Summer Season : हिरवेगार कलिंगड आतून लाल अन् चवीला गोड ओळखावे कसे? जाणून घ्या सर्वकाही

सध्या उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत आहेत. ज्याप्रमाणे ऊन वाढत आहे त्याचप्रमाणे दुसरीकडे कलिंगडाचे दरही वाढत आहेत. महागडी कलिंगड खरेदी करीत असताना ते कसे निघेल? आतमधून लाल असेलच का असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होतात. देवाची कर्णी आणि नारळात पाणी कसे हे सांगणे जेवढे कठीण आहे अगदी त्याप्रमाणेच बाहेरुन हिरवेगार असणारे कलिंगड आतमधून लाल कसे हे सांगणे आहे.

Summer Season : हिरवेगार कलिंगड आतून लाल अन् चवीला गोड ओळखावे कसे? जाणून घ्या सर्वकाही
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 5:10 AM

लातूर : सध्या (Summer Season) उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत आहेत. ज्याप्रमाणे ऊन वाढत आहे त्याचप्रमाणे दुसरीकडे (Watermelon) कलिंगडाचे दरही वाढत आहेत. महागडी कलिंगड खरेदी करीत असताना ते कसे निघेल? आतमधून लाल असेलच का असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होतात. देवाची कर्णी आणि नारळात पाणी कसे हे सांगणे जेवढे कठीण आहे अगदी त्याप्रमाणेच बाहेरुन हिरवेगार असणारे कलिंगड आतमधून लाल कसे हे सांगणे आहे. मात्र, काही अशा खुना आहेत ज्या कलिंगडची क्वालिटी लक्षात आणून देणाऱ्या आहेत. उन्हाळ्यात कलिंगडच्या मागणीत वाढ होत आहे. मात्र, वाढत्या दराप्रमाणेच (Watermelon Quality) कलिंगडही दर्जेदार असणे गरजेचे आहे. याकरिता काही टीप्स आहेत ज्या ग्राहकांना लक्षात ठेवाव्या लागणार आहेत.

कलिंगडच्या सालाचा रंग तपासा

कलिंगड हे एकतर पूर्ण हिरवे किंवा हिरवे पट्टे आणि पिवळे पट्टे अशा प्रकारचे असतात. गडद आणि हिरव्या रंगाचे साल असलेले कलिंगड हे गोड असण्याची शक्यता असते. तर एकसारखे पट्टे असणारे कलिंगडही गोड असते. पण यापेक्षा उलच म्हणजेच फिक्कट रंगाचे किंवा त्य़ापेक्षा वेगळे हे कलिंगड गोड असेलच असे नाही. त्यामुळे सालावरुन कलिंगड कोणत्या दर्जाचे आहे हे लक्षात येते.

आतला रंग तपासणेही गरजेचे

सध्या कलिंगडाच्या किमंतीमध्ये वाढ होत आहे. यापूर्वी नगावर कलिंगड विकले जात होते पण आता किलोप्रमाणे दर आकारले जात आहेत. त्यामुळे कलिंगड खरेदी करताना ते विक्रेत्याकडून जागेवरच कापून पहावे. आतमध्ये लाल असेल तर ते चवीला गोडही असते. त्यामुळे आतला भाग कापून पाहून कलिंगड खरेदी करणे आवश्यक आहे.आतून कलिंगड गुलाबी, पांढरे किंवा काळे असेल तर ते गोड नसते. त्यामुळे आतल्या रंगावरुनही तुम्ही कलिंगड चांगले आहे की नाही हे ओळखू शकता.

वासावरुनही ओळखता येते चव

कलिंगड हे आतून गोड आणि रवाळ असेल तर त्याचा गोड वास येतो. शिवाय यावरुन ते ताजे असल्याचेही लक्षात येते. आणि जर कलिंगड खूप जुने किंवा आतून खराब आणि कडवट असेल तर त्याचा वास हा आंबट येतो. असा वास आल्यास ते खाण्यायोग्य किंवा चवीला चांगले नाही असा अंदाज बांधता येतो. त्यामुळे या अगदी क्षुल्लक गोष्टी असल्या तरी यामधून कलिंगडचा दर्जा लक्षात येणार आहे. शिवाय शेतकऱ्यांनाही आपला माल कोणत्या प्रतिचा आहे त्यावरुन किंमतही ठरवता येते.

संबंधित बातम्या

मक्याच्या दरात वाढ फायदा तांदूळ उत्पादकांना, रशिया-युक्रेन युध्दामुळे भारतीय शेतीमालाला मागणी

Onion : कांद्याच्या घटत्या दरावर रामबाण उपाय, ना वाहतूकीचा खर्च ना दरातील चढ-उताराची धाकधूक..!

Sugarcane: अगोदर अतिरिक्त ऊसाचा अहवाल मग तोडणीचे नियोजन, नगदी पिकातून शेतकऱ्याचे नुकसान

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.