पावसाने पाणी पातळीत वाढ मात्र, खरिपातील पिकांसह ऊसाचे नुकसान
आठवड्याभरापासून बरसत असलेल्या पावसाने (Rain) कहीं खुशी...कहीं गम असे चित्र निर्माण केले आहे. सोमवारी (Marathwada) मराठवाड्यातील तब्बल 16 मंडाळात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे या विभागातील सर्व मंडळांच्या (Water) पाणीपातळी कमालीची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे अतिरक्त पावसामुळे खरिपातील सोयाबीन, तूर, उडिद, मूग ही पिके धोक्यात आहेत.
औरंगाबाद : आठवड्याभरापासून बरसत असलेल्या पावसाने (Rain) कहीं खुशी…कहीं गम असे चित्र निर्माण केले आहे. सोमवारी (Marathwada) मराठवाड्यातील तब्बल 16 मंडाळात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे या विभागातील सर्व मंडळांच्या (Water) पाणीपातळी कमालीची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे अतिरक्त पावसामुळे काढणीला आलेली पिके ही पाण्यातच आहेत तर ऊस हा आडवा झाला आहे. (Heavy rain increased the water level but the crops were wasted) मध्यंतरी पावसाने ओढ दिल्याने खरिपातील सोयाबीन, तूर, उडिद, मूग ही पिके धोक्यात होती तर आता अधिकच्या पावसामुळे. पावसाच्या लहरीपणाचा परिणाम काय असतो याची प्रचिती शेतकऱ्यांना सध्या येत आहे. सोमवारी मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक 37. 9 मिमी तर उस्मानाबाद जिल्ह्यात 37.7 मिमी पाऊस बरसलेला आहे. बीडमध्ये राजूरी, पिंपळनेर, लिंबागणेश, पाटोदा, दासखेड, मादळमोही, पाचेगाव, उमापूर तर उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, नारंगवाडी, मुळूज, पारगाव या मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तसेच भूम तालु्क्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जालना आणि परभणी जिल्ह्यातही पावसाने तुफान बॅटींग केली आहे. पावसामध्ये सातत्य असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे परंतू, अतिरीक्त पावसामुळे पिकांची नासाडी तर झाली आहे शिवाय ऊसाची पडझड झाल्याने ऊस भुईसपाट झाला आहे. (Heavy rain increased the water level but the crops were wasted)
नदी, नाले ओव्हरफ्लो
गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्यात सुर्यदर्शन झालेले नाही. सतत पावसाच्या सरीवर सरी बरसत आहेत. त्यामुळे गावाकडच्या नद्या शिवाय नाले हे ओव्हरफ्लो झाले आहेत. निसर्गाने हिरवा शालू पांघरल्याचे चित्र सध्या मराठवाड्यात आहे. बीड जिल्ह्यातील सौताडा आणि कपिलधार येथील धबधबे हे ओसंडून वाहत आहेत.
पावसाची रीपरीप सुरुच
सलग चौथ्या दिवशीही मराठवाड्यात पावसाचा जोर हा कायम होता. मंगळवारी तर दिवस उजाडताच पावसाला सुरवात झाली होती. त्यामुळे उडीदाची काढणी ही खोळंबली आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाच्या लहरीपणाला सामोरे जावे लागले आहे. सुरवातीली पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या तर पिक ऐन बहरात असतानाच पावसाने ओढ दिल्याने उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे.
काढणी झालेल्या पिकाची योग्य खबरदारी घ्या
खरिप हंगामातील उडीद या पिकाची काढणी कामे जोमात सुरू होती. परंतु पावसाने गेल्या चार दिवसांपासून उसंतही घेतलेली नाही. ज्या पिकांची काढणी झाली आहे अशी पिक निवाऱ्याला ठेवणे आवश्यक असल्याचे मत कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी व्यक्त केले आहे. (Heavy rain increased the water level but the crops were wasted)
इतर संबंधित बातम्या :
लासलगांव पाठोपाठ येवला बाजार समितीचा ऐतिहासिक निर्णय, 70 वर्षांची प्रथा बंद, अमावस्येला लिलाव सुरु
कृषीप्रधान संस्कृतीचं प्रतीक बैलपोळा उत्साहात, शेतकऱ्यांकडून सर्जा-राजाचा सण साजरा
(Heavy rain increased the water level but the crops were wasted)