय मानांकन मिळाले तर आपोआपच इतर फळांचेही महत्व त्या ठिकाणी निर्माण होते. त्यादृष्टीने फळ वाढवण्यासाठी आता राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. केवळ उत्पादनच नाही तर लागवड पध्दतीपासून ते बाजारपेठ इथपर्यंतचे मार्गदर्शन हे शेतकऱ्यांना केले जाणार आहे. मानांकन मिळालेल्या फळा व्यतिरीक्त फळ उत्पादकांनाही मानांकनासाठी नोंदणी करण्याची पध्दत ही सांगितली जाणार आहे.

जीआय मानांकन फळाला वेगळेच महत्व

जीआय मानांकन प्रदान झालेल्या फळाला एक वेगळेच महत्व असते. केवळ बागायत शेतकऱ्यांचेच नाही तर सर्वसामान्य ग्राहकही याकडे वेगळ्याच अपेक्षेने पाहत असतो. फळाची गुणवत्तेमुळे बागायातदार शेतकरीही समृध्द होत असतो. त्याचबरोबर काही ग्राहकांच्याही अपेक्षा असतात त्या पूर्णक करण्यासाठी किंवा उत्पादकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत.

20 हून अधिक फळांना जीआय मानांकन

राज्यातील 20 हून अधिक फळांना भौगोलिक मानांकन प्रदान करण्यात आलेले आहे. त्यामुळे या फळांसोबत इतर फळांचाही दर्जा आपोआपच वाढणार आहे. आवश्यकता आहे ती मार्केटींगची. त्या अनुषंगानेच सरकर प्रयत्न करीत आहे. नाशिकच्या द्रांक्षांपासून ते कोकणच्या आंब्यापर्यंत इतरही फळांना बाजारभाव जास्त कसा मिळेल शिवाय या फळांनाही नामांकन मिळाल्याचा फायदा कसा करून घेता येईल यासाठी राज्य सरकार आता उपक्रम राबवणार आहे. Geographically rated orchards to be overcultivated, state government initiative

संबंधित बातम्या :

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील पात्रतेबाबत ‘अफवा अन् वास्तव’

खरीपात झालेले नुकसान रब्बी हंगामातून भरुन काढा, पण ‘अशी’ करा पूर्वतयारी…

पेरु लागवडीतून 32 लाखांची कमाई, मुंबई ते दिल्लीच्या बाजारपेठेत विक्री, दिनेश बागड यांनी करुन दाखवलं

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.