केरळमध्ये मान्सून दाखल झाला हे कसं ठरवलं जात? हवामान विभागाचे नेमके निकष काय?

मान्सून केरळमध्ये दाखल झाला हे ठरवण्यासाठी भारतीय हवामान विभागानं काही निकष निश्चित केले आहेत. IMD Monsoon Kerala

केरळमध्ये मान्सून दाखल झाला हे कसं ठरवलं जात? हवामान विभागाचे नेमके निकष काय?
अतिवृष्टीचा इशारा
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 12:12 PM

मुंबई: भारतीय हवामान विभागानं केरळमध्ये मान्सून 3 जूनला पोहोचणार असल्याचं सांगितलं आहे. हवामान विभागानं यापूर्वी मान्सून 1 जूनला पोहोचणार असल्याचं सांगितलं होतं. यास आणि तोक्ते चक्रीवादळाच्या परिणामामुळे 31 मे रोजी मान्सून केरळात दाखल होईल, असंही सांगण्यात आलं होते. मान्सून केरळात दाखल झाला की नाही हे घोषित करण्यासाठी काही निकष भारतीय हवामान विभागानं निश्चित केले आहेत. त्याविषयी हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी त्यांच्या ट्विटरवरुन माहिती दिली आहे. (IMD when declared monsoon reach at Kerala what is criteria)

केरळमध्ये मान्सून दाखल झाला हे कशाच्या आधारे ठरतं?

भारतीय हवामान विभागाच्यावतीनं केरळमध्ये मान्सून पोहोचला की नाही हे सांगण्यासाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत. त्यामध्ये केरळातील 14 ठिकाणांवरील पावसाचं प्रमाण, वाऱ्यांचा वेग आणि ऑऊटगोईंक लाँगव्हेव रेडिएशन याचा समावशे आहे.

केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठीचे निकष:

1.पाऊस:14 स्टेशन्स पैकी, 60% स्टेशन्सने 2 दिवस 2.5 mm किंवा जास्त पावसांची नोंद करणे (10मे नंतर ),तर दुसऱ्या दिवशी 2.वारे फील्ड: वेस्टरलीज़ची उंची (Westerly winds) 600 hpa पर्यंत असणे, गती 15-20kts 3.आऊटगोइंग लाँगवेव्ह रेडिएशन < 200wm-2

14  केंद्र कोणती

हवामान विभागानं निश्चित केलेल्या 14 केंद्रांपैकी 60 टक्के स्टेशन्सवर 10 मे नंतर 2 दिवसांमध्ये 2.5 mm पावसाची नोंद होणं आवश्यक आहे. यामध्ये मिनीकॉय, अमिनी, थिरुअनंतरपुरम, पुनालूर, कोल्लम, अल्लापुझा, कोट्टायम, कोची, थ्रिसुर, कोझिकोडे, थलासरी, कन्नूर, कुडूलू आणि मंगलोर केंद्राचा समावेश आहे. यापैकी 60 टक्के म्हणजेच जवळापास 9 ठिकाणी दोन दिवसांमध्ये 2.5 mm पावसाची नोंद होणं आवश्यक आहे. वारे फील्ड या निकषामध्ये वेस्टरलीज़ची उंची (Westerly winds) 600 hpa पर्यंत असणे आवश्यक असून त्याची गती 15-20kts असली पाहिजे. तर, आऊटगोइंग लाँगवेव्ह रेडिएशन < 200wm-2 इतकं आहे.

मान्सून 3 जूनला केरळमध्ये

भारतीय हवामान विभागानं नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 3 जूनला केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं यापूर्वी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असं सांगितलं होते.

यंदाचे पर्जन्यमान कसे असेल?

स्कायमेटच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Weather Update: महाराष्ट्रावर मान्सूनपूर्व पाऊस बरसणार?, राज्यातील आजचं वातावरण कसं राहणार?

Weather Alert | मान्सूनचं आगमन लांबणीवर, महाराष्ट्रात कधी पोहोचणार?

(IMD when declared monsoon reach at Kerala what is criteria)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.