खवय्यांना आता जिवंत मासे, मस्त्य उत्पादकांचीही भरभराट, लाईव्ह फिश कॅरियर सिस्टीम नेमकी काय?

शेती आणि संबंधित व्यवसायांमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला जात आहे. लुधियाना येथील संस्थेनं एक प्रणाली यंत्रणा तयार केली आहे. त्या प्रणालीमध्ये जिवंत माशांची वाहतूक करता येते.

खवय्यांना आता जिवंत मासे, मस्त्य उत्पादकांचीही भरभराट, लाईव्ह फिश कॅरियर सिस्टीम नेमकी काय?
मासेमारी
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 8:04 AM

नवी दिल्ली: शेती आणि संबंधित व्यवसायांमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे  शोध लावले जात आहे. लुधियाना येथील संस्थेनं एक यंत्रणा तयार केली आहे. त्या यंत्रणेत जिवंत माशांची वाहतूक करता येते. यामध्ये ग्राहकांना थेट जिंवत मासे पोहोचवले जातात.

भारतात बऱ्याच ठिकाणी मासे खाल्ले जातात. मासे खाणारा एक वर्ग आपल्या देशात आहे. अनेक कारणांमुळे मत्स्य उत्पादक शेतकरी त्यांच्या ग्राहकांना जिवंत मासे देऊ शकत नाहीत. बाजाारत विक्रीसाठी नेताना वाटेत मासे मरतात. परिणामी मच्छिमारांना मासळीची संपूर्ण किंमत बाजारात मिळू शकत नाही. डीडी किसानच्या अहवालानुसार, आता सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, लुधियाना यांनी या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.

लाईव्ह फिश कॅरियर सिस्टम

लाईव्ह फिश कॅरियर सिस्टम अर्थात LFCS द्वारे ग्राहकांपर्यंत थेट मासे देण्यात येतात. ही यंत्रणा ई-रिक्षावर बसवण्यात आली आहे. ही यंत्रणा डीसी पॉवरवर चालते, यामध्ये चार बॅटरी बसवण्यात आल्या आहेत.एकदा चार्ज केल्यानंतर 500 किलो वजन 80 किमी पर्यंत नेण्यास सक्षम आहे. वाहतुकीदरम्यान मासे जिवंत ठेवण्यासाठी वेंटिलेशन, फिल्टरेशन आणि अमोनिया काढण्यासह सर्व सुविधा उपलब्ध आहेत. अर्धा ते दीड किलो वजनाचा कॉर्प घेतला गेला तर 40 किलोमीटरच्या प्रवासादरम्यान मृत्यूचे प्रमाण 1 टक्क्यापेक्षा कमी आहे.

एकावेळी 100 किलो माशांची वाहतूक

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या वाहनातून गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील माशांची वाहतूक करता येते. हे वाहन एका वेळी 100 किलो जिवंत मासे वाहून नेऊ शकते. आवश्यक असल्यास त्याची वाहून नेण्याची क्षमता वाढवता येऊ शकते. किरकोळ बाजारात जिवंत मासे वाहून नेण्याव्यतिरिक्त, त्याचा वापर मत्स्यपालनासाठी तलावांमध्ये मत्स्य बियाणे नेण्यासाठी केला जात आहे.

एक व्यक्ती चालूव शकतो

अनेक मत्स्य उत्पादक शेतकरी या मोबाईल व्हेईकलचा वापर करत आहेत. संपूर्ण यंत्रणा असलेल्या या वाहनाची किंमत सुमारे 2 लाख रुपये आहे. पाणी वाचवण्यासाठी देखील हे खूप प्रभावी आहे. पारंपारिक पद्धतीपेक्षा 50 टक्के पाण्याची बचत यामध्ये होते.

हे वापरण्यास खूप सोपे असून एक कामगार हे सर्व नियंत्रित करु शकतो. हे वाहन कमी खर्चिक आणि पर्यावरणास अनुकूल आहे. ग्राहकांना ताजे आणि दर्जेदार मासे यामुळं उपलब्ध होतात.

इतर बातम्या:

फ्लावर-कोबी करताय, मग सावधान, ‘या’ कंपनीचं बियाणं बोगस असल्याचा गंभीर आरोप

धक्कादायक, कांद्यावर यूरिया फेकत 450 पिशव्यांचं नुकसान; शेतकऱ्याचं साडे तीन लाखांचं नुकसान

Live fish supply to customer by LFCS special system fishermen also get benefit

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.