मराठवाड्यातही कृषी पंपाचा वीज प्रश्न पेटला, शेतकऱ्यांना मिळणार का नियमित वीज?

कृषीपंपाना नियमित आणि दिवसा विद्युत पुरवठा व्हावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलन छेडले जात आहे. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातून सुरु झालेल्या आंदोलनाचे लोण आता मराठवाड्यातही पोहचले आहे. संबंध राज्यात महावितरणकडून कृषी पंपाचा विद्युत पुरवठा वाढत्या थकबाकीमुळे खंडीत केला जात आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होत असून ही सक्तीची वीजबिल वसुली बंद करावी तसेच रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन वाढण्यासाठी सुरळीत विद्युत पुरवठा होणे गरजेचे आहे.

मराठवाड्यातही कृषी पंपाचा वीज प्रश्न पेटला, शेतकऱ्यांना मिळणार का नियमित वीज?
कृषीपंपांना 10 तास नियमित विद्युत पुरवठा करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने लातूर जिल्ह्यातील बोरगाव येथे रास्तारोको करण्यात आला होता.
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 12:39 PM

लातूर : (Agricultural Pump) कृषीपंपाना नियमित आणि दिवसा विद्युत पुरवठा व्हावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलन छेडले जात आहे. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातून सुरु झालेल्या आंदोलनाचे लोण आता मराठवाड्यातही पोहचले आहे. संबंध राज्यात (MSEB) महावितरणकडून कृषी पंपाचा (Power Supply) विद्युत पुरवठा वाढत्या थकबाकीमुळे खंडीत केला जात आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होत असून ही सक्तीची वीजबिल वसुली बंद करावी तसेच रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन वाढण्यासाठी सुरळीत विद्युत पुरवठा होणे गरजेचे आहे. सध्या उन्हाचा तडाका वाढत आहे. त्यामुळे वेळेत पाणी मिळाले तरच पिके जोपासली गेली जाणार आहेत. त्यामुळे दिवसभरात किमान 10 तास विद्युत पुरवठा तो ही दिवसा करण्याच्या मागणीसाठी बोरगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता-रोको आंदोलन केले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा

रब्बी हंगामातील पिके ही उपलब्ध पाण्यावरच अवलंबून असतात. जलस्त्रोतातील पाणी पिकांना देण्यासाठी आवश्यकता असते ती विद्युत पुरवठ्याची. मात्र, हंगामाला सुरवात झाली की, कृषीपंपासाठी भारनियमन केले जाते. त्यामुळे नियमित तर पाणी मिळतच नाही पण शेतीसाठी रात्रीचा विद्युत पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत असून महावितरणच्या या भुमिकेमुळेच शेती पिकांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचा हाच प्रश्न घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे प्रशासकीय कामाचा निषेध केला जात आहे.

असे हे आंदोलन, अधिकाऱ्यांची भंबेरी

सध्या कृषीपंपासाठी रात्रीचा विद्युत पुरवठा केला जात आहे. त्यामुळे जंगली प्राण्यांचा सामना करीत जीव मूठीत घेऊन शेतकऱ्यांना रात्री शेतामध्ये मार्गक्रमण करावे लागते. मात्र, याचाच निषेध व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीकाम करताना जर विंचू, साप आढळून आले तर थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सोडण्याचे आदेश राजू शेट्टी यांनी दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात साप सोडल्याचे प्रकार कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यामध्ये घडलेले आहेत.

आंदोलनादरम्यान वाहतूक कोंडी

लातूर जिल्ह्यातील बोरगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्तारोको करण्यात आला होता. बार्शी-लातूर या मुख्यमार्गावर हे आंदोलन केल्याने वाहतूक कोंडी झाली होती. भर सकाळीच हा रास्तारोको केल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती. शेतकऱ्यांना किमान 10 तास विद्युत पुरवठा करावा, दिवसा वीज पुरवठा द्यावा अशा मागण्याचे निवेदन देण्यात आले होते.

संबंधित बातम्या :

Photo Gallery : होळीची चाहूल देणारा पळस भर उन्हामध्ये भगव्या रंगाने बहरला, काय आहे महत्व?

स्वप्न सत्यामध्ये : पाणंद रस्त्याच्या आराखाड्याला मंजुरी, ग्रामपंचायतीची भूमिका राहणार महत्वाची

Cotton : कापूस दरात वाढ, शेतकऱ्यांनी निवडला पुन्हा ‘तो’ पर्याय, फायदा की नुकसान..!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.