AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेशीम उद्योगाचे महत्व, ‘असा’ घ्या योजनेचा लाभ..!

रेशीम उद्योग एक शेती पूरक उद्योग आहे. सध्या विकास महामंडळाकडून सबंध राज्यभर महोरेशीम अभियान सुरु आहे. यामाध्यमातून रेशीम शेतीचे क्षेत्र वाढवून उत्पन्नाचा एक शाश्वत स्त्रोत निर्माण करणे आहे. सबंध राज्यातील जिल्ह्यांना या संदर्भात तुती लागवडीचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे शिवाय विकास महामंडळाचा रथ जिल्ह्यात नेमून दिलेल्या गावात जाऊन रेशीम उद्योगाचे महत्व पटवून देत आहे.

रेशीम उद्योगाचे महत्व, 'असा' घ्या योजनेचा लाभ..!
शेती पध्दतीमध्ये बदल होऊन आता शेतकऱ्यांचा कल तुती लागवडीकडे आहे. राज्यात तुती लागवडीचे क्षेत्र वाढत आहे.
| Edited By: | Updated on: Dec 04, 2021 | 7:19 AM
Share

लातूर : रेशीम ( Silk Industry) उद्योग एक शेती पूरक उद्योग आहे. सध्या विकास महामंडळाकडून सबंध (Maharashtra) राज्यभर महोरेशीम अभियान सुरु आहे. यामाध्यमातून रेशीम शेतीचे क्षेत्र वाढवून उत्पन्नाचा एक (sustainable production) शाश्वत स्त्रोत निर्माण करणे आहे. सबंध राज्यातील जिल्ह्यांना या संदर्भात तुती लागवडीचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे शिवाय विकास महामंडळाचा रथ जिल्ह्यात नेमून दिलेल्या गावात जाऊन रेशीम उद्योगाचे महत्व पटवून देत आहे. पण या जनजागृती बरोबरच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ कसा घ्यावयाचा हे देखील माहिती असणे आवश्यक आहे.

रेशीम उद्योग एक शाश्वत पर्याय

निसर्गात होणाऱ्या बदलामुळे हंगामी पिकांचे नुकसान हे दिवसेंदिवस वाढत आहे. यातच बाजारभाव देखील निश्चित नसल्याने उत्पन्नापेक्षा उत्पादनावरच अधिकचा खर्च हा शेतकऱ्यांना पदरून करावा लागत आहेत. तर दुसरीकडे रेशीम उद्योगापासून दरमहा शाश्वत उत्पन्न मिळू शकते. एकदा लागवड केली कि 12-15 वर्ष लागवडीचा खर्च नाही. तसेच एकदा संगोपन गृह तयार केले व साहित्य खरेदी केले कि पुन्हा पुन्हा खर्च नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे रेशीम शेतीत इतर बागायती पिकांच्या तुलनेत तुतीला पाणी कमी लागते. रेशीम अळ्यांच्या संगोपनासाठी पाला वापरला जात असल्याने तुती बागेस कीटकनाशके, बुरशीनाशके इ. फवारणीचा खर्च नाही. अळ्यांनी खाऊन राहिलेला पाला जनावरांना दिल्यास त्यांच्या दुधाच्या प्रमाणात व फॅट्स च्या प्रमाणामध्ये वाढ होते.

योजनांच्या माध्यमातून मिळेल लाभ

रेशीम उद्योग उभारणीसाठी शासनस्तरावर दोन महत्वाच्या योजना आहेत. यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून इच्छूकाला अनुदानाचा लाभ मिळणार आहे तर केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या सिल्क समग्र या माध्यमातूनही अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.

अनुदान किती आहे?

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी या योजने अंतर्गत 1 एकरसाठी तुती लागवड जोपासना तसेच साहित्य खरेदी यामध्ये रोपे, खते, औषधी यासाठी एकूण 2 लाख 176 रुपये इतके अनुदान 3 वर्षात विभागून दिले जाते. तसेच किटक संगोपन गृह बांधकामासाठी एका वर्षात 92 हजार 289 रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेत लाभ घेण्यासाठी मात्र, लाभार्थी यांचेकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. तर केंद्रच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या सिल्क समग्र ही योजना ज्यांच्यासाठीच आहे जे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत सहभाग घेऊ शकले नाहीत. सर्वसामान्य लाभार्थ्यांसाठी जॅाबकार्ड असेल तर एकूण खर्चाच्या 75 टक्के अनुदान हे तीन वर्षात मिळते. तर अनुसूचित जाती-जमातीमधील लाभार्थ्यांसाठी 90 टक्के अनुदान 3 वर्षात मिळते. किमान 1 एक्करमध्ये तुतीची लागवड ही बंधनकारक राहणार आहे.

अनुदानासाठी असा करा अर्ज

सर्व प्रथम रेशीम संचालनालयाची www.mahasilk.maharashtra.gov.in या वेबसाईट वर साईन अप मध्ये New user वर क्लिक करून I Agree केल्यानंतर Stake Holder मध्ये – Farmer – Mulberry/Tasar वर क्लीक करावे. त्यानंतर शेतकऱ्यांनी सर्व माहिती भरून शेवटी स्वतः चा पासपोर्ट साईजचा फोटो, आधार कार्ड व बँक पास बुक ची फोटो कॉपी Upload करावी. शेवटी Submit केल्यानंतर शेतकऱ्याचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन झाल्याचे कॉम्पुटर च्या screen वर sms येईल. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर संबंधित जिल्हा रेशीम कार्यालयास जाऊन 7/12, 8 अ, बँकेच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, जॉब कार्ड हे नोंदणी शुल्कासह देऊन नोंदणी पूर्ण करावी.

संबंधित बातम्या :

ऊस गाळप हंगाम मध्यावर, ऊसतोड कामगारांचा विकास मात्र कागदावरच

Latur Market: सोयाबीनचे दर पुर्वपदावर, शेतकऱ्यांचा मात्र सावध पवित्रा

Weather Update : आता उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी, पाऊस अन् वातावरणातही निर्माण होणार गारवा

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.