Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृषी विभागाची भूमिका बजावत आहे ‘शिवार’ फाऊंडेशन, शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अनोखा उपक्रम

अवकाळी, गारपिट आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे कीडीचा प्रादुर्भाव तर वाढत आहेच पण वाढही खुंटली असून याचा परिणाम थेट उत्पादनावर होणार आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि योग्य तो सल्ला देण्याची भू्मिका ही कृषी विभागाची मात्र, या शासकीय यंत्रणेला जे जमले नाही ते एका फाऊंडेशनने करुन दाखवले आहे.

कृषी विभागाची भूमिका बजावत आहे 'शिवार' फाऊंडेशन, शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अनोखा उपक्रम
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 2:04 PM

उस्मानाबाद : खरीप हंगामात झालेले नुकसान भरुन काढण्याचा मानस तर यशस्वी झाला नाही पण आता रब्बीतील पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे (Rabbi Season) रब्बी हंगामातील पिके ही धोक्यात आहेत. (Untimely Rain) अवकाळी, गारपिट आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे कीडीचा प्रादुर्भाव तर वाढत आहेच पण वाढही खुंटली असून याचा परिणाम थेट उत्पादनावर होणार आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये (guidance to farmer) शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि योग्य तो सल्ला देण्याची भू्मिका ही कृषी विभागाची मात्र, या शासकीय यंत्रणेला जे जमले नाही ते एका फाऊंडेशनने करुन दाखवले आहे. हंगामातील पिकांचे व्यवस्थापन कसे करायचे येथून ते या प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी खचून न जाता त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न या फाऊंडेशनकडून केला जात आहे. सध्याच्या परस्थितीमध्ये ज्याची आवश्यकता शेतकऱ्यांना आहे तोच धागा पकडून योग्य ते मार्गदर्शन केले जात असल्याचे फाउंडेशने मुख्य विनायक होगाणा यांनी सांगितले आहे.

नेमका काय आहे उपक्रम?

दरवर्षीची नापिकी, उत्पादनावर खर्च आणि घटते उत्पन्न याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनमानावर होत आहे. त्यामुळेच मराठवाड्यासारख्या विभागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये म्हणून शिवार फाऊंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. याकरिता शेतकऱ्यांसाठी 8955771115 हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे समुपदेशन करुन त्यांना मानसिक आधार देण्याचे काम केले जात आहे. मार्गदर्शन करण्यासाठी या फाऊंडेशने स्वतंत्र यंत्रणा ही उभी केली आहे. त्यामुळे याचा लाभ घेण्याचे आवाहन फाऊंडेशनचे प्रमुख विनायक होगाणा यांनी केले आहे.

असे करा कीड नियंत्रण

रब्बी हंगामातील पिकांवरील कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी T आकाराचे प्रती एकरी 20 पक्षी थांबे उभारणे गरजेचे आहे. तर अळीच्या सर्वेक्षणासाठी प्रतिएकरी 2 कामगंध सापळे लावावे लागणार आहेत. नुकसानीची पातळी ओलांडल्यास इमामेक्टीन बेंजोएट, फ्लुबेंडामाईड प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी लागणार आहे. तर ज्वारी पीक सध्या पोटऱ्यात आहे. त्यामुळे फवारणी करण्याच्या अवस्थेत पीक नाही मात्र, ज्या ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेंझाएट 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या :

तुरीचे दरही शेतकऱ्यांच्या भूमिकेवरच अवलंबून, सोयाबीन-कापूस नंतर होणार का मोहीम फत्ते?

कहीं खुशी-कहीं गम : थंडीमुळे पीके कोमेजली, फळबागा बहरल्या, नेमका काय परिणाम झाला? वाचा सविस्तर

Crop Insurance: … अखेर कृषी विभागाचे भाकीत खरे ठरले, लातूरात असे काय घडले?

दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला.
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा.
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?.
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं.
पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया.
VIDEO: 'तेल लगाने गया...', L&T च्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा हिसका
VIDEO: 'तेल लगाने गया...', L&T च्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा हिसका.
धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा
धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा.
धसांच्या गंभीर आरोपांवर दमानिया म्हणाल्या, बुद्धीला हे न पटण्यासारखं..
धसांच्या गंभीर आरोपांवर दमानिया म्हणाल्या, बुद्धीला हे न पटण्यासारखं...
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट.
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?.