Monsoon : लांबणीवर पडलेल्या पावसाबद्दल महत्वाची बातमी..! काय आहेत हवामान विभागाच्या सूचना

यंदा खरिपासाठी सर्वकाही पोषक वातावरण असल्याचे सांगण्यात आले होते. एवढेच नाही तर मान्सूचेही आगमन वेळेपूर्वीच होणार असल्याने शेतकऱ्यांनीही खरिपाचे नियोजन करीत खरीपपूर्व मशागतीची कामे आटोपून घेतली होती. असे असतानाही पावासाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Monsoon : लांबणीवर पडलेल्या पावसाबद्दल महत्वाची बातमी..! काय आहेत हवामान विभागाच्या सूचना
मान्सूनचे वेध
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 6:30 PM

मुंबई : यंदा नियोजित वेळेपूर्वीच (Monsoon) मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज (Meteorological Department) हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, ऐन वेळी वाऱ्याची दिशा बदल्याने मान्सून पावसाने हुलकावणी दिली आहे. आता येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा 1 जून नव्हे तर 29 मे रोजी (Kerala) केरळात मान्सूनचे आगमन झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले होते. त्यानुसार आतापर्यंत महाराष्ट्रात पावसाचे आगमन होणे अपेक्षित होतेय उलट आता वाढत्या उष्णतेमुळे राज्यातील काही भागामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, 4 ते 5 दिवसांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवल्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.

पावसाच्या लांबणीमुळे चिंतेचे ढग

यंदा खरिपासाठी सर्वकाही पोषक वातावरण असल्याचे सांगण्यात आले होते. एवढेच नाही तर मान्सूचेही आगमन वेळेपूर्वीच होणार असल्याने शेतकऱ्यांनीही खरिपाचे नियोजन करीत खरीपपूर्व मशागतीची कामे आटोपून घेतली होती. असे असतानाही पावासाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. उलट गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे अनिश्चित आणि अनियमित असलेल्या मान्सूनच्या मनात तरी काय आहे असा सवाल उपस्थित होत आहे.

4 ते 5 दिवसांमध्ये मुसळधार

राज्यात आतापर्यंत तुरळक ठिकाणीच पावसाने हजेरी लावलेली आहे. सर्वच भागामध्ये समप्रमाणात पाऊस हा बरसलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात पेरणाी विषयी शंका उपस्थित झाली असून आतापर्यंतचा पाऊस पेरणीयोग्य तर नाहीच पण भविष्यात 100 मिमी पाऊस झाला तरच शेतकऱ्यांनी चाढ्यावर मुठ ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तुर्तास पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज असल्याने पुन्हा शेतकरी जोमाने तयारीला लागला आहे. रखडलेली कामे आटोपून पुन्हा मशागतीवर भर दिला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यात मान्सूनचे आगमनच नाही

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मान्सून राज्यात बरसणे अपेक्षित होते. पण राज्यातील तुरळक ठिकाणी मध्यंतरी पावसाने हजेरी लावली होती. तो पाऊसही सध्या गायब झाला आहे. त्यामुळे हंगामपूर्व मशागतीची कामे आटोपून शेतकरी पेरणीच्या तयारीत आहे पण अपेक्षित पावासाची प्रतीक्षा प्रत्येकालाच लागून राहिली आहे. आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार 4 ते 5 दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावली तरी देखील सर्वकाही वेळेत होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.