Mango : हापूसचे उत्पादन घटले पावसाने तर मराठवाड्यातील केशरला धोका कशाचा? गतवर्षीच्या तुलनेत उत्पादनात घट

मराठवाड्यात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. तब्बल 31 हजार हेक्टरावर केशरची लागवड असून आंब्याची चव आणि गंधामुळे याला पसंती आहे. काळाच्या ओघात आंबा क्षेत्रामध्ये वाढ झाली असली तरी येथील बदलत्या वातावरणामुळे उत्पादनात घट तर होत आहे पण आता क्षेत्र घटण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. यंदाचा हंगाम तर उत्पादनाबरोबरच दराच्या बाबतीमध्येही अनिश्चिततेचा राहिलेला आहे.

Mango : हापूसचे उत्पादन घटले पावसाने तर मराठवाड्यातील केशरला धोका कशाचा? गतवर्षीच्या तुलनेत उत्पादनात घट
केशर आंबा
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 3:10 PM

औरंगाबाद : (The vagaries of nature) निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम सर्वच पिकांवर झाला असला तरी आंबा आणि द्राक्ष यावर अधिकचा परिणाम झाला आहे. फळांचा राजा असलेल्या (Hapoos Mango) हापूसच्या उत्पादनात घट झाल्याने यंदा महिनाभर आगोदरच हंगाम संपुष्टात आला आहे. ज्याप्रमाणे पावासाचा धोका कोकणातील आंबा फळाला झाला असला तरी (Marathwada) मराठवाड्यातील केशर रखरखत्या उन्हामुळे करपल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील केशर उत्पादनात यंदा 30 ते 40 टक्के घट झाली आहे. ज्याप्रमाणे प्रतिकूल वातावरणाचा परिणाम कोकणातील आंब्याला बसला आहे त्याच प्रमाणे मराठवाड्यातील आंब्याची अवस्था ही उन्हामुळे झाली आहे.

31 हजार हेक्टरावर केशरचा आंबा

मराठवाड्यात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. तब्बल 31 हजार हेक्टरावर केशरची लागवड असून आंब्याची चव आणि गंधामुळे याला पसंती आहे. काळाच्या ओघात आंबा क्षेत्रामध्ये वाढ झाली असली तरी येथील बदलत्या वातावरणामुळे उत्पादनात घट तर होत आहे पण आता क्षेत्र घटण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. यंदाचा हंगाम तर उत्पादनाबरोबरच दराच्या बाबतीमध्येही अनिश्चिततेचा राहिलेला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम केवळ मुख्य पिकांवरच झाला असे नाही तर फळबागाही यामध्ये होरपळल्या आहेत.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात उत्पादन

केसर आंब्याचे क्षेत्र मराठवाड्यात वाढत आहे. येथील वातावरण उत्पादकतेसाठी अनुकूल आहे. त्यामुळेच या विभागातील 8 ही जिल्ह्यामध्ये लागवड केली जाते. यामघ्ये औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर नांदेड, परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. मराठवाड्यातील आंबा खवय्यांना प्रतिक्षा असते ती केशर आंब्याची. केशर आंब्याची आवक सुरु होताच त्याचा इतर फळांवर तर परिणाम होतोच पण इतर आंब्याचे दरही घटतात. ज्याप्रमाणे कोकणात हापूसला मागणी असते त्याचप्रमाणे मराठवाड्यात केशर आंब्याला महत्व आहे.

हे सुद्धा वाचा

वाढत्या उन्हामुळे घटले उत्पादन

क्षेत्र कोणतेही असो निसर्गातील बदलाचा परिणाम हा फळ पिकांवर झालेला आहेच. कोकणात पावसामुळे नुकसान झाले असले तरी मराठावड्यात मात्र, वाढत्या उन्हामुळे केशरचे उत्पादन घटले आहे. ज्या शेतकऱ्यांनी बागांवर कव्हर चा वापर केला त्यांच्या उत्पादनावर अधिकाचा परिणाम झाला नाही. हंगामाच्या सुरवातीला अवकाळी पाऊस, वादळी वारे याचा परिणाम झाला आहे. तर केवळ उन्हामुळे 4 ते 5 टक्के उत्पदनात घट झाली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.