उत्पादकांना खर्च-बाजारभावाचा मेळ बसत नाही, द्राक्षाच्या पंढरीत द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ

लाखो रुपये खर्च करुन तारेवरची कसरत करणाऱ्या द्राक्ष उत्पादकांना खर्च आणि बाजारभावाचा मेळ  (Grapes Farmers Destroy Grapes Farm) बसत नाहीये.

उत्पादकांना खर्च-बाजारभावाचा मेळ बसत नाही, द्राक्षाच्या पंढरीत द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
Grapes Farmers
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 1:57 PM

लासलगाव : लाखो रुपये खर्च करुन तारेवरची कसरत करणाऱ्या द्राक्ष उत्पादकांना खर्च आणि बाजारभावाचा मेळ  (Grapes Farmers Destroy Grapes Farm) बसत नाहीये. म्हणून द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील सोनेवाडी खुर्द येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने पोटाच्या पोराप्रमाणे वाढवलेल्या दोन एकरावरील द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवण्याची दुर्दैवी वेळ आली आहे (Grapes Farmers Destroy Grapes Farm In Lasalgaon Due To Cost And Market Prices Do Not Match).

गेल्या 8 ते 10 वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा, बाजारपेठेतील दरात चढ-उतार तर निर्यात केलेल्या द्राक्षमालाच्या रिजेक्शनमुळे उत्पादक नेहमी मेटाकुटीस आले आहे. द्राक्ष बाग उभी करण्यापासून पीक हाती पडण्यासाठी एकरी पाच लाख खर्च करावा लागतो. त्यासाठी बँक, पतसंस्था, सोसायट्यांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र कर्जफेडीसाठी मिळणारी बाजारपेठ सक्षम ठरत नाही कर्जाच्या ओझ्यात मानसिक तणाव वाढवण्यापेक्षा इतर पिकाचे नियोजन करणे समाधानकारक ठरेल अशी मानसिकता द्राक्ष उत्पादकांमध्ये रुजत आहे.

शंभर रुपये किलो विकला जाणारा निर्यातक्षम द्राक्ष लॉकडाऊन आणि आता लॉकडाऊन परिस्थितीमुळे 20 ते 25 रुपये किलोने विक्री करण्याची वेळ द्राक्ष उत्पादकांवर आल्यामुळे उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाल्याने कर्ज फेडावे कसे, या विवंचनेत असलेल्या निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथील शेतकऱ्याने द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवत संपूर्ण दोन एकर द्राक्षबाग भुईसपाट केली आहे.

येवल्यातही हतबल शेतकऱ्याकडून उभे वांग्याचे पीक उपटून जमीनदोस्त

येवला तालुक्यातील नागडे गावातील शेतकरी भारत भावसार यांनी कांद्याच्या बाजारभावात नेहमी चढ-उतार होत कांदा उत्पादकांचे वांदे होत असल्याने शेतीत काहीतरी वेगळे प्रयोग करावे या हेतूने वांग्याचे पीक घेण्याचे ठरविले. त्यानुसार दोन एकरात मल्चिंग पेपर टाकून सहा हजार रोपे लावली तीन ते चार महिन्यात सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च करत या वांग्याच्या पिकाला पोटच्या मुलासारखे जीव लावत पीक सुद्धा जोमात आले.

गेल्या पंधरवड्यात 14 ते 16 किलो कॅरेटला साडेचारशे रुपये इतका बाजार भाव मिळत होता. त्यामुळे भारत भावसार आनंदात होते. मात्र, नंतरच्या दिवसांमध्ये बाजारपेठेत वांग्याचा भाव अचानक खाली घसरला. त्यामुळे भारत भावसार यांना मोठा धक्का बसला. कॅरेटपाठी साडेचारशे रुपये इतका बाजार भाव मिळणाऱ्या वांग्याला सध्या कवडीमोल म्हणजे 50 ते 60 रुपये इतके कॅरेटला बाजार भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि काढणी मजुरी खर्चही निघणे मुश्कील झाल्याने संतापाच्या भरात शेतातील दोन एकरावरील उभे वांग्याचे पीक उपटून जमीनदोस्त केले.

Grapes Farmers Destroy Grapes Farm In Lasalgaon Due To Cost And Market Prices Do Not Match

संबंधित बातम्या :

पडीक वनजमिनीवर शेती पिकवली, पण वनविभागाने उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला

आधी कुऱ्हाड अन् आता ट्रॅक्टर! शेतकऱ्यांमागील शुक्लकाष्ट संपेना

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.