Farmer Advice: वाढलेली हुडहुडी अन् घटलेल्या तापमानाचा रब्बी पिकांवर परिणाम, कृषी विज्ञान केंद्राचा काय आहे सल्ला?
सध्या मराठवाड्यात ढगाळ वातावरण घटलेले तापमान आणि वाढत असलेला गारवा असे विचित्र परस्थिती निर्माण झाली आहे. किमान तापमान 9 अंश तर कमाल तापमान 22 अंश सेल्सिअस एवढे आहे. निसर्गाचा लहरीपणा हा काही दिवसांपूरताच मर्यादित असतो पण यंदा सबंध वर्षभर कायम वातावरणात बदल राहिलेला आहे. त्याचा परिणाम खरीप हंगामातील उत्पादनात घट झाली होती तर आता रब्बी हंगामातील पिकांवरही याचा परिणाम झालेला आहे.
जालना : सध्या मराठवाड्यात (Changes in environment) ढगाळ वातावरण घटलेले तापमान आणि वाढत असलेला गारवा असे विचित्र परस्थिती निर्माण झाली आहे. किमान तापमान 9 अंश तर कमाल तापमान 22 अंश सेल्सिअस एवढे आहे. निसर्गाचा लहरीपणा हा काही दिवसांपूरताच मर्यादित असतो पण यंदा सबंध वर्षभर कायम वातावरणात बदल राहिलेला आहे. त्याचा परिणाम खरीप हंगामातील उत्पादनात घट झाली होती तर आता (Rabi Season) रब्बी हंगामातील पिकांवरही याचा परिणाम झालेला आहे. फळबागांमध्ये सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना बसलेला होता. राज्यात विविध भागांमध्ये झालेली गारपिट याचा देखील परिणाम पिकावर आणि जनावरांच्या आरोग्यावर देखील झालेला आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये आवश्यकता आहे ती योग्य मार्गदर्शनाची. तीच भूमिका आता (Marathwada) मराठवाड्यातील कृषी विज्ञान केंद्र पार पाडत आहे. त्यामुळे मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत येत असलेल्या खरपूडी कृषी विज्ञान केंद्राचा शेतकऱ्यांना काय सल्ला राहणार आहे याची माहिती घेणार आहोत.
ज्वारी पिकावर मावा, कीडीचा प्रादुर्भाव
कधीकाळी ज्वारी हे रब्बी हंगामातील मुख्य पीक होते. मात्र, उत्पादनाच्या दृष्टीने पीक पध्दतीमध्ये बदल होत गेला आणि ज्वारीची जागा आता हरभरा या पिकाने घेतलेली आहे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे या पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव होऊन चिकटा येण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी निंबोळी अर्क 10,000 पीपीएम 10 मिली किंवा डायमेथोएट 30 टक्के 20 मिली प्रति 10 लि. पाण्यात मिसळून फवारणी करायची आहे.
मका पिकाचे असे करा व्यवस्थापन
रब्बी हंगामात चारा आणि उत्पादनाच्या दृष्टीने मकाचे पीक घेतले जाते. आता जोमात वाढ होत असतानाच या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी इमामकेटीन बेंझोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा क्लोरोनट्रेंनिलीप्रोल 18.5 टक्के 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागणार आहे. गव्हावर देखील मावा रोगाचाच प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी निंबोळी अर्क 10,000 पीपीएम 10 मिली किंवा डायमेथोएट 30 टक्के 20 मिली प्रति 10 लि. पाण्यात मिसळून फवारणी केली तर फायद्याचे राहणार आहे.
कांदा पिकावर करप्याचा प्रादुर्भाव
वातावरणातील बदलाचा परिणाम सर्वात आगोदर कांदा पिकावरच दिसून येतो. नव्याने लागवड केलेल्या कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. त्यामुळे मॅनकोझेब 25 ग्रॅम, डायथेन एम 45- हे 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास प्रादुर्भाव कमी होणार आहे. तर फळबागांमध्ये द्राक्षावर भुरी रोगाची वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बुरशी नाशकाची फवारणी करण्याचा सल्ला खरपुडी कृषी विज्ञान केंद्राच्या (जिल्हा जालना) वतीने देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना अडचण असल्यास 7350013147 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे अवाहनही करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
Cotton Rate : कापसाचे उत्पादन घटले मात्र, विक्रमी दरामुळे भरपाई, काय आहे विदर्भातले चित्र?
E-Shram Card : असंघटीत कामगारांसाठीची योजना, नोंदणी आणि काय मिळणार लाभ, वाचा सविस्तर