Maharashtra Budget 2022 : पंचसूत्री कार्यक्रमात कृषी क्षेत्रासाठी झुकतं माप, काय आहेत तरतूदी?

राज्याचा अर्थसंकल्प हा 5 सूत्रांमध्ये मांडला गेला आहे. यामध्ये सर्वाधिक महत्व हे शेती व्यवसयाला देण्यात आले असून पीक लागवडीपासून ते बाजारपेठपर्यंतच्या योजनांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. सबंध अर्थसंकल्पात ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन येत्या वर्षभरात काय केले जाणार हे सांगितले आहे. अर्थसंकल्पाची सुरवातच शेती या विषयाने झाली असून ठाकरे सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प होता.

Maharashtra Budget 2022 : पंचसूत्री कार्यक्रमात कृषी क्षेत्रासाठी झुकतं माप, काय आहेत तरतूदी?
उपमुख्यमंत्री अजित पवार,
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 5:11 PM

मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प हा 5 सूत्रांमध्ये मांडला गेला आहे. यामध्ये सर्वाधिक महत्व हे (Agricultural) शेती व्यवसयाला देण्यात आले असून पीक लागवडीपासून ते बाजारपेठपर्यंतच्या योजनांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. सबंध अर्थसंकल्पात ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन येत्या वर्षभरात काय केले जाणार हे सांगितले आहे. (Budget) अर्थसंकल्पाची सुरवातच शेती या विषयाने झाली असून ठाकरे (State Government) सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प होता. शेती व्यवसायासाठी महत्वपूर्ण आशा 13 घोषणा करण्यात आल्या आहेत. विकासाची पंचसूत्री-कृषी,आरोग्य,मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित. येत्या तीन वर्षांत 4 लाख कोटी रूपये उपलब्ध करुन देणार. कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी 23 हजार 888 कोटी तरतुद.आरोग्य क्षेत्रासाठी 5 हजार 244 कोटी रुपये तरतुद.मानव व मनुष्यबळ विकासासाठी 46 हजार 667 कोटी तरतुद.पायाभूत सुविधा व वाहतूकीसाठी 28 हजार 605 कोटी तरतुद.उद्योग व उर्जा विभागासाठी 10 हजार 111 कोटीची तरतुद.

शेती व्यवसायासठीच्या या आहेत 13 महत्वपूर्ण तरतूदी

  1. नियमित कर्जफेड करणारे शेतकरी 20 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये अनुदान 10 हजार कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे.
  2. भूविकास बँकेच्या 34 हजार 788 कर्जदार शेतकऱ्यांची 964 कोटी 15 लाख रूपयांची कर्जमाफी, बँकेच्या कर्मचाऱ्यांची 275 कोटी 40 लाख रूपये एवढी देणी अदा करणार.
  3. सोयाबीन व कापूस पिकांसाठी विशेष कृती योजनेसाठी 3 वर्षात 1 हजार कोटी रुपये निधी देण्यात येईल.
  4. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळ्याचा समावेश करून अनुदानाच्या रकमेत 50 टक्के वाढ करुन ते 75 हजार रूपये वाढ .
  5. 306 बाजार समित्यांनी पायाभूत सुविधांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाची 100% परतफेड करण्यासाठी सहाय
  6. किमान आधारभूत किंमतीनुसार शेतमाल खरेदी कर‍िता 6 हजार 952 कोटी रूपयांची तरतूद, कृषी निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य
  7. २0 हजार 761 प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्थांचे (PACS) संगणकीकरण करण्याकरीता 950 कोटी रूपयांची गुंतवणूक
  8. मागील दोन वर्षात 28 सिंचन प्रकल्पात पाणीसाठा करण्यात आला असून येत्या दोन वर्षात 104 प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन
  9. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी सन 2022-23 मधे 853 कोटी 45 लाख रुपये निधी
  10. मृद व जलसंधारणाची दोन वर्षात 4 हजार 885 कामे पूर्ण करण्याचे नियोजन, 4 हजार 774 कोटी रुपये खर्च प्रस्ताव‍ित
  11. सन 2022-23 मधे 60 हजार कृषिपंपांना वीज जोडणीचे उद्दीष्ट.
  12. रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेमधे केळी, ड्रॅगन फ्रुट, एव्हॅकॅडो, द्राक्षे आदी फळ पिके तसेच अन्य महत्त्वाच्या मसाला पिकांचा नव्याने समावेश
  13. देशी गायी, म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकी एक, अशा एकूण तीन मोबाईल प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या :

हायड्रोजेल तंत्रज्ञानामुळे शेतीव्यवसायात अमूलाग्र बदल, सिंचनाचा प्रश्न मार्गी अणखी बरेच काही

शेवटी नुकसानच : धावपळ करुन बाजारपेठ गाठली जे वावरात झालं नाही ते बाजार समितीमध्ये घडलं

Maharashtra Budget Session 2022: ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये बळीराजा केंद्रस्थानी, शेती समृद्धीसाठी अजित पवारांच्या मेगा प्लॅनमधल्या 10 मोठ्या घोषणा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.