जगात महाराष्ट्राचा कांदा लई भारी, तुम्ही कमाऊ शकता लाखो रुपये
महाराष्ट्रात सुमारे 1 लाख हेक्टरावर कांद्याची लागवड ही केली जाते. यामध्ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर, सातारा, हेक्टर, जिल्हा हेक्टर हे कांदा लागवडीसाठी प्रसिद्ध आहेत. नाशिक जिल्हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात कांदा लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. एकूण उत्पादनांपैकी महाराष्ट्रात 37% आणि भारतात 10% कांदा उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात आहे.
मुंबई : व्यापारीदृष्ट्या कांदा हे महत्वाचे पिक आहे. दररोजच्या आहारात कांद्याचा वापर हा होतोच. कांद्याची लागवड आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत महाराष्ट्र हा आग्रस्थानी आहे. महाराष्ट्रात सुमारे 1 लाख हेक्टरावर कांद्याची लागवड ही केली जाते. यामध्ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर, सातारा, हेक्टर, जिल्हा हेक्टर हे कांदा लागवडीसाठी प्रसिद्ध आहेत. नाशिक जिल्हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात कांदा लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. एकूण उत्पादनांपैकी महाराष्ट्रात 37% आणि भारतात 10% कांदा उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात आहे.
कांदा लागवड करताना जमीन आणि हवामान कसे असावे?
कांदा हे हिवाळी पिक आहे. कांदा लागवडीनंतर 1 ते 2 महिन्याने कांदा वाढीच्या दरम्यान जे वातावरण थंड होते ते वाढीसाठी पोषक मानले जाते. कांदा पिक ऐन बहरात असताना राज्यात उष्ण व दमट वातावरण होते त्याचा फायदा कांद्याचा आकार वाढण्यास होतो. महाराष्ट्रातील कांदा जून ते ऑक्टोबर या खरीप हंगामात आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात रब्बी हंगामात कांद्याची लागवड होते तर जानेवारी ते जून या कालावधीत उन्हाळी कांदा चांगला पिकला जातो. ओलसर माती आणि सेंद्रिय खताचा मारा कांद्याचे वाढीव उत्पादनासाठी महत्वाचा आहे.
लागवडा पुर्वीची तयारी
जमीन उभी व आडवी नांगरून जमिन ही सपाट केली जाते. या मशागत केलेल्या जमिनीत हेक्टरी 40 ते 50 टन खत घालावे.
कांद्याचे सुधारित प्रकार
बसवंत 780 : हे वाण खरीप आणि रब्बी हंगामासाठी योग्य असून गडद लाल रंग आहे. लागवड करुम दीड महिला उलटला की कांद्याचा आकर वाढण्यास सुरवात होते. 100 ते 110 दिवसांत या जातीचा कांदा परीपक्व होतो ज्याचे उत्पादन हेक्टरी 250 ते 300 क्विंटल एवढे असते.
एन-53 : खरीप हंगामासाठी हा योग्य प्रकार आहे. 100 ते 150 दिवसांत तयार होते. या प्रजातीचा रंग लाल चमकदार लाल. हेक्टरी उत्पन्न 200 ते 250 क्विंटल आहे.
पुसा रेड : कांदा मध्यम आकाराचा आणि पूर्णपणे लाल रंगाचा मध्यम गोल असताो. लागवडीपासून 120 दिवसांत तयार होतो. याचे हेक्टरी उत्पन्न 250 ते 300 क्विंटल आहे.
खते आणि पाण्याचा वापर
कांदा पिकाला नियमितपणे पाणी देणे महत्त्वाचे आहे. खरीप हंगामात 10 ते 12 दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळी रब्बी हंगामात 6 ते 8 दिवसांच्या अंतराने पाणी देणे गरजेचे आहे.
कांदा पीक कधी काढायचे
लागवडीनंतर 3 ते 4.5 महिन्यांत कांदा पीक काढणीला येतो. कांदाची पात पिवळी पडते आणि पाने गळून पडतात. याला मान मोडणे अशा पध्दतीने 60 ते 70 टक्के कांदा असा झाल्यास समजावे की काढणीला आला आहे. कुदळीच्या साहाय्याने आजूबाजूची माती सैल करून 4 ते 5 दिवसांनी काढणी कामाला सुरवात करावी. काढणीनंतर कांदा 4 ते 5 दिवस कांदा कोरडा वातावरणात ठेवावा. त्यामुळे चमक निर्माण होते. (In Maharashtra, onions are taken in record production, you can also earn lakhs of rupees)
संबंधित बातम्या :
सोयाबीनची आवक वाढली, दर स्थिरच, शेतकऱ्यांनी योग्य दराची प्रतिक्षा करावी
‘स्वाभिमानी’च्या ऊस परिषदे नंतरच कारखाने सुरु होतात, राजू शेट्टींचा खोचक टोला
उस्मानाबाद : पुनर्वसनाची मागणी करीत इर्ला ग्रामस्थांनी अडविले पालकमंत्र्यांना