आयटी प्रोफेशनल ते शेतकरी बनलेल्या हिरेशा वर्मांची कमाल, मशरुम शेतीतून लाखोंची कमाई
आयटी व्यावसायिक महिला हिरेशा वर्मा यांच्या प्रयत्नांमुळे राज्याच्या ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. आयटी प्रोफेशनल हिरेशा वर्मा लोकांना मशरूमची लागवड आणि त्याची प्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून पैसे कमवण्याची संधी उपलब्ध करुन देत आहेत.
नवी दिल्ली: भारतातील मोठी लोकसंख्या रोजगाराच्या शोधात स्थलांतर करते. लोक आपली घरे सोडून इतर शहरांमध्ये जाऊन काम करतात. उत्तराखंडच्या डोंगराळ राज्यामध्येही अशीच परिस्थिती आहे. पण, आता आयटी व्यावसायिक महिला हिरेशा वर्मा यांच्या प्रयत्नांमुळे राज्याच्या ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. आयटी प्रोफेशनल हिरेशा वर्मा लोकांना मशरूमची लागवड आणि त्याची प्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून पैसे कमवण्याची संधी उपलब्ध करुन देत आहेत.
हिरेशा वर्मांच्या कामाची सुरुवात कशी झाली?
2013 मध्ये हिरेशा वर्मा यांनी ऑयस्टर मशरूमच्या 25 पिशव्या फक्त दोन हजार रुपये खर्चात खरेदी केल्या. हिरेशा यांनी पहिल्याच प्रयत्नात 5 हजार रुपये कमावले. ऑयस्टर मशरूमच्या लागवडीत यश मिळाल्यानंतर त्यांना मिल्ली अर्थात दुधाळ मशरूमच्या लागवडीतही यश मिळालं. सततच्या यशामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर मशरूमची लागवड करण्याची प्रेरणा मिळाली. हिरेशा वर्मा यांनी डेहराडून येथील कृषी विज्ञान केंद्रातून (केव्हीके) प्रशिक्षण घेतले आणि मशरूमच्या विविध जातींची माहिती घेतली आणि लागवडीच्या पद्धतीही जाणून घेतल्या.
प्रशिक्षण घेतलं
2014 मध्ये हिरेशा वर्मा यांनी मशरूम संशोधन संचालनालय, सोलन, हिमाचल प्रदेश कडून प्रशिक्षण देखील घेतले. मशरूम विभाग, डेहराडूनशी खते आणि बियाणे वगैरे NHM आणि NHB आर्थिक मदतीसाठी वर्मा यांनी संपर्क साधला. डेहराडून जवळच्या गावात मशरूमच्या 500 पिशव्या ठेवता येतील इतकी तीन बांबूची शेड बांधली.
हितेशा वर्मा यांनी पुढे ऑयस्टर मशरूम दोन वेळा उत्पन्न घेतलं. योग्य तापमान ठेवून दोन वर्षे हंगामी लागवड केली. यानंतर हिरेशा यांनी मशरूम लागवडीसाठी विविध संस्थांकडून तांत्रिक माहिती मिळवायला सुरुवात केली. हिरेशा वर्मांनी पुढील काळात दररोज 20 किलो मशरूमचे उत्पादन करून हे आता त्या यशस्वी उद्योजक बनल्या आहेत. हिरेशा वर्मा यांनी मशरुम शेतीतून आतापर्यंत लाखो रुपये मिळवले आहेत.
2000 लोकांना प्रशिक्षण
हिरेशा वर्मा यांनी आता मशरूम उत्पादनामध्ये चांगलाच जम बसवला आहे. आधुनिक उत्पादन उपकरणे आणि सुविधांची व्यवस्था वर्मा यांनी केलीय. 1000 किलो प्रतिदिन उत्पादन क्षमतेच्या वर्मा यांच्या शेतात 10 वातानुकूलित खोल्या आहेत. त्याठिकाणी वर्षभर मशरूमचे उत्पादन चालू असते. या शेतात 15 लोक काम करत आहेत. हिरेशा वर्मा यांनी आतापर्यंत 2000 महिला आणि शेतकऱ्यांना मशरूम लागवडीसाठी प्रशिक्षण दिले आहे. हिरेशा आता औषधी मशरूमच्या वाणांची लागवड करत आहेत.
मशरूम उत्पादनाबरोबरच हिरेशा वर्मा यांनी मशरुमच्या प्रक्रिया उद्योगही सुरु केले आहेत. मशरूमपासून लोणचे, कुकीज, नगेट्स, सूप, प्रथिने पावडर, चहा आणि पापड यांसारख्या मशरूममधून उप-उत्पादने बनवत आहेत. हिरेशा वर्मा यांच्या प्रयत्नांसाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत.
इतर बातम्या:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं पुढचं पाऊल, ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम सुरु होणार, वाचा सविस्तर
जमीन खरेदी विक्रीसाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी आवश्यक, परिपत्रकात नेमकं काय म्हटलंय?
Hiresha Verma It professional turn farmer earn lakhs from mushroom farming creating employment opportunity to create rural people