Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इफकोचं पुढचं पाऊल, नॅनो यूरीयाचे ब्राझीलसह अर्जेंटिनात प्लांट उभारणार

इंडियन फार्मर फर्टिलायजर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड म्हणजेच इफकोनं (Iffco) शेतकऱ्यांसाठी नॅनो यूरिया (Nano Urea) 31 मे रोजी लाँच केला आहे.

इफकोचं पुढचं पाऊल, नॅनो यूरीयाचे ब्राझीलसह अर्जेंटिनात प्लांट उभारणार
नॅनो यूरीया
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 1:17 PM

नवी दिल्ली: इंडियन फार्मर फर्टिलायजर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड म्हणजेच इफकोनं (Iffco) शेतकऱ्यांसाठी नॅनो यूरिया (Nano Urea) 31 मे रोजी लाँच केला आहे. इफकोच्या 50 व्या वार्षिक बैठकीत याचं लाँचिंग करण्यात आलं होतं. नॅनो यूरीयाचं देशातील शेतकऱ्यांना वितरण करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच नॅनो यूरीयाचा पहिला ट्रक महाराष्ट्राकडे पाठवण्यात आला आहे. नॅनो यूरीयाच्या माध्यमातून इफकोनं जागतिक पातळीवर डंका गाजवला आहे. इफकोचे प्रमुख निर्देशक डॉ. उदय शंकर अवस्थी यांनी माहिती दिली आहे.

इफको ब्राझील, अर्जेंटिनामध्ये प्लांट लावणार

डॉ. उदय शंकर अवस्थी यांनी इफको आंतरराष्ट्रीय पातळीवर इफकोनं ब्राझील, अर्जेंटिना आणि इतर देशांमध्ये नॅनो यूरीयाच्या (Nano Urea) उत्पादनासाठी यूनिट निर्मिती करणार आहेत. इफकोकडून फिलीपाईन्स, इंडोनेशिया, मलेशिया आणि दक्षिण कोरिया या देशांसोबत चर्चा सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीचा भारत सदस्य आहे.

नॅनो यूरीया नेमका काय?

नॅनो यूरियाच्या 500 मिलीमध्ये 40 हजार पीपीएम नायट्रोजन असतो. त्यामुळे यूरीयाच्या 50 किलोच्या बॅग इतकी पोषणतत्वे यामाध्यमातून मिळतील. नॅनो यूरिया हा स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आला आहे. कलोल येथील नॅनो जैवतंत्रज्ञान संशोधन संस्थेमध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे. नॅनो यूरिया शेतकऱ्यांना मंगळवार पासून उपलब्ध होईल. नॅनो यूरियाची 500 मिली बॉटल 240 रुपयांना उपलब्ध होणार आहे. सामान्य यूरियाच्या दहा टक्के किमतीला शेतकऱ्यांना नॅनो यूरिया उपलब्ध होईल. नॅनो यूरियाच्या वापरासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

94 पिकांवर चाचणी

राष्ट्रीय कृषी संशोधन प्रणालीच्या अंतर्गत 20 आयसीएआर, देशातील कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रांमध्ये 43 पिकांवर चाचणी करण्यात आली. यानंतर संपूर्ण भारतातील पिकांवरील परिणामकारकता तपासण्यासाठी 94 पिंकावर चाचणी करण्यात आली. नॅनो यूरियाच्या वापरामुळे पिकांच्या 8 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

नॅनो यूरियाचा फायदा काय?

नॅनो यूरियाची निर्मिती आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर शेती या अंतर्गत करण्यात आली आहे. इफको नॅनो यूरिया पिकांवर प्रभावी ठरला आहे. नॅनो यूरिया जमिनीतील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी देखील फायदा होणार आहे. ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी नॅनो यूरियाचा प्रभावी ठरणार आहे. शेतकऱ्यांनी नॅनो यूरियाचा वापर केल्यास मातीची गुणवत्ता सुधारण्यास देखील मदत होणार आहे. नॅनो यूरियामुळे पिकांची गुणवत्ता वाढवण्यासा देखील मदत होणार आहे

संबंधित बातम्या:

IFFCO च्या नॅनो लिक्विड यूरियाचं व्यावसायिक उत्पादन सुरु, गुजरातमधून पहिली खेप ‘या’ राज्याकडे रवाना

इफकोकडून शेतकऱ्यांना खरिप हंगामापूर्वी गिफ्ट, नॅनो युरिया लाँच, पैसेही वाचणार

Iffco will launch Nano Urea plant in Brazil and Argentina and other nations