केळीची गोडी वाढली, आवक घटल्याने दरात वाढ

दर्जेदार असलेल्या केळीला चांगला दर मिळत आहे. शिवाय सणासुदीमुळे मागणी वाढल्याचे चित्र बाजारपेठेत आहे. त्यामुळे क्विंटलमागे 20 रुपयांनी दर वाढल्याचे जळगाव जिल्ह्यतील बऱ्हाणपूर बाजारपेठेत पाहवयास मिळाले. तर केळीला कमाल दर हा 1230 रुपये प्रतिक्विंटल मिळाला आहे.

केळीची गोडी वाढली, आवक घटल्याने दरात वाढ
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 3:15 PM

जळगाव : पावसाचा परिणाम फळ पीकावरही झाला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्याने केळीची पडझड झाली आहे. मात्र, अशा परस्थितीमध्येही दर्जेदार असलेल्या केळीला चांगला दर मिळत आहे. शिवाय सणासुदीमुळे मागणी वाढल्याचे चित्र बाजारपेठेत आहे. त्यामुळे क्विंटलमागे 20 रुपयांनी दर वाढल्याचे जळगाव जिल्ह्यतील बऱ्हाणपूर बाजारपेठेत पाहवयास मिळाले. तर केळीला कमाल दर हा 1230 रुपये प्रतिक्विंटल मिळाला आहे.

आंब्‍याच्‍या खालोखाल महाराष्ट्रात केळीचे उत्पादन घेतले जाते. केळीच्‍या उत्‍पन्‍नात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात अंदाजे दोन लाख वीस हजार हेक्‍टर क्षेत्र केळीच्‍या लागवडीखाली आहे. सध्‍या महाराष्‍ट्रात एकूण चौवेचाळीस हजार हेक्‍टर क्षेत्र केळीच्‍या लागवडीखाली असून त्‍यापैकी निम्‍म्‍यापेक्षा अधिक क्षेत्र जळगांव जिल्‍हयांत आहे. ऐन सणासुदीमध्ये केळीची आवक ही कमी झाल्याने दर वाढलेले आहेत.

बारामाही बाजारात उपलब्ध असलेल्या केळीला सध्या पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, राज्यस्थानमधून मोठी मागणी आहे. सध्या खानदेशात चांगल्या प्रतीच्या केळीची काढणी कामे सुरु आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबार, शहदा या भागात केळीची काढणी कमी असली तरी, धुळ्यातील शिवपुरात, कांदेबाग येथे काढणी कामाला वेग आला आहे. त्यामुळे कमी दर्जा असलेल्या केळीला 750 प्रतिक्विंटल दर आहे तर बऱ्हाणपूर येथील बाजारपेठेत चांगल्या प्रतीच्या केळीला 1433 रुपये प्रतिक्विंटल दर मिळालेला आहे.

म्हणून जळगावच्या केळीचे दर तेजीत

जळगाव जिल्ह्यात पिकलेली केळी पौष्टिक खाद्य असून केळफूले, कच्‍ची फळे व खोडाचा गाभा भाजीकरिता याचा वापर केला जातो. फळापासून टिकावू पूड, मुराब्‍बा, टॉफी, जेली इत्‍यादी पदार्थ बनवितात. केळीच्या वाळलेल्या पानाचा उपयोग आच्‍छादनासाठी करतात. केळीच्‍या खोडाची व कंदाचे तुकडे करुन ते जनावरांचा चारा म्‍हणूनही उपयोगात आणली जातात. केळीच्‍या झाडाचा धार्मिक कार्यात मंगलचिन्‍ह म्‍हणून उपयोग केला जातो. एवढेच नाही तर जळगाव भागातील बसराई केळीची निर्यातही केली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन प्राप्‍त होते. या केळीचा अधिकतर उपयोग हा खाण्यासाठी केला जातो.

सणासुदीत वाढली मागणी

सणासुदीमुळे केळीची मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातूनच नाही तर पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, राज्यस्थानमधूनही जळगावच्या केळीला मागणी आहे. शिवाय मध्यंतरी झालेला पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे बाजारपेठेत आवक ही कमी आहे. त्याचा परिणाम दरावर झाला असून भविष्यात केळीचे दर अजून वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Good rate of bananas due to decline in arrivals, demand from foreign states also increased)

संबंधित बातम्या ;

‘गोऱ्हा नाही कालवडच होणार’, गाईचं गर्भाशयच ट्रान्सप्लांट करण्याचा गडकरींचा मंत्र, महाराष्ट्रासह देश बदलणार, काम सुरु

पंचनाम्यानंतर पुढची प्रक्रीया काय? शेतकऱ्यांना प्रतिक्षा मदतीची

कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव, असे करा नियंत्रण म्हणजे होईल उत्पादनात वाढ

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.