Banana Farming : गांधेलीच्या केळीची चवच न्यारी… शेतकऱ्यांचा निर्धार आता ब्रँड करण्याचा..!
खानदेशात जशा केळीच्या बागा बहरतात अगदी त्याप्रमाणेच गांधेली शिवाराच्या 35 एकरामध्ये बहरत आहेत. आता या बागेतील केळी बाजारात दाखल झाली असून खानदेशातील केळीप्रमाणेच चव असल्याचे औरंगाबादकर सांगत आहेत. तसं पहायला गेलं तर मराठवाड्यात हंगामी पिकांचे उत्पादन पदरी पडणे मुश्किल पण पुणे-धुळे महामार्गाला लागून असलेल्या गांधेली गावच्या शेतकऱ्यांनी हा अनोखा प्रयोग राबवलाही आणि यशस्वीही करुन दाखवला आहे.
औरंगाबाद : केळीचे पिक म्हणले की आपल्यासमोर चित्र उभा राहते ते खानदेशाचे…कारण याच भागामध्ये केळीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते पण (Marathwada,) मराठवाड्याच्या डोंगरदऱ्यामध्ये खानदेशाप्रमाणेच केळीच्या बागा बहरत आहेत असे म्हणल्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही…एकतर पावसामुळे खरिपासह आता रब्बी धोक्यात आहे आणि कुठली आलीय (Banana Garden) केळीची बाग…सध्याच्या परस्थितीनुसार तुम्हाला हे वाटणे साहजिकच आहे. पण खानदेशात जशा केळीच्या बागा बहरतात अगदी त्याप्रमाणेच गांधेली शिवाराच्या 35 एकरामध्ये बहरत आहेत. आता या बागेतील केळी बाजारात दाखल झाली असून खानदेशातील केळीप्रमाणेच चव असल्याचे औरंगाबादकर सांगत आहेत. तसं पहायला गेलं तर मराठवाड्यात हंगामी पिकांचे उत्पादन पदरी पडणे मुश्किल पण पुणे-धुळे महामार्गाला लागून असलेल्या गांधेली गावच्या शेतकऱ्यांनी हा अनोखा प्रयोग राबवलाही (Income Growth,) आणि यशस्वीही करुन दाखवला आहे.
35 एकरावर केळीची बाग, अन् शहरातच बाजारपेठ
औरंगाबाद जिल्ह्यातील गांधेली शिवारात तब्बल 35 एकरामध्ये केळी लागवड करण्यात आली होती. आता केळीची काढणी सुरु असून औरंगाबादकर हे केळीची चव चाखत आहेत. एवढेच नाही तर खानदेशातील केळीप्रमाणेच याचा आकार आणि चवही आहे. केळीचे योग्य व्यवस्थापन अतिवृष्टीच्या दरम्यान नियोजन केल्यानेच हे पिक येथील शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले आहे. शिवाय गांधेली गाव हे पुणे-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर असल्याने शहर जवळ करण्यास शेतकऱ्यांना काही अडचणच नाही. त्यामुळे वाढलेले उत्पादन, दर्जा आणि बाजारपेठ जवळ असल्याने गांधेली येथे लागवड केलेल्या केळीतून शेतकऱ्यांना एकरी अडीच लाखाचे उत्पादन मिळत आहे.
केळी गांधेलीची अन् विकली जातेय खानदेशाची म्हणून
औरंगाबाद शहरातील बाजारपेठेत गांधेलीची केळी दाखल झाली आहे. केळीचा आकार आणि चव यामुळे ही केळी खानदेशातीलच असल्याचा भास ग्राहकांना होत आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. अधिकच्या दरात केळीची विक्री होत आहे. एवढेच नाही तर कच्च्या केळीला देखील मागणी वाढत आहे. आतापर्यंत परराज्यातूनच दाखल झालेल्या केळीचा ग्राहकांनी खरेदी केली होती. पण शहरा जवळच्याच या गावात केळीचे उत्पादन याचा विश्वासही ग्राहकांना बसत नाही.
गांधेली केळीचा ब्रॅंड करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार
गांधेली येथे केळी उत्पादनासाठी सर्वकाही पोषक झाले आहे. केळी तर बहरातच आहे पण बाजारपेठही जवळ आहे. राष्ट्रीय महामार्गाला लागूनचे हे गाव असल्याने येथील शेतकरी स्वत:च औरंगाबाद येथील बाजारपेठ जवळ करुन केळीची विक्री करतात. ही केळी खानदेशची म्हणून विकली जात असली तरी गांधेलीची केळी हा ब्रॅंड निर्माण करण्याचा आमचा निर्धार असल्याचे माजी सरपंच सरदार शेख यांनी सांगितले आहे. शिवाय गाव हे राष्ट्रीय महामार्गावर असल्याने सबंध देशात केळी पाठवणे सहज शक्य असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.