बैलाच्या खांद्यावरील सुज वेदनादायी अन् कामावर परिणाम करणारी, काय आहेत उपाय?
शेती कामाबरोबरच जनावरांच्या आरोग्याकडेही लक्ष देणे तेवढेच महत्वाचे आहे. सध्या रब्बी हंगामातील मशागतीची कामे ही सुरु आहेत. कुळवणी, मोगड़णी ही कामे आजही बैलजोडीच्या माध्यमातूनच केली जातात. मात्र, कमी कालावधीत अधिकचे काम करुन घेतल्यास बैलांना खांदेसुजीचा त्रास होऊ शकतो.
लातूर : शेती कामाबरोबरच जनावरांच्या (Animal Health ) आरोग्याकडेही लक्ष देणे तेवढेच महत्वाचे आहे. (agricultural work ) सध्या रब्बी हंगामातील मशागतीची कामे ही सुरु आहेत. कुळवणी, मोगड़णी ही कामे आजही बैलजोडीच्या माध्यमातूनच केली जातात. (Shoulder problems) मात्र, कमी कालावधीत अधिकचे काम करुन घेतल्यास बैलांना खांदेसुजीचा त्रास होऊ शकतो. शिवाय यामधूनच वेगळे आजारही होतात. बैल जु ला जुंपला की खीळ आणि जु यादध्ये मानेची कातडी ही दबली जाते. त्यामुळे खांदेसुज होते. बैलजोडी ही काही समान ऊंचीची नसते. ऊंची कमी-जास्त झाली की एकाच बैलाच्या खांद्यावर कामाचा भार पडतो आणि जु समांतर न राहिल्यानेही खांदेसुज होती. खांदेसुजीची ही लहान-मोठी कारणे असले तरी बैलासाठी ती असह्य आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे.
काय आहेच खांदेसुजीची लक्षणे
* अधिकचे काम झाले की, खांद्यावरील भागावर भयंकर सूज येते. *सुज ही खांद्याची कातडी व त्याखाली त्वचेच्या भागावर येते. *जु ओढताना खांद्याचे कातडी ही मागच्या बाजूस जोराने ओढली गेल्यामुळे कातडी खालील पडदा वेगळा होऊन त्वचेखाली रक्त साचते. *खांद्यावर सातत्याने जु असल्याने ही सूज गरम व अत्यंत वेदनादायी असते. *सुजेचा आकार सुरवातीला हा लिंबसारखा असतो मात्र, कालांतराने तो वाढतही जातो. *जास्त दिवस सुज राहिल्यास सुज मउ पडते, पुन्हा मात्र, त्यामध्ये पाणी होऊन कडक लागणारी असू शकते. *सुजे तून फुटून पाणी येऊ शकते. *खांदेस सूज आलेल्या बैलाला आराम दिल्यास सूज कमी होते कामाला जुपल्यास पुन्हा वाढते. *खांदे शूज झालेला बैल उपचाराविना कामास जुपल्यास कातडीवर लहान-लहान जखम होऊन बेंड तयार होते.
खांदे सुजीवर उपचार
*खांदेसुजीची लक्षणे जनावरात दिसल्यास पशुवैद्यकाकडून उपचार करावा. *नुकत्याच झालेल्या खांदे सुजित सुजलेल्या भागावर चार ते पाच दिवस खांदे सूज कमी करणारे मलम लावावे. *ताज्या सुजीस बर्फाने तीन ते चार दिवस शेकावे. हा घरगुती उपाय असून प्रत्येक शेतकऱ्यास करता येणारा आहे. *खांद्याला सुज आली की लागलीच मॅग्नेशियम सल्फेट, ग्लिसरीन मिसळून खांद्यावर लावल्यास सूज कमी होते. *जुन्या सुजी साठी गरम वाळू कपड्यात गुंडाळून चार ते पाच दिवस शेक द्यावा. गरम पाण्याने सुद्धा शेक दिला तरी चालतो. *शेक देताना जनावरास भाजणार नाही याची खात्री करून घ्यावी. कारणा सुजीमुळे तेथील त्वचा ही नरम झालेली असते. त्यामुळे त्वचा भाजण्याची शक्यता अधिक असते. गरम पाणी किंवा भुस्सा यांचे तापमान आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा थोडे जास्त असावे. यासाठी गरम पाणी, वाळू, भुशाचा प्रथम आपण स्पर्श करून पहावा त्याचे तापमान कमी आहे याची खात्री होईल. *खांद्यावर आलेल्या गाठी मधून पु येत असेल तर पशुवैद्यकाकडून छोटी शस्त्रक्रिया करून घेऊन त्यातील पुकाढून टाकावा.आणि त्याचे रोज ड्रेसिंग करावे. *उपचार करत असणाऱ्या जनावरास कामात जुंपू नये आणि पूर्ण आराम द्यावा. *औषधोपचाराने जर खांद्यावरील गाठी कमी होत नसतील तर खांद्यावर पशुवैद्यकाकडून छोटीशी शस्त्रक्रिया करून त्या काढून टाकाव्यात त्यानंतर योग्य औषधोपचार व काळजी घ्यावी. (Impact of bull’s shoulder on agriculture, what are the measures)
संबंधित बातम्या :
कापसामध्येही सावकारकी ! तोंडी सौदे करुन शेतकऱ्यांची होतेय लूट
रब्बीसाठी मिळणार नव्या वाणाचे अनुदानीत हरभरा बियाणे ; काय होणार फायदा?
आता नाही मजुरांची चिंता, 8 तासात 80 किलो कापसाची होणार वेचणी