Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हायड्रोजेल तंत्रज्ञानामुळे शेतीव्यवसायात अमूलाग्र बदल, सिंचनाचा प्रश्न मार्गी अणखी बरेच काही

काळाच्या ओघात शेती व्यवसयाचे स्वरुप बदलत आहे. असे असले तरी सिंचन व्यवस्थेला एक वेगळेच महत्व आहे. याशिवाय ना उत्पादनात वाढ आहे ना शेती व्यवसायात प्रगती. उत्पादनात वाढ झाली असली तरी आजही सिंचनाचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागलेला नाही. वेळीच पिकांना पाणी मिळाले नाही तर नुकसान हे ठरलेलेच आहे. त्याचा थेट उत्पादनावर परिणाम होतो. पण शेतीला पाणी देण्याचा वेगळाच मार्ग कृषी शास्त्रज्ञांनी आखलेला आहे. ज्याचे नाव हायड्रोजेल आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा का ते शेतात टाकले की वर्षभर कोरडवाहू हंगामात शेतकऱ्यांना कोणत्याच अडचणी उद्भवत नाहीत.

हायड्रोजेल तंत्रज्ञानामुळे शेतीव्यवसायात अमूलाग्र बदल, सिंचनाचा प्रश्न मार्गी अणखी बरेच काही
हायड्रोजेल तंत्र वापरुन सिंचन व्यवस्था सुलभ करता येणार आहे.
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 4:35 PM

मुंबई : काळाच्या ओघात (Farming) शेती व्यवसयाचे स्वरुप बदलत आहे. असे असले तरी (Irrigation) सिंचन व्यवस्थेला एक वेगळेच महत्व आहे. याशिवाय ना उत्पादनात वाढ आहे ना शेती व्यवसायात प्रगती. उत्पादनात वाढ झाली असली तरी आजही सिंचनाचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागलेला नाही. वेळीच पिकांना पाणी मिळाले नाही तर नुकसान हे ठरलेलेच आहे. त्याचा थेट उत्पादनावर परिणाम होतो. पण शेतीला पाणी देण्याचा वेगळाच मार्ग कृषी शास्त्रज्ञांनी आखलेला आहे. ज्याचे नाव (Hydrogel) हायड्रोजेल आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा का ते शेतात टाकले की वर्षभर कोरडवाहू हंगामात शेतकऱ्यांना कोणत्याच अडचणी उद्भवत नाहीत. याशिवाय या तंत्राचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे हे तंत्र शेतकऱ्यांसाठी एक वेगळाच आशेचा किरण आहे. ज्यामुळे उत्पादनात तर वाढ होईलच पण अनेक दिवसांमुळे जे नुकासन होत हेते ते देखील टळणार आहे. झारखंडच्या रांची येथील इंडियन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रेझिन अँड ग्लू येथेही हायड्रोजेल तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. येथे विकसित झालेल्या हायड्रॅगलचे वैशिष्ट्य म्हणजे ते अर्ध-कृत्रिम असते आणि काही काळानंतर ते जमिनीत शिरते परंतु त्याच्या गुणवत्तेवर किंवा उत्पादकतेवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही.

हायड्रोजेल तंत्रज्ञान म्हणजे काय?

गवारपासून बनवलेल्या गोंदमध्ये पाण्याची प्रचंड क्षमता असते. हायड्रोजेल तंत्रासाठी या गोंदची पावडर वापरली जाते. शेतात टाकल्यानंतर ते एक वर्ष शेतात राहते. त्यानंतर मात्र, हळूहळू त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होत जाते. त्यानंतर ते जमिनीत मुरते. असे असले तरी पावसाळ्यात पाऊस पडला की हायड्रोजेलमध्ये वापरण्यात येणारी पावडर पाणी शोषून घेते. पाण्याच्या शोषणानंतर पाणी जमिनीत खाली जात नाही. यानंतर पाऊस संपला की या पावडरमध्ये असलेला ओलावा हा शेत सिंचन करण्यास उपयोगी ठरतो. यानंतर तो ओलावा संपला की तो पुन्हा सुकतो, मग पुन्हा पाऊस पडला की ओलावा लागतो.

असा करा तंत्रज्ञानाचा वापर

हे हायड्रोजेल तंत्र वापरण्यापूर्वी शेतकऱ्यांनी शेताची चांगली नांगरणी करून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर शेतात एकरी 1 ते 4 किलो हायड्रोजेल शेतीक्षेत्रात पसरावे लागणार आहे. त्यानंतर यामध्ये पीक लावले तरी चालणार आहे. तसेच बागायती लागवडीमध्ये वनस्पतींच्या मुळाजवळ हलका खड्डा करून हायड्रोजेल टाकावे. येथेही हायड्रोजेल दुष्काळात पाणी शोषून आर्द्रता सोडण्याच्या पद्धतीवर काम करते. याचे बियाणे दुकानांमध्ये तर मिळतेच पण ऑनलाईनही मागवता येते. आयआयएनआरजीचे शास्त्रज्ञ डॉ. नंदकिशोर ठोंबरे सांगतात की, हे तंत्र दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. त्याचा वापर करून शेतकरी आरामात पीक घेऊ शकतात.

 संबंधित बातम्या :

शेवटी नुकसानच : धावपळ करुन बाजारपेठ गाठली जे वावरात झालं नाही ते बाजार समितीमध्ये घडलं

Maharashtra Budget Session 2022: ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये बळीराजा केंद्रस्थानी, शेती समृद्धीसाठी अजित पवारांच्या मेगा प्लॅनमधल्या 10 मोठ्या घोषणा

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे: अखेर शेतकरी अपघात विम्याचा मार्ग मोकळा, काय आहे प्रक्रिया? वाचा सविस्तर

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.