पावसाचा परिणाम आगामी हंगामावरही, बीजोत्पादन घटणार, दर वाढणार
आगामी खरीप हंगामात (Kharif) पेरणीच्या दरम्यानच शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन खराब झालेले आहे. काही ठिकाणी तर जागेवरच सोयाबीनला कोंभ फुटलेले आहेत. त्यामुळे बीजोत्पादनावर याचा परिणाम होणार आहे.
लातूर : पावसाने खरीपातील पीके सध्याही पाण्यातच आहेत. त्यामुळे उत्पादनात (Decline in production) तर घट होतच आहे. पण या पावसाचा परिणाम काही यावर्षीपुरताच मर्यादीत नाही तर पुढील काही वर्ष याचा शेतकऱ्यांवर परिणाम हा राहणार आहे. आता यंदा झालेल्या पावसाचा परिणाम पुढे काय होणार असा प्रश्न तुमच्या मनात आलेला आहे. पण पाऊसाच एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे की, आगामी खरीप हंगामात (Kharif) पेरणीच्या दरम्यानच शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन खराब झालेले आहे. काही ठिकाणी तर जागेवरच सोयाबीनला कोंभ फुटलेले आहेत. त्यामुळे बीजोत्पादनावर याचा परिणाम होणार आहे.
राज्यात यंदा सर्वाधिक 52 लाख हेक्टरवर लागवड झालेली आहे. गेल्या काही वर्षांत शेतकरी कमी कालावधीच्या वाणाकडे वळालेले आहेत. हे वाण काढून रब्बीची पेरणी शेतकरी साधत असतात. मागील वर्षापासून मात्र लवकर येणारे वाण प्रामुख्याने पावसाच्या तडाख्यात सापडत आहेत. ओलाव्यामुळे झाड, शेंगावर बुरशी तयार होत आहे. सध्या काही भागांत सोयाबीनच्या शेंगा वाळलेल्या आहेत. या शेंगांमधूनच नव्हे तर हिरव्या शेंगातूनही कोंब अंकुरलेले दिसत आहेत.
बीजोत्पादन कंपन्यांना अडचणींचा सामना
सोयाबीन पीकाचा दर्जा चांगला असेल तर बीयाणेही उत्तम दर्जाचे होते. यंदा मात्र, सोयाबीनचे पीकच खराब झालेले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम बीजोत्पादनावर होणार आहे. सोयाबीनच्या बीजोत्पादनाची प्रक्रिया ही शेती कंपन्यामध्ये होत असते. अधिकतर बीज हे अकोला तालुक्यात निर्मित होत असते पण या भागातही पावसाने थैमान घातलेले आहे. काढणी झालेल्या तसेच वावरात असलेल्या सोयाबीनला देखील कोंभ फुटलेले आहेत. त्यामुळे बीजोत्पादनाला अडचणी निर्माण होणार आहेत.
दाणेदार सोयाबीनला महत्व, शेतकऱ्यांनाही मिळणार मोबदला
पावसापुर्वीच किंवा उशीराने पेरणी झालेल्या सोयाबीनचा दर्जा हा टिकून आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची गडबड न करता हे सोयाबीन साठवणूक करुन ठेवले तर अधिक फायद्याचे होणार आहे. आगामी हंगामात बीजोत्पादनात या सोयाबीनचा वापर होणार आहे. त्या दरम्यान, सोयाबीनला योग्य दर मिळणार आहे. त्यामुळे सध्या सोयाबीनला योग्य दर नसला तरी साठवणूक केल्यास शेकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
कमी कालावधीत येणाऱ्या वाणाला अधिकचे महत्व
रब्बीची पेरणी करण्याकरिता कमी कालावधीत येणाऱ्या सोयाबीनच्या बियाणाकडे शेतकऱ्यांचा कल राहिलेला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पावसाच्या तडाख्यात हे कमी कालावधीत बियाणे सापडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे बीजोत्पादनालाही अडचणी निर्माण होत आहे. पावसात सोयाबीन खराब झाल्याने आता पुढील हंगामातील बीजोत्पादनात अडचणी निर्माण होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बियाणाचे दरही वाढणार
पावसाने सोयाबीनचा दर्जा ढासळलेला आहे. तर काही ठिकणी सोयाबीनलाच कोंभ फुटलेले आहेत. यंदा 50 टक्क्यांहून अधिकच्या सोयाबीनचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बीजोत्पादन हे कमी प्रमाणात होणार असल्याने त्याची मागणी वाढणार आहे. मागणी वाढली की दर वाढणार असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. (Impact of rain: Soyabean seeds will also be in short supply in the coming season )
संबंधित बातम्या :
Special Story ! टोकण पध्दतीने सोयाबीनचे भरघोस उत्पादन, काय आहे टोकण पध्दत ?
पीक नुकसानीच्या पूर्वसूचनांचा ‘ढीग’, सर्व्हेक्षणात तक्रारी अपात्र
काय सांगता ? एकाच वनस्पतीतून टोमॅटो अन् वांग्याचे उत्पादन, दुहेरी फायदा