शेती व्यवसयात सौरकृषी पंपाचे महत्व, योग्य नियोजनामुळे उत्पादनातही वाढ

शेती व्यवसायात अनंत अडचणींचा सामना हा शेतकऱ्यांना करावा लागतो. शिवाय कष्ट करुनही पदरी मोबदला पडत नाही. काळाच्या ओघात आता शेतीपध्दतीमध्ये अमूलाग्र बदल होत आहे. पण प्रत्येक बदल स्वीकारावा अशी देशातील शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता नाही पण जे आवश्यक आहे त्यामध्ये तर बदल करावाच लागणार आहे. त्याच अनुशंगाने सिंचन हे महत्वाचे आहे. त्याशिवाय उत्पादन क्षमता ही वाढणारच नाही. म्हणूनच शेतीमध्ये सौर कृषी पंप हा महत्वाचा ठरत आहे.

शेती व्यवसयात सौरकृषी पंपाचे महत्व, योग्य नियोजनामुळे उत्पादनातही वाढ
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 2:32 PM

लातूर : शेती व्यवसायात अनंत अडचणींचा सामना हा (Farmer) शेतकऱ्यांना करावा लागतो. शिवाय कष्ट करुनही पदरी मोबदला पडत नाही. काळाच्या ओघात आता शेतीपध्दतीमध्ये अमूलाग्र बदल होत आहे. पण प्रत्येक बदल स्वीकारावा अशी देशातील शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता नाही पण जे आवश्यक आहे त्यामध्ये तर बदल करावाच लागणार आहे. त्याच अनुशंगाने सिंचन हे महत्वाचे आहे. त्याशिवाय उत्पादन क्षमता ही वाढणारच नाही. म्हणूनच शेतीमध्ये (Solar Agriculture Pumps) सौर कृषी पंप हा महत्वाचा ठरत आहे.

अनियमित वीज पुरवठा, कमी दाबाने पुरवठा शिवाय तांत्रिक बिघाड यामुळे पिकांना पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे सौर कृषी महत्वाचा ठरत आहे. सौर उर्जेवर चालणाऱ्या कृषी पंपांनामुळे बऱ्याच प्रकारच्या फायदा होत आहे. सौर कृषी पंपाचे फायदे काय याची माहिती आपण घेणार आहोत.

कमी खर्चात अधिकचा फायदा

सौर उर्जेवर चालणाऱ्या कृषी पंप मोफत मिळणाऱ्या सूर्य प्रकाशापासून चालतो. याकरीता वीज आणि डिझेलसारख्या महागड्या इंधनांवर अवलंबून राहायची गरज राहत नाही. तसेच त्याला चालवण्यासाठी परत-परत पैसे टाकायची सुद्धा गरज येत नाही. सूर्यप्रकाशामुळे सोलर पॅनल चार्ज होते. त्यामुळे गरजेनुसार सौर कृषी पंपला चालवून पाण्याचा उपयोग करू शकतो.

महागड्या इंधनांची गरज नसते

कृषीपंपाला पर्यांय म्हणून इंजिन हे समोर आले होते. पण याकरिता मोठ्या प्रमाणात इंधनाची आवश्यकता होती. हे डिझेलवर आधारित असल्याने खूप खर्चिक बाब होती. पण सौर कृषी पंपला इतर ऊर्जास्रोतांची गरज राहत नाही. सौर कृषी पंपासाठी फक्त सूर्य प्रकाश आणि सोलर पॅनलची आवश्यकता असते. त्यामुळे हा पॅनल आपण कुठल्याही कोपऱ्यात पिकांना पाणी पोहोचू शकतो. सौर कृषी पंप यांच्या वापरामुळे शेतकरी बऱ्याच प्रमाणात आत्मनिर्भर होत आहेत.

सौरकृषी पंप हा पर्यावरणानुकूल

सौर कृषी पंपामुळे कुठल्याही प्रकारचे ध्वनी किंवा वायू प्रदूषण होत नाही. हे पर्यावरणासाठी अनुकूल आहे. कारण सौर कृषी पंपाला अशा कुठल्याही इंधनाने चालवले जात नाही, ती त्यामुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होईल. या कृषी पंपाद्वारे कुठलाही हानिकारक पदार्थ वातावरणात सोडला जात नाही. त्यामुळे पर्यावरण प्रदूषणाचा समस्या दूर होते. सौर ऊर्जेच्या मदतीने कृषी पंप चालवणे फार सोपे आहे. कारण यामध्ये फार कमी प्रमाणात उपकरणांची आवश्यकता असते. तसेच पारंपारिक कृषी पंपप्रमाणे विजेची कपात, कमी होल्टेज यासारख्या समस्या येत नाहीत. ज्या ठिकाणी विजेचा पुरवठा होत नाही, त्याठिकाणी सौर कृषी पंप एक वरदान ठरत आहेत.

पाण्याचा योग्य वापर

उन्हाळ्यामध्ये जास्त पाण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्यामध्ये सोलर पॅनल जास्त उन्हामुळे भरपूर प्रमाणात चार्ज होतात. तसेच पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये सोलर एनर्जी कमी प्रमाणात तयार होते. सौर कृषी पंपाच्या वापरामुळे जास्त खर्च येत नाही. सौर त्यामुळे तयार झालेली अतिरिक्त ऊर्जा ऊर्जा ग्रेडला विकून उत्पन्नात एक चांगला स्त्रोत निर्माण होऊ शकतो.

संबंधित बातम्या :

‘ई-पीक पाहणी’ नंतर आता राज्य सरकारचे नवे धोरण, शेतकऱ्यांची वाढणार जाबाबदारी

पोषक वातावरण असतानाही रब्बी हंगाम धोक्यात, काय आहेत कारणं?

वातावरण बदलाचा परिणाम माशांच्या दरावर, इंदापूर बाजार समितीमध्ये घटली आवक

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.