पोल्ट्रीफार्म धारकांच्या चुकीच्या माहितीमुळे सोयापेंडच्या आयातीबाबत संभ्रमता : पाशा पटेल
सोयाबीनला सरासरीच्या तुलनेत दर मिळत असतानाच पुन्हा सोयापेंड आयातीचा मुद्दा डोकेवर काढत होता. देशात सोयापेंडचा साठा शिल्लक असतानाही पोल्ट्रीफार्म धारकांकडून दिशाभूल केली जात आहे. देशांतर्गत बाजारपेठेत 13 लाख मेट्रिक टन सोयाबीन पेंड शिल्लक असतानाही कुक्कुटपालन व्यावसायिक चुकीची आकडेवारी सादर करत आहेत.
मुंबई : सोयाबीनला सरासरीच्या तुलनेत दर मिळत असतानाच पुन्हा सोयापेंड आयातीचा मुद्दा डोकेवर काढत होता. देशात (Soypend Imports) सोयापेंडचा साठा शिल्लक असतानाही (Poultry Farms) पोल्ट्रीफार्म धारकांकडून दिशाभूल केली जात आहे. देशांतर्गत बाजारपेठेत 13 लाख मेट्रिक टन सोयापेंड शिल्लक असतानाही कुक्कुटपालन व्यावसायिक चुकीची आकडेवारी सादर करत आहेत. (Soybean Prices) त्यामुळेच मध्यंतरी सोयापेंडच्या आयातीवरून संभ्रम निर्माण झाला होता पण वस्तूस्थिती काय आहे हे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या निदर्शास आणून दिल्यामुळे आता सोयापेंडच्या आयातीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी नेते तथा माजी आमदार पाशा पटेल यांनी मोदी सरकारचे आभार मानले आहेत.
गतवर्षीही सोयापेंडमुळेच सोयाबीनच्या दरात घसरण
मागील वर्षी जून मध्ये देशात सोयापेंडी चा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे त्यावेळी कुक्कुटपालन व्यावसायिकांनी पेंडीच्या आयातीची मागणी केल्यावर शेतकऱ्यांनी या मागणीला विरोध केला नाही. मात्र, जूनमध्ये आयातीचा निर्णय झाल्यावर ही सोया पेंड देशात ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आली त्यावेळी देशांतर्गत बाजारपेठेत सोयाबीनची आवक सुरु झाली होती. आयात पेंडीमुळे सोयाबीनच्या भावात घसरण झाली. आता सोयापेंडची आवश्यकता नसताना मागणी केली जात आहे. मात्र, वास्तव काय आहे हे केंद्राच्या निदर्शनास आले आहे.
सोयाबीनचे दर वाढलेच की पोल्ट्रीफार्म धारकांना जाग
हंगामाच्या सुरवातीपासून सोयाबीनचे दर हे कमी होते. तेव्हा शेतकऱ्यांच्या अडचणी कुणाच्या निदर्शनास आल्या नाहीत. मात्र, शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या साठवणूकीवर भर दिल्याने दरात वाढ झाली. मागणी अधिक आणि पुरवठा कमी यामुळे 4 हजार 500 असलेले दर आठ दिवसांपूर्वी 6 हजार 600 वर गेले होते. दर वाढताच पोल्ट्रीफार्म धारकांनी सोयापेंड आयातीची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. मात्र, आता सोयापेंडची आयात झाली तर मात्र, सोयाबीनचे दर घसरणार म्हणून सोयापेंडच्या आयातीला राज्यातील सर्वच नेत्यांनी विरोध केला होता.
अन्यथा कायम विरोध राहणार
कुक्कुटपालन व्यावसायिक चुकीच्या आकडेवारी द्वारे सोयाबीन पेंडीच्या आयातीची मागणी करत आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत 13 लाख मेट्रिक टन सोयाबीन पेंड शिल्लक असतानाही कुक्कुटपालन व्यावसायिक चुकीची आकडेवारी सादर करत आहेत. सोया पेंड आयात न करण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्य केल्याबद्दल शेतकरी वर्ग मोदी सरकारला धन्यवाद दिले. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठेत सोयाबीनचे भाव वाढून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मात्र, आगामी काळात कुक्कुटपालन व्यावसायिकांनी चुकीची आकडेवारी सादर केल्यास त्याला विरोध केला जाणार असल्याचेही पाशा पटेल यांनी स्पष्ट केले.