Rabi Season: अवकाळी, गारपिटीनंतर आता धुक्याचे सावट, खरिपापाठोपाठ रब्बीही धोक्यात
रब्बी हंगामातील पिकांचा पेरा होताच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची नामुष्की ओढावली होती. शिवाय त्यांनंतर महिन्याकाठी अवकाळी पावसामध्ये सातत्या असल्याने पिकांच्या वाढीवर तर परिणाम झालाच होता पण हे संकट कमी म्हणून की काय गेल्या आठ दिवसांपासून मराठवाड्यात ढगाळ वातावरण आणि आता धुके याचा परिणाम पिकांवर होत आहे.
नांदेड : खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरुन काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता. मात्र, संकटाची मालिका ही रब्बी हंगामातही सुरुच आहे. त्यामुळे वाढीव उत्पादन तर सोडाच पण शेतकऱ्यांनी जे जमिनीत गाढले आहे त्याची भरपाई तरी होते की नाही अशी परस्थिती निर्माण झाली आहे. (Rabi Season) रब्बी हंगामातील पिकांचा पेरा होताच (Untimely Rain) अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची नामुष्की ओढावली होती. शिवाय त्यांनंतर महिन्याकाठी अवकाळी पावसामध्ये सातत्या असल्याने पिकांच्या वाढीवर तर परिणाम झालाच होता पण हे संकट कमी म्हणून की काय गेल्या आठ दिवसांपासून (Marathwada) मराठवाड्यात ढगाळ वातावरण आणि आता धुके याचा परिणाम पिकांवर होत आहे. विशेषत: ज्वारी पीक काळंडले असून गहू, हरभरा या पिकांची वाढ खुंटलेली आहे. त्यामुळे उत्पादनावर अधिकचा खर्च करावा की नाही अशी स्थिती बळीराजाची झाली आहे.
काय आहे कृषीतज्ञांचा सल्ला?
वातवरण कोरडे झाल्यावरच शेतकऱ्यांना पिकांचे व्यवस्थापन हे करता येणार आहे. सध्याच्या वातावरणात फवारणीचा प्रयोग केला तर तो फसणार असून अपेक्षित फायदा होणार नाही. त्यामुळे वेळ आणि पैसा हा दोन्हीही खर्ची होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोरड्या वातारणात आणि ते ही भर दुपारीच निंबोळी अर्क, ॲझाडिरॅक्टिन 5 मि.लि प्रति लिटर, एचएएनपीव्ही 500 एलई हे किंवा 1 मिलि प्रति लिटर किंवा क्विनॉलफॉस 2 मि.लि पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी लागणार आहे. तर ‘T’ आकाराचे पक्षिथांबे हेक्टरी 20 प्रमाणात उभारावे लागणार आहेत. त्यामुळे पक्षीभक्षक शेतातील अळ्या वेचून खातात. शेतात हेलील्युर वापरून हेक्टरी पाच कामगंध सापळे पिकापासून एक फूट उंचीच्या अंतरावर उभे करावे लागणार आहेत.
हरभरा फुलोऱ्यात मात्र, घाटी अळीचा प्रादुर्भाव
रब्बी हंगामात मुख्य पिकाची जागा यंदा हबभरा या पिकाने घेतलेली आहे. पोषक वातावरण आणि कृषी विभागाकडून करण्यात आलेला बियाणांचा पुरवठा यामुळे हरभरा पिकाच्या क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे. आतापर्यंत सर्वकाही सुरळीत होते मात्र, वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम याच पिकावर झालेला आहे. हरभऱ्यावर घाटीअळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. उत्पादनवाढीसाठी हरभरा हेच पीक महत्वाचे मानले जात आहे. पण वाढत्या अळीच्या प्रादुर्भावामुळे घाटे लागवडीवरही त्याचा परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तर आता दाट धुके यामुळे उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे खरिपापाठोपाठ रब्बीतही उत्पादन घटणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
लातूर, नांदेडमध्ये धुक्याची चादर
रब्बी हंगामातील पेरण्या ह्या उशिराने झाल्या असल्या तरी पोषक वातावरणामुळे पिकाची वाढ जोमात झाली होती. मात्र, वातावरणातील बदलाचा परिणाम काय असतो याचा सामना शेतकरी करीत आहेत. गेल्या चार दिवसांपासून नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दाट धुक्याची चादर पसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे ज्वारी तर काळवंडत आहेच पण गहू, करडई या पिकावरही विपरीत परिणाम होत आहे. थंड वातावरणातच रब्बी हंगामातील पिके जोमात वाढतात मात्र, त्याचा अतिरेक झाला की, काय स्थिती होते याची प्रचिती मराठवाड्यातील शेतकऱ्यांना येत आहे. त्यामुळे उत्पन्नापेक्षा उत्पादनावरच अधिकचा खर्च होणार या चिंतेत बळीराजा आहे.
संबंधित बातम्या :
Organic Farming: सेंद्रीय पध्दतीने पिकवलेला टोमॅटो 400 रुपये किलो अन् वर्षभर उत्पादन
खतांच्या वाढलेल्या किंमती पूर्ववत करा, दादा भुसे यांचे मनसुख मांडविय यांना पत्र