Damage Orchards : द्राक्ष मण्यांना तडे, अंतिम टप्प्यातील केळीबागाही उध्वस्त, आता संरक्षणाशिवाय पर्याय नाही

गेल्या काही दिवसांपासून गारठा वाढत आहे तर तापमानात घट होत असल्याने द्राक्ष मण्यांची फुगवण आणि त्यामध्ये साखर उतरण्यास अडचण निर्माण होत आहे. बागा ऐन बहरात असताना अवकाळी आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम झाला होता तर आता वाढत्या गारव्यामुळे मण्यांना तडेच जात असल्याने थेट उत्पादनावरच त्याचा परिणाम होत आहे.

Damage Orchards : द्राक्ष मण्यांना तडे, अंतिम टप्प्यातील केळीबागाही उध्वस्त, आता संरक्षणाशिवाय पर्याय नाही
केळी बागांचे संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 9:49 AM

नंदुबार : खरीप हंगामात ज्याप्रमाणे पिकांचे नुकासान झाले होते त्यापेक्षा अधिकचा फटका सध्याच्या वातावरणातील बदलाचा फळबागांना बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून (Climate change) गारठा वाढत आहे तर तापमानात घट होत असल्याने द्राक्ष मण्यांची फुगवण आणि त्यामध्ये साखर उतरण्यास अडचण निर्माण होत आहे. बागा ऐन बहरात असताना अवकाळी आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम झाला होता तर आता वाढत्या गारव्यामुळे मण्यांना तडेच जात असल्याने थेट उत्पादनावरच त्याचा परिणाम होत आहे. तर दुसरीकडे खानदेशात वाऱ्यामुळे (Impact on Orchard) केळीची पाने फाटत आहे. याचा परिणाम पिकाच्या वाढीवर होत असून सर्वकाही नुकसनीचे ठरत आहे. याशिवाय अणखीन तीन दिवस थंडीचा जोर कायम असल्याचा अंदाज (Meteorological Department) हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली असून आता पीक संरक्षणाशिवाय शेतकऱ्यांकडे पर्यायच उरलेला नाही.

वातावरणातील बदलाने द्राक्ष मण्यांना तडे

केवळ थंडीचा जोर वाढला असे नाही तर सकाळी पडणारे दव आणि धुके तसेच दुपारी पडणाऱ्या उन्हाच्या चटक्यामुळे द्राक्ष मण्यांवर बर्निंग आणि उकड्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे द्राक्ष मण्यांना तडे तर जात आहेत पण यामध्ये साखरेचे प्रमाणही कमी होत आहे. सध्याच्या वातावरणाचा परिणाम थेट द्राक्ष मण्यांच्या फुगवणीवर होत असून या काळात योग्य तो पाणीपुरवठा करुन बागांच्या पेशी कार्यन्वित ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे. अन्यथा केसासारखे तडे गेल्यावर त्याचा परिणाम थेट दरावर होणार आहे.

पपई, केळी फळावर पॉलिथिन चे आवरण गरजेचे

सातपुड्याच्या डोंगराळ भागात गेल्या चार दिवसांपासून कडाक्याची थंडी असून तिचा परिणाम जनजीवनावर होत आहे. या भागात तापमान 8 अंश च्या जवळपास आसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. सध्या पपई आणि केळीच्या बागा अंतिम टप्प्यात आहेत. असे असतानाच वारा आणि बदलत्या वातावरणामुळे केळीची पाने फाटत आहेत तर बागाही उध्वस्त होत आहे. या प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी पॉलिथिनचे आवरण घातले तर किमान फळांचे तरी संरक्षण होणार आहे. सध्याचे नुकसान म्हणजे थेट उत्पादनावर परिणाम असे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला कृषितज्ञ प्रा डॉ.पद्माकर कुंदे यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

…म्हणून जानेवारी महिन्यातच खोदल्या जातात अधिकतर विहीरी, काय आहेत कारणे? वाचा सविस्तर

Medicinal Plants : कोरोना काळात वाढतेय औषधी वनस्पतीचे महत्व, तुळशीच्या रोपांना अधिकची मागणी

Budget 2022 : शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांची शक्यता, पायाभूत सुविधांचा विकास, निर्यातीला प्रोत्साहन मिळणार?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.