शेतकऱ्यांना मिळणार हमीभाव केंद्राचा ‘आधार’, हरभऱ्याचा दरही फायनल अन् नोंदणीलाही सुरवात

सध्याही ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील हरभऱ्याची काढणी कामे उरकून थेट बाजारपेठेत विक्रीवर शेतकऱ्यांचा भर आहे. केंद्र सरकारने हरभऱ्यासाठी 5 हजार 230 हा हमीभाव ठरवून दिला आहे. आता हरभऱ्याची आवक सुरु होऊन 15 दिवासाचा कालावधी लोटला असताना राज्यात हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय नाफेडने घेतला आहे.

शेतकऱ्यांना मिळणार हमीभाव केंद्राचा 'आधार', हरभऱ्याचा दरही फायनल अन् नोंदणीलाही सुरवात
रब्बी हंगामात हरभरा क्षेत्रात वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांना आता हमीभाव केंद्राचा आधार मिळणार आहे.
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 11:40 AM

स्वप्नील उमाप:  अमरावती: शेतीमालाच्या उत्पादनापेक्षा बाजारपेठेतील दर काय आहेत यावरच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून आहे. यातच गेल्या वर्षभरापासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने उत्पादनात घट होत आहे. सध्याही ढगाळ वातावरणामुळे (Rabi Season) रब्बी हंगामातील हरभऱ्याची काढणी कामे उरकून थेट बाजारपेठेत विक्रीवर शेतकऱ्यांचा भर आहे. (Central Government) केंद्र सरकारने हरभऱ्यासाठी 5 हजार 230 हा हमीभाव ठरवून दिला आहे. आता हरभऱ्याची आवक सुरु होऊन 15 दिवासाचा कालावधी लोटला असताना (Maharashtra) राज्यात हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय नाफेडने घेतला आहे. त्याअनुशंगाने अमरावती जिल्ह्यामध्ये 8 खरेदी केंद्र उभारले जाणार आहेत. सध्या प्रत्यक्षात खरेदी होत नसली तरी नोंदणीला प्रारंभ झाला आहे. महिनाभर शेतकऱ्यांना केवळ नोंदणी आणि त्यानंतर हरभऱ्याची विक्रीही करता येणार आहे. यंदा हरभऱ्याच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. परिणामी आवकही वाढणार असल्याने या खरेदी केंद्राच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

सध्या बाजारपेठेतील स्थिती काय ?

रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केल्याने उत्पादनाच्या दृष्टीने हरभरा पिकावरच भर दिला आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावरच हरभऱ्याचेच पीक आहे. शिवाय गेल्या 15 दिवसांपासून हरभरा या पिकाची आवक सुरु झाली असून खुल्या बाजारपेठेत 4 हजार 500 रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. तर केंद्र सरकारने हरभऱ्यासाठी 5 हजार 230 हा दर ठरवून दिला आहे. त्यामुळे हमीभाव केंद्र सुरु होणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे होते. अखेर याबाबत निर्णय घेण्यात आला असून आता नोंदणी आणि 15 मार्चपासून प्रत्यक्ष खरेदीव असे धोरण निश्चित करण्यात आले आहे.

अमरावती जिल्ह्यामधील खरेदी केंद्र

जिल्हा मार्केटिंग कार्यालयामार्फत चांदूर रेल्वे, धारणी, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, अचलपूर येथे खरेदी विक्री संघामार्फत तसेच अचलपूर येथे जयसिंग विविध कार्यकारी सहकारी सोसायटी,पथ्रोट व नेरपिंगळाई येथे विविध कार्यकारी सहकारी संस्था,नेरपिंगळाईमार्फत नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आधार कार्ड, सातबारा, 8 अ उतारा, तलाठ्यांच्या स्वाक्षरीचा पीक पेरा उतारा किंवा हरभरा पिकाच्या नोंद असलेला सातबारा, आधार लिंक असलेले बँक पासबुकची झेरॉक्स ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत.

क्षेत्र वाढले मात्र उत्पादन घटले

रब्बी हंगामात हरभरा क्षेत्रात वाढ झाली असली तरी बदलत्या वातावऱणाचा परिणाम थेट उत्पादनावर झाला आहे. अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे वाढलेला घाटीअळीचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन घटलेले आहे. शिवाय सध्या हमीभावापेक्षा खुल्या बाजारपेठेत कमी दर असल्याने हमीभाव केंद्र सुरु होणे ही काळाची गरज होती. आता प्रत्यक्षात खरेदी होणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

संबंधित बातम्या :

सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात तरी शेतकरी संभ्रमात, दर वाढूनही काय समस्या ?

Crop Insurance: पीकविम्याच्या 4 लाख पूर्वसूचना ठरल्या अपात्र, चूक शेतकऱ्यांची की विमा कंपन्याची..!

Onion Rate : कांद्यामुळे नव्हे तर केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, वाढीव दरावर निर्णय काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.