शेतकऱ्यांसाठी महत्वाचे | पेरणीपुर्वची बिजप्रक्रिया अन् असे करा लष्करी अळीचे व्यवस्थापन

यंदा उन्हाळी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत आहे. उन्हाळी सोयाबीनचा सर्रास वापर हा खरीप हंगामातील बियाणासाठी केला जातो. मात्र, हे करीत असताना एक विशिष्ट प्रक्रिया आहे त्याचे अनुकरण केले तरच विद्यापीठाने ठरवून दिलेल्या शिफरशीनुसार बियाणांची उपवब्धी होणार आहे. तर दुसरीकडे रब्बी हंगामातील ज्वारी, मका, हरभरा याचा पेरा पूर्ण झाला असून या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे | पेरणीपुर्वची बिजप्रक्रिया अन् असे करा लष्करी अळीचे व्यवस्थापन
सोयाबीन बिजोत्पादन
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 12:37 PM

लातूर : खरीप हंगामात पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले असले तरी रब्बी हंगामातील पोषक वातावरणाचा फायदा शेतकरी घेऊ लागले आहेत. यंदा (summer season) उन्हाळी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत आहे. उन्हाळी ( Seed processing) सोयाबीनचा सर्रास वापर हा खरीप हंगामातील बियाणासाठी केला जातो. मात्र, हे करीत असताना एक विशिष्ट प्रक्रिया आहे त्याचे अनुकरण केले तरच विद्यापीठाने ठरवून दिलेल्या शिफरशीनुसार बियाणांची उपवब्धी होणार आहे. तर दुसरीकडे रब्बी हंगामातील ज्वारी, मका, हरभरा याचा पेरा पूर्ण झाला असून या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे बिजप्रक्रिया आणि लष्करीअळीचे व्यवस्थापन कसे करायचे याची माहिती घेणार आहोत..

महाबिजकडे बियाणे विक्री केल्यास अधिकचा फायदा

आता उन्हाळी सोयाबीन हे आगामी खरीप हंगामात बियाणांसाठीच उत्पादन घेतले जाते. मात्र, याकरिता शेतकऱ्यांनी महाबीजकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. शिवाय शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन घेतले आणि उत्पादीत बियाणांची विक्री ही महाबिजकडेच केली तर बाजारभावापेक्षा अधिकचा दर दिला जाणार आहे. त्यामुळे पोषक वातावरणामुळे वाढणारी उत्पादकता आणि मिळणारा दर यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचा विश्वास महाबिजकडून व्यक्त केला जात आहे.

15 जानेवारीपर्यंत पोषक वातावरण

पावसामुळे रब्बी हंगाम लांबणीवर पडलेला आहे. त्यामुळे आता उन्हाळी सोयाबीनचा पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. 15 डिसेंबर ते 15 जानेवारी या महिन्यात उन्हाळी सोयाबीनचा पेरा केला तर फायद्याचे राहणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे. पेरणीपूर्वी बियाणास 3 ग्रॅम कार्बोक्सीन अधिक थायरम 37.5 टक्के किंवा पेनफ्लुफेन 13.28 टक्के, 1 मिली किंवा थायोफिनेट मिथाईल अधिक पायराक्लोस्ट्रोबिन 3 मिली प्रति किलो बियाणे या बुरशीनाशकाची फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळे पेरणीनंतर सोयाबीन बहरात येईपर्यंत कोणत्या कीडीचा प्रादुर्भाव होणार नाही.

मका, ज्वारीवरील लष्करी अळीचे व्यवस्थापन

रब्बी हंगामातील मका आणि ज्वारी ही पोषक वातावरणामुळे बहरात आहेत. मात्र, मध्यंतरीच्या वातावरणामुळे लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के, एसजी ग्रॅम 6 किंवा थायमिथॅाक्झाम 12.6 टक्के अधिक लॅमडा साहलोथ्रीन 9.5 टक्के झेडसी संयुक्त कीटकनाशक 5 मिली किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल 18.5 टक्के एससी, 4 मिली किंवा स्पायनोटोरम 11.7 एस सी, 5 प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Red Chilly : नंदुरबारच्या बाजारपेठेत लाल मिरचीचा ‘ताल’, समितीच्या मैदानावरही वाहनांच्या रांगाच रांगा

काय सांगता ? महाराष्ट्र अग्रिमन अधिनिर्णय प्राधिकरणाच्या निर्णयामुळे शेतकरीही गेले चक्रावून, हळद म्हणे…

आंबा पाठोपाठ ‘या’ फळपिकाचाही हंगाम लांबणीवर, बागायतदारांना चिंता दराची

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.