Change in crop pattern : मराठवाड्यातही ऊस गाळपात अन् लागवड क्षेत्रातही होतेय वाढ
गेल्या तीन वर्षांपासून होत असलेल्या पावसामुळे येथील चित्र बदलत आहे तर दुसरीकडे ऊस गाळपासाठी आवश्यक असलेल्या साखर कारखान्यांचीही संख्या वाढत आहे. यंदाच्या ऊस गाळप हंगामात मराठवाड्यातील 55 साखर कारखान्यांनी 86 लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. ऊस गाळप हंगाम सुरु होऊन आता अडीच महिन्याचा कालावधी झाला असून आता कुठे गाळपाची गती ही वाढलेली आहे.
लातूर : मराठवाडा म्हणलं की दुष्काळी भाग आणि पारंपारिक शेती अशीच काय ती ओळख होती. पण आता (Marathwada) मराठवाड्यातील शेतकऱ्यांची मानसिकता आणि येथील वातावरणही बदलत आहे. ऊसाच्या क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून होत असलेल्या पावसामुळे येथील चित्र बदलत आहे तर दुसरीकडे ऊस गाळपासाठी आवश्यक असलेल्या साखर कारखान्यांचीही संख्या वाढत आहे. यंदाच्या (Sugarcane sludge) ऊस गाळप हंगामात मराठवाड्यातील 55 साखर कारखान्यांनी 86 लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. ऊस गाळप हंगाम सुरु होऊन आता अडीच महिन्याचा कालावधी झाला असून आता कुठे गाळपाची गती ही वाढलेली आहे. या सर्व प्रक्रियेतून 80 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
मराठवाड्यात 55 साखर कारखान्यातून ऊसाचे गाळप
यापूर्वी मराठवाड्यातील उस्मानाबाद, परंडा या भागातील ऊसाचे गाळप हे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांवर अवलंबून असायचे. आता मात्र, या विभागात 55 साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊसाचे गाळप होत आहे. यामध्ये सर्वाधिक 12 साखर कारखाने हे उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये आहेत. सुरु झालेल्या कारखान्यांपैकी 42 साखर कारखाने हे पूर्ण क्षमतेने सुरु आहेत तर उर्वरीत कारखान्यांमध्ये सरासरी एवढेही गाळप होत नाही. यामध्ये खासगी साखर कारखान्यांचाही समावेश आहे. आता कुठे गाळपाने वेग पकडला असून भविष्यात यामध्ये वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ऊसाच्या क्षेत्रामध्येही वाढ
मराठवाड्यात उत्पादनाच्यादृष्टीने केवळ खरीप हंगामालाच महत्व होते. आजही शेतकऱ्यांचे अर्थकारण याच हंगामावर अवलंबून आहे. परंतू गेल्या चार ते पाच वर्षापासून येथील परस्थितीही बदलत आहे. ऊसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झालेली आहे. यंदा तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने सर्व प्रकल्प हे तुडूंब भरुन आहेत. त्यामुळे पाण्याची चिंता मिटलेली आहे तर कारखान्यांची संख्या वाढत असल्याने गाळपाचेही चिंता नाही. त्यामुळे सर्वात मोठे नगदी पीक असलेल्या ऊसाच्या क्षेत्रात आणि गाळपात वाढ होत आहे.
अवकाळी पावसामुळे रखडले होते गाळप
यंदा हंगाम सुरु होण्यासच महिन्याचा विलंब झाला होता. शिवाय एफआरपी रकमेच्या थकबाकीपोटी अनेक साखर कारखान्यांना परवानगीच देण्यात आलेली नव्हती. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये गाळप हंगाम सुरु झाला तर अवकाळी पावसामुळे 8 दिवस गाळप हे बंद होते. ऊसतोडणी शक्य नव्हती शिवाय ज्या यंत्राद्वारे ऊसाची तोडणी केली जातेय ते यंत्रही वाफसा नसल्याने शेतामध्ये जात नव्हते. त्यामुळे याचा देखील परिणाम गाळपावर झालेला असल्याचे सांगण्यात येत आहे.