पिकांवर किडीचा प्रादुर्भाव पण मावा की तांबोरा अगोदर ‘असा’ ओळखा फरक अन् मगच व्यस्थापन करा अन्यथा…

ढगाळ वातावरणाचा रब्बी हंगामातील पिकांना फटका बसत आहे. सततच्या वातावरणातील बदलामुळे सूर्यफुल, गहू, हरभरा या पिकांवर मावा, तांबोरा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र, या दोन्ही रोगांमधील फरकच शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे किडनाशक फवारणी करुनही त्याचा फारसा परिणाम होत नाही. उलट पिकावर त्याचा विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट होते.

पिकांवर किडीचा प्रादुर्भाव पण मावा की तांबोरा अगोदर 'असा' ओळखा फरक अन् मगच व्यस्थापन करा अन्यथा...
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 4:39 PM

लातूर : ढगाळ वातावरणाचा (Rabi season) रब्बी हंगामातील पिकांना फटका बसत आहे. सततच्या वातावरणातील बदलामुळे सूर्यफुल, गहू, हरभरा या पिकांवर (pest infestation on crops) मावा, तांबोरा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र, या दोन्ही रोगांमधील फरकच शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे किडनाशक फवारणी करुनही त्याचा फारसा परिणाम होत नाही. उलट पिकावर त्याचा विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट होते. यंदा रब्बीसाठी सर्वकाही पोषक आहे केवळ सातत्याने वातावरणात होत असलेले बदल शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे योग्य नियोजनाबरोबरच योग्य किटकनाशकांची निवड करणेही तेवढेच महत्वाचे आहे.

असा ओळखा मावा अन् तांबोरा किडीतील फरक

सध्याचे ढगाळ वातावरण आणि रात्रीचे व दिवसाच्या तापमानातील फरक यामुळे गहू पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव होतो. अनेक वेळा मावा किडीच्या विष्ठेद्वारे पानांवर, खोड़ावर व गव्हाच्या कोवळ्या शेंड्यावर टाकल्या जाणाऱ्या चिकट द्रवाच्या स्वरुपातील काळ्या बुरशाला तांबोरा समतजून फवारणी करतो. मात्र, यामुळे मावा किडीचा बंदोबस्त तर होत नाही पण उत्पादनात मोठी घट होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळ्या बुरशीच्या ठिकाणी गव्हाच्या पानाने स्पर्श करावा, त्यामधून माव्याची हलचाल सहज लक्षात येते. यावरुन मावा का तांबोरा किडीचा प्रादुर्भाव आहे लक्षात येते. योग्य निदान झाल्यावरच राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनेचा फायदा होतो.

मावा किडीवर असे मिळवा नियंत्रण

सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर मावा आणि तांबोरा याचा अधिकचा परिणाम दिसून येत आहे. यामुळे उत्पादनात घट निर्माण होते. तर मावा किडीचा बंदोबस्त करण्यासाठी थायोमिथोक्झम किंवा असिटामिप्रिड किंवा व्हर्तीसिलीयमची फवारणी करावी लागणार आहे. या फवारणीनंतरच मावा किडीचे नियंत्रण होणार आहे.

तांबोरा रोगाचा धोका अन् व्यवस्थापन

तांबोरा रोग हा अधिकतर गव्हावर पडतो. वातावरणातील बदलामुळे याचा प्रादुर्भाव वाढतो. या किडीच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनाझोल प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी लागणार आहे. एवढेच नाही तर तांबोरा, मावा नष्ट होण्यासाठी पुरेशा प्रमाणात सुर्यप्रकाश देखील महत्वाचा आहे.

कोवळ्या पिकावरच फवारणी

यंदा दीड महिन्याने रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडलेल्या आहेत. ऑक्टोंबर महिन्यातच संपणारा पेरा यंदा डिसेंबर अखेरच्या टप्प्यात असतानाही सुरुच आहेत. पहिल्या पेऱ्यातील पिकांची उगवण झाली आहे. मात्र, अवकाळीनंतर निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव हा वाढलेला होता. उगवण होताच रोगाची लागण झाली होती. त्यामुळे पिके कोवळ्या अवस्थेत असतानाच फवारणी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली होती. पण आता कुठे थंडी वाढत असल्याने पिकांची वाढही होते आहे. वातावरण कोरडे राहणे हेच सध्या महत्वाचे आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market | सोयाबीनच्या दराला उतरती कळा, साठवणूक केलेल्या सोयाबीनचे करायचे काय?

Onion Rate | कांद्याच्या दराचा लहरीपणा, आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत काय आहे चित्र?

Video | नादखुळा : 1600 किलोचा रेडा कृषी प्रदर्शनात सेंटर ऑफ अट्रॅक्शन, किंमत ऐकून चक्रावून जाल!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.