Mango : जीआय मानांकन हापूसला हक्काचे मार्केट, खरेदी केंद्राची उभारणी अन् विक्रीही

भौगोलिक मानांकन प्रदान झालेल्या पिकांना एक वेगळेच महत्व असते. त्याच्या गुणवैशिष्टांमुळे त्याचा एक दर्जा ठरलेला असतो आणि त्यानुसारच त्याला दरही मिळतो. मात्र, काळाच्या ओघात जीआय मानांकनाच्या नावाखाली कोणतेही पीक ग्राहकांच्या माथी मारले जात आहे. मध्यंतरी कोकणलगच्या भागातून असे प्रकार मुंबईमध्ये वाढत असल्याचे निदर्शनास आले होते.

Mango : जीआय मानांकन हापूसला हक्काचे मार्केट, खरेदी केंद्राची उभारणी अन् विक्रीही
देवगड हापूसचे महत्व कायम रहावे म्हणून आता खरेदी केंद्रवर शेतकऱ्यांना विक्री करता येणार आहे.
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 1:05 PM

सिंधुदुर्ग :  (Geographical Rating ) भौगोलिक मानांकन प्रदान झालेल्या पिकांना एक वेगळेच महत्व असते. त्याच्या गुणवैशिष्टांमुळे त्याचा एक दर्जा ठरलेला असतो आणि त्यानुसारच त्याला दरही मिळतो. मात्र, काळाच्या ओघात जीआय मानांकनाच्या नावाखाली कोणतेही पीक ग्राहकांच्या माथी मारले जात आहे. मध्यंतरी (Kokan) कोकणलगच्या भागातून असे प्रकार मुंबईमध्ये वाढत असल्याचे निदर्शनास आले होते. पण आता केवळ जीआय मानांकन असलेल्याच (Hapus Mango) हापसूला महत्व राहणार आहे. कारण अशाच आंब्याची खरेदी एका कंपनीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्याचा फायदा हा बागायतदार यांना तर होणारच आहे पण ग्राहकांना देखील दर्जेदार हापूस चाखायला मिळणार आहे. या अनोख्या पध्दतीचा ग्राहक नेमका लाभ कसा घेणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. देवगज आंबा उत्पादक संघ आणि इनोटेरा कंपनीच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम राबवला जाणार आहे.

खरेदी केंद्रावरच होणार खरेदी

जीआय मानांकन हापूस आंब्याची खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र ही उभारली जाणार आहेत. यामाध्यमातून शेतकऱ्यांना आपला आंबा हा विकता येणार आहे. एवढेच नाही तर यामध्ये क्युआर कोडचा वापर होणार आहे. यामुळे आंबा खरोखरच मानांकन मिळालेला आहे का? कुणाच्या शेतामधील आणि कुणाच्या मालकीचा आहे याची माहिती थेट ग्राहकालाच होणार आहे. कारण हापूसच्या पेटीवर मानांकन मिळाल्याचे पत्रच लावण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांचीही फसवणूक होणार नाही आणि शेतकऱ्यांनाही योग्य दर मिळणार आहे.

प्रतवारीनंतरच होणार खरेदी

उभारण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर आंब्याचा दर्जा हा तपासलाच जाणार आहे. याकरिता स्कॅनिंग केले जाणार आहे. यामुळे आंब्यातील साक्याचे प्रमाण किती आहे हे स्पष्ट होणार आहे. हे तपासणी झाल्यानंतर एकाच ब्रॅंण्डखाली हे आंबे विकले जाणार आहेत. त्यामुळे अधिकच्या दराचा फायदा थेट शेतकऱ्यांना आणि संबंधित कंपनीला देखील होणार आहे. या पध्दतीमुळे मानांकनाच्या नावाखाली होणाऱ्या विक्रीला आळा बसणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.

देवगड तालुक्यात 11 खरेदी केंद्र

हापूस आंब्याची शेतकऱ्यांना विक्री करता यावी म्हणून तालुक्यात 11 ठिकाणी केंद्र उभारण्यात आली आहेत. अधिक करुन मंडळाच्या गावी हे केंद्र उभारण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूकीचा खर्च वाचला असून आता मानांकन प्राप्तच हापूसला अधिकचे महत्व येणार आहे. त्यामुळे चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. यंदाचा हा उपक्रम नवखा असला तरी भविष्यात याचे फायदे लक्षात आल्यावर महत्व वाढणार आहे.

संबंधित बातम्या :

PM Kisan Yojna : आता बॅंक खाते क्रमांकाची सक्ती नाही, मग काय आहे नवीन पर्याय, प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी

Amravati Market : आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम सोयाबीन दरावर, अंतिम टप्प्यात विक्रमी दर

Smart Farmer : महावितरणच्या योजनेमुळे शेतकऱ्यांना ‘ऊर्जा’, नांदेड परिमंडळातील 3 हजार शेतकरी थकबाकीमुक्त

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.