कोकणात वाढणार काजूचे उत्पादन, राज्य सरकारकडून अल्प व्याजदरात कर्ज

कोकणाच्या शाश्वत विकासासाठी कोकणात मत्स्यव्यवसाय, फळबाग, दुग्धव्यवसायासह पर्यटन वाढीसाठी राज्यसरकार विशेष प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी अल्प व्याजदरात भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे.

कोकणात वाढणार काजूचे उत्पादन, राज्य सरकारकडून अल्प व्याजदरात कर्ज
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 6:54 PM

मुंबई : शेती उत्पादन वाढवण्यासाठी कायम सरकारचे प्रयत्न राहिलेले आहेत. काजूसाठी पोषक वातावरण असून येथे काजूचे उत्पादन वाढीसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतलेला आहे. (Government’s efforts to increase Konkan,) कोकणाच्या शाश्वत विकासासाठी कोकणात मत्स्यव्यवसाय, फळबाग, दुग्धव्यवसायासह पर्यटन वाढीसाठी राज्यसरकार विशेष प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी (Capital at low interest rates) अल्प व्याजदरात भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे. राज्य शासनाच्यावतीने संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून व्याज दर सवलत योजना राबविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला.

तसेच ओल्या काजूगराला अधिक किंमत मिळत असल्याने प्रायोगिकतत्वावर ओला काजूगर काढण्याच्या मिशन लुधियानावरुन मागविण्यात येणार आहेत. या मशिन मागविल्यानंतर ओला काजूगराचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर अधिक उत्पन्न देणारे काजूचे वाण विकसित करण्याच्या सूचना डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

कोकणाला निसर्गाचे वरदान

कोकणाला निसर्गाचे वरदान आहे. त्यामुळेच या भागात काजूला पोषक वातावरण आहे. या वातावरणाचा पुरेपूर फायदा घेऊन या भागातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतलेला आहे. भांडवलाअभावी काजू लागवडीकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून आता तो ही प्रश्न मार्गी लागणार आहे. कमी व्याजदरात शेतकऱ्यांना कर्ज हे मिळणार आहे. यामुळे उत्पादन वाढणार असल्याचा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

बैठकीत काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांचाही आढावा

काजू उत्पादक शेतकऱ्यांना शेती करताना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते त्याअनुशंगाने ही बैठक मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार हे होते तर यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार शेखर निकम उपस्थित होते.

वाण विकसित करण्याच्या कोकण विद्यापीठाला सूचना

काजूचे उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने वाण विकसीत करण्याच्या सुचना यावेळी उपमुख्यमंत्री यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांना दिल्या. वाण विकसीत झाले तर उत्पादन वाढण्यात आणखीन मदत होणार आहे. शिवाय स्थानिक पातळीवर काजू शेती करीत असताना शेतकऱ्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते याचाही आढावा त्यांनी व्हीसीद्वारे घेतला आहे. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भरत साळवी (व्हीसीद्वारे), महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कॅश्यु प्रो. फेडरेशनचे अध्यक्ष धनंजय यादव, मिथिलेश देसाई, खालगाव काजू मद्यार्क व काजू उत्पादक सहकारी संस्थेचे संचालक पंकज दळवी उपस्थित होते. (Government strives to increase cashew production in Konkan, farmers to get low rate loans)

संबंधित बातम्या :

निसर्गाचा कहर त्यात बियाणे कंपनीकडून फसवणूक, 2 एकरावरील फुकोबीवर फिरवला रोटर

‘फळबागा नको गांजा लावण्याची परवानगी द्या’ ; यवतमाळमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव

आता पावसाचा नव्हे, कमी तापमानाचा धोका, पिकांवर कोळी किडीचा प्रादुर्भाव

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.