Summer Season : उन्हाळी सोयाबीनचा नवा प्रयोग, कसा होईल यशस्वी?
आता पर्यंत कृषी विभागाकडून याबाबत जनजागृती केली जात होती पण आता प्रत्यक्ष वेळच तशी आल्याने शेतकऱ्यांनी हा बदल स्वीकारला आहे. म्हणूनच यंदा उन्हाळी हंगामात मोठी वाढ झाली आहे. विशेषत: खरिपात सोयाबीनचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी याच पिकाच्या पेरणीवर अधिकचा भर दिला आहे.
औरंगाबाद: उत्पादनवाढीसाठी शेतकरी पीक पध्दतीमध्ये बदल तर करीत आहे पण याला अधिक पाठबळ मिळाले ते निसर्गाच्या लहरीपणामुळे. गेल्या काही वर्षापासून (Climate Change) वातावरणातील बदलामुळे शेती पिकाचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. तेच नुकसान भरुन काढण्यासाठी आता नवनवीन प्रयोग शेतकरी राबवत आहेत. आता पर्यंत (Agricultural Department) कृषी विभागाकडून याबाबत जनजागृती केली जात होती पण आता प्रत्यक्ष वेळच तशी आल्याने शेतकऱ्यांनी हा बदल स्वीकारला आहे. म्हणूनच यंदा (Summer Season) उन्हाळी हंगामात मोठी वाढ झाली आहे. विशेषत: खरिपात सोयाबीनचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी याच पिकाच्या पेरणीवर अधिकचा भर दिला आहे. पाण्याची उपलब्धता आणि पोषक वातावरण यामुळे जे खरिपात झाले नाही ते उन्हाळी हंगामात घडवून आणण्यामध्ये शेतकरी व्यस्त आहे. सध्या उन्हाळी हंगामाचा अंतिम टप्पा असला तरी सोयाबीनवरच अधिकचा भर दिला जात आहे.
अशी घ्या काळजी..!
उन्हाळी सोयाबीन हा प्रयोग तर नवीनच आहे पण एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. हे बेमोसमी असल्यामुळे खरिपाप्रमाणे या सोयाबीनला उतार मिळेल का नाही याबाबत साशंका आहे. पण शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीसाठी हे धाडस केले आहे. त्य़ामुळे पीक पध्दतीमध्ये बदल घडून येणार आहे. त्यामुळे आता पेरणीपासून प्रत्येक टप्प्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादनामध्ये एकात्मिक कीटक व्यवस्थापन केल्यास अधिकचा फायदा होणार आहे. त्यामुळे निंबोळी अर्क, बिव्हेरिया बॅसियानासारख्या जैविक तसेच इमामेक्टिन बेन्झाएट, क्लोरअॅट्रनिलीप्रोल अशा रासायनिक कीटकनाशकाचा एकात्मिक वापर केल्यास नक्कीच फायदा होणार असल्याचे कृषी सहायक अजय राठोड यांनी सांगितले आहे.
वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांचा भर
खरीप हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनचे दर कमी असले तरी मध्यावर दरात वाढ झाली होती. सोयाबीनचे घटलेले उत्पादन आणि शेतकऱ्यांनी दरवाढ झाल्याशिवाय विक्री नाही हा भूमिका घेतल्याने 4 हजारावरील सोयाबीन हे सध्या 6 हजार 200 वर येऊन ठेपले आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून हे दर टिकून आहेत. त्यामुळे पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता असल्याने उन्हाळी सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. काही भागात सोयाबीनला फलधारणा झालेली आहे. तर दुसरीकडे दरही टिकून आहेत त्यामुळे अजूनही 15 दिवस सोयाबीनचा पेरा सुरुच राहणार असल्याचा अंदाज कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या :
Agricultural prices : पणन मंडळाचा उपक्रम, आता घरबसल्याच शेतकऱ्यांना कळणार शेतीमालाचे दर
Kharif Season : हंगाम सुरु होताच तुरीची विक्रमी आवक, मोजमापसाठी दोन दिवसाचा कालावधी..!