Maharashtra Rain: पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासाठी पुढील 4 तास महत्त्वाचे , मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

भारतीय हवामान विभागनं पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. heavy rainfall alert

Maharashtra Rain: पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासाठी पुढील 4 तास महत्त्वाचे , मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा
sangli rain
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 4:55 PM

मुंबई: भारतीय हवामान विभागनं पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे. रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा पुणे गोवा पुढच्या 3 ते 4 तासात मुसळधार पावसाची शक्यता उपग्रह चित्रामध्ये दिसत आहे, अशी माहिती दिलीय. याअगोदर हवामान विभागानं या जिल्ह्यांना ऑरेज अ‌ॅलर्ट जारी केलेल आहे. (IMD issue heavy rainfall alert Raigad Sindhudurg Ratnagiri Satara Sangli Kolhapur and Pune for next four hours)

के. एस. होसाळीकर यांचं ट्विट

दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राला ऑरेंज अ‌ॅलर्ट

आज पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांमध्ये मुंबई आणि ठाण्यामध्ये विविध ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

19 आणि 20 जूनला महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात रेड किंवा ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

जळगावात पावसाची हजेरी

जळगाव शहरासह जिल्ह्यात दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली शहरात जलधारा चांगल्याच बरसल्या. त्यामुळे सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना पाण्यातून वाट काढावी लागली. जिल्ह्यातील बहुसंख्य भागात पाऊस झाला. त्यामुळे आता खरिपाच्या पेरणीला वेग येणार आहे.

माथेरानमध्ये जोरदार पाऊस

माथेरान मध्ये जोरदार पाऊस पडत असल्याने माथेरानच्या घाटामध्ये दगडं पडली आहेत. त्यामुळे नेरळ हुन माथेरान जाताना वाहन चालकांना त्रास होत आहे.

मुरबाडमध्ये मुसळधार पाऊस

आज दुपारी मुरबाड मध्ये मुसळधार पाऊस पडल्याने बाजरपेठेत पाणी साचले होते. आज दुपारी मुरबाड मध्ये झालेल्या मुसळधार पावसाने मुरबाड बाजरपेठे मध्ये पावसाचे पाणी तुंबल्याने गुढघाभर पाणी रस्त्यावर साचल्याने मुंबई सारखी मुरबडची परिस्थिती झाली. या पावसाच्या पाण्याने मुरबाड बाजारपेठेतील दुकानदार व नागग्रीकांची तारांबळ उडाली.

कोल्हापूरमध्ये पंचगंगेची पाणी पातळी वाढली

गेल्या तीन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.पंचगंगा नदीची पाणीपातळी 34 फुटांवर गेली असून तिची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. पावसाचा जोर कायम असल्याने नदीचे पाणी आता आजूबाजूच्या शेतात पसरायला सुरुवात झालीय. वाढलेल्या पाणीपातळी पंचगंगेचं मनात धडकी भरवणार रूप पुन्हा एकदा पाहायला मिळतय.

संबंधित बातम्या:

Kolhapur Rain | कोल्हापुरात संततधार, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, पंचगंगेची पाणी पातळी 23 फुटांवर

Maharashtra News LIVE Update | सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, तेरेखोल नदीला पूर

(IMD issue heavy rainfall alert Raigad Sindhudurg Ratnagiri Satara Sangli Kolhapur and Pune for next four hours)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.