Akola : ‘एफसीआय’च्या जाचक अटी, शेतकऱ्यांची पसंती ‘नाफेड’ला, अकोल्यात नेमकं काय घडलं?

यंदा प्रथमच अकोला, वाशिम या जिल्ह्यांमध्ये खाद्य निगम अर्थात एफसीआय ने शेतीमाल खरेदीला सुरवात केली होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून हरभरा खरेदीला सुरवातही झाली होती. शिवाय या संस्थेच्या माध्यमातून खरेदी केंद्रे ही उभारण्यात आले होते. पण खरेदी करताना लावण्यात आलेल्या अटी आणि निकषांमुळे शेतकरी मेटाकूटीला आला होता.

Akola : 'एफसीआय'च्या जाचक अटी, शेतकऱ्यांची पसंती 'नाफेड'ला, अकोल्यात नेमकं काय घडलं?
हरभऱ्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे.
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 1:10 PM

अकोला : केंद्र सरकारच्या माध्यमातून किमान किंमतीने ( Agricultural Commodities) शेतीमालाची खरेदी केली जाते. यासाठी (NAFED) ‘नाफेड’ संस्थेचा तर पुढाकार आहेच पण यंदा प्रथमच ‘एफसीआय’ म्हणजेच (FCI) भारतीय खाद्य निगमनेही सहभाग घेतला होता. पण एफसीआयच्या जाचक अटींमुळे त्रस्त शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याने अखेर हे खरेदी केंद्रातून एफसीआयने माघार घेतली आहे. तर पुन्हा खरेदी केंद्राची सूत्रे ही नाफेडकडेच आली आहेत. खासगी संस्थांच्या मनमानी कारभारामुळे मात्र, शेतकरी त्रस्त आहे. त्यामुळेच पुन्हा शेतीमाल खरेदी ही नाफेडच्या माध्यमातून केली जाणार आहे.

‘एफसीआय’चे निकष शेतकऱ्यांसाठी जाचक

यंदा प्रथमच अकोला, वाशिम या जिल्ह्यांमध्ये खाद्य निगम अर्थात एफसीआय ने शेतीमाल खरेदीला सुरवात केली होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून हरभरा खरेदीला सुरवातही झाली होती. शिवाय या संस्थेच्या माध्यमातून खरेदी केंद्रे ही उभारण्यात आले होते. पण खरेदी करताना लावण्यात आलेल्या अटी आणि निकषांमुळे शेतकरी मेटाकूटीला आला होता. खरेदीपेक्षा शेतकऱ्यांनी आणलेला माल परत जाण्याचीच धास्ती शेतकऱ्यांना होती. त्यामुळेच शेतकऱ्यांचा ओघ हा कमी होत होता. अखेर या संस्थेनेच यातून माघार घेतली आहे.

खरेदीचा वेग मंदावल्याने वरिष्ठांनी घेतला निर्णय

सध्या हरभऱ्याची आवक सुरु आहे. शिवाय उत्पादन वाढले असून खुल्या बाजारपेठेपेक्षा अधिकचा दर हा खरेदी केंद्रावर आहे. असे असतानाही शेतकरी एफसीआयच्या खरेदी केंद्राकडे फिरकत नाहीत. ही बाब वरिष्ठांच्या निदर्शास आली. त्यामुळे खरेदीचा वेग मंदावला आणि या संस्थेवरील दबाव हा वाढतच गेला. त्यामुळे अखेर एफसीआयने यामधून माघार घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

आता वाशिममध्येही नाफेडच करणार खरेदी

अकोला पाठोपाठ आता वाशिम जिल्ह्यातूनही एफसीआय माघार घेणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यामध्येही आता हरभऱ्याची खरेदी ही नाफेडच्या माध्यमातून होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाफेडच्या माध्यमातूनच शेतीमालाची खरेदी होत आहे. त्यामुळे या संस्थेची पध्दत आणि नियमावली ही शेतकऱ्यांना माहिती झाली आहे. पण एफसीआयची नवीन प्रणाली शेतकऱ्यांना रुचलीच नसल्याने त्यांना महिनाभरात आवरते घ्यावेल लागले आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.