Aurangabad : अतिरिक्त ऊस फडातच राहणार, हतबल प्रशासन अन् चिंतेत शेतकरी, मराठवाड्याची स्थिती नेमकी काय?

यंदा ऊस गाळपाचा हंगाम मोठा रंजक राहिलेला आहे. दरवर्षी शेतकऱ्यांचा ऊस अधिक प्रमाणात गाळप व्हावा यासाठी कारखान्यांमध्ये स्पर्धा असते. यंदा मात्र चित्र उलचे राहिले आहे. नोंदणी असलेल्या ऊसाचे गाळप करुन आता अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम आहे. दरवर्षी 4 महिने सुरु राहणारा गाळपाचा हंगाम यंदा 7 महिने उलटले तरी सुरुच आहे.ऊस शिल्लक याचा अर्थ गाळप कमी असा नाही. कारण यंदा देशात सर्वाधिक गाळप हे महाराष्ट्रात झाले आहे.

Aurangabad : अतिरिक्त ऊस फडातच राहणार, हतबल प्रशासन अन् चिंतेत शेतकरी, मराठवाड्याची स्थिती नेमकी काय?
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 10:26 AM

औरंगाबाद : यंदाचा (Sugarcane Sludge) गाळप हंगाम सुरु झाल्यापासून चर्चेत असलेला (Surplus Sugarcane) अतिरिक्त उसाचा प्रश्न अंतिम टप्प्यातही कायम आहे आणि हंगामानंतरही तो सुटणार नसल्याचे चित्र मराठावाड्यात आहे. प्रशासनाकडून एक ना अनेक प्रकारची नियमावली आणि पर्याय समोर आणले पण प्रत्यक्षात त्याचा कितपत फायदा झाला हे फडातील शिल्लक उसावरुन स्पष्ट होत आहे. कारण एकट्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 80 हजार मेट्रीक टन ऊस गाळपाविना फडात उभा आहे. जिल्ह्यात 7 पैकी 4 (Sugar Factory) साखर कारखाने हे सुरु आहेत आणि दिवसाकाठी 6 हजार मेट्रीक टनाचे गाळप होत आहे. त्यामुळे अशा पध्दतीने संपूर्ण उसाचे गाळप होण्यासाठी किमान 2 महिन्याच्या कालावधी लागेल. त्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम राहणारच अशी स्थिती मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. यातच पावसाळा तोंडावर आल्याने या शिल्लक उसाबाबत शेतकऱ्यांच्या मनातही धास्ती निर्माण झाली आहे. क्षेत्र आणि उत्पादन वाढूनही शेतकऱ्यांना त्याचा म्हणावा असा फायदा झालेला नाही.

ऊस शिल्लक तरीही विक्रमी गाळप

यंदा ऊस गाळपाचा हंगाम मोठा रंजक राहिलेला आहे. दरवर्षी शेतकऱ्यांचा ऊस अधिक प्रमाणात गाळप व्हावा यासाठी कारखान्यांमध्ये स्पर्धा असते. यंदा मात्र चित्र उलचे राहिले आहे. नोंदणी असलेल्या ऊसाचे गाळप करुन आता अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम आहे. दरवर्षी 4 महिने सुरु राहणारा गाळपाचा हंगाम यंदा 7 महिने उलटले तरी सुरुच आहे.ऊस शिल्लक याचा अर्थ गाळप कमी असा नाही. कारण यंदा देशात सर्वाधिक गाळप हे महाराष्ट्रात झाले आहे. शिवाय साखर कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप केले आहे. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील 7 साखर कारखान्यांनी 28 लाख मेट्रीक टनाचे गाळप केले आहे.

शिल्लक उसावर आतापर्यंतचे पर्याय

राज्यात शिल्लक उसाचा प्रश्न निर्माण होणार याची चाहूल लागताच प्रशासनाकडून एक ना अनेक पर्याय समोर आणले पण व्हायचे तेच झाले अशीच अवस्था झाली आहे. शिल्लक उसाला घेऊन साखर आयुक्त यांनी संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद करु नयेत असे आदेश काढले. त्यानंतर ज्या साखऱ कारखान्यांचे गाळप पूर्ण जाले आहे त्या कारखान्यांची यंत्रणा इतरत्र वापरावेत, शिवाय अतिरिक्त उसाचा आकडा घेण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. दरम्यान या आकडेवारीवरुन नियोजन करण्यात आले असून आता पश्चिम महाराष्ट्रातील यंत्रणा मराठवाड्यात राबवून अतिरिक्त उसाची दाहकता कमी करण्यााचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

अतिरिक्त ऊस मराठवाड्यातच

पश्चिम महाराष्ट्रात सुरवातीपासून असलेली लागवड आणि यंत्रणा यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवला नाही. पण मराठवाड्यात यंदा ऊसाचे क्षेत्र हे दुपटीने वाढल्याचे गाळपा दरम्यान निदर्शनास आले. त्यामुळे ऐनवेळी नियोजन करताना प्रशासनाची दमछाक तर झालीच पण ऊसाचा प्रश्न कायम राहिला. एकिकडे ऊसाचे गाळप वाढत होते तर दुसरीकडे शिल्लक उसाचा प्रश्न हा सतावत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.