Soybean : हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांचा डाव फसला, शेतीमालाच्या दरात घसरण सुरुच
सोयाबीन कितीही दिवस साठवून ठेवले तरी त्याच्या दर्जावर परिणाम होत नाही. त्यामुळे भविष्यात विक्रमी दर मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर दिला आहे. मध्यंतरी 7 हजार 300 दर असताना भविष्यात सोयाबीन 10 हजारवर जातंय अशीच भावना शेतकऱ्यांची झाली. मात्र, केंद्र सरकारची धोरणे आणि प्रक्रिया उद्योजकांकडून घटती मागणी याचा थेट परिणाम सोयाबीनच्या दरावर झाला आहे.
लातूर : (Soybean Crop) सोयाबीनला विक्रमी दर मिळावा यासाठी हंगामाच्या सुरवातीपासूनच शेतकऱ्यांचे प्रयत्न राहिले आहेत. उत्पादन घटले असताना शेतकऱ्यांनी अधिकची आवक होऊ न दिल्याने संपूर्ण हंगामात (Soybean Rate) सोयाबीनचे दर टिकून राहिले आहेत. मात्र, आता अंतिम टप्प्यात लागलेली उतरती कळा थांबता थांबेना झालीय. गेल्या 15 दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घसरण सुरुयं. केवळ सोयाबीनच नाहीतर तूर आणि (Chickpea Crop) हरभऱ्याचीही तीच अवस्था आहे. त्यामुळे हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांचे टायमिंग हुकल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. 7 हजार 300 असलेले सोयाबीन महिन्याभरात 6 हजार 750 वर येऊन ठेपले आहे. विशेष म्हणजे दरात दिवसेंदिवस घटच होत आहे. त्यामुळे साठणवूक केलेल्या सोयाबीनचे करयाचे काय असा सवाल शेतकऱ्यांना पडला आहे.
शेतकऱ्यांकडे साठवणूकीतले सोयाबीन
सोयाबीन कितीही दिवस साठवून ठेवले तरी त्याच्या दर्जावर परिणाम होत नाही. त्यामुळे भविष्यात विक्रमी दर मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर दिला आहे. मध्यंतरी 7 हजार 300 दर असताना भविष्यात सोयाबीन 10 हजारवर जातंय अशीच भावना शेतकऱ्यांची झाली. मात्र, केंद्र सरकारची धोरणे आणि प्रक्रिया उद्योजकांकडून घटती मागणी याचा थेट परिणाम सोयाबीनच्या दरावर झाला आहे. म्हणूनच सध्या 6 हजार 750 असा सोयाबीनला आहे तर तूर आणि हरभऱ्यालाही हमीभावापेक्षा कमीच दर आहे.
दर कमी असतानाही आवक सुरुच
सबंध हंगामात दर असेल तरच सोयाबीन आणि कापसाची विक्री असा निर्णयच जणूकाही शेतकऱ्यांनी घेतला होता. त्यामुळेच विक्रमी दरही मिळाला पण आता सोयाबीन, तूर आणि हरभऱ्याचे दर घसरले असले तरी आवक ही सुरुच आहे. सोयाबीनचा हंगाम अंतिम आहे आणि भविष्यात उन्हाळी सोयाबीनची आवक होणार आहे. त्यामुळे अधिकचा फटका बसण्यापेक्षा आहे त्या किंमतीमध्ये शेतीमाल विकण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. सोयाबीनला 6 हजार 750 रुपये क्विंटल दर असतानाही 20 हजार पोत्यांची आवक सुरु आहे.
आता खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी
राज्यात नाफेडने तूर आणि हरभरा खरेदी केंद्र सुरु केली आहेत. सुरवातीला हमीभाव केंद्रापेक्षा खुल्या बाजारपेठेत तूरीला अधिकचा दर होता. त्यामुळे खरेदी केंद्र ही ओस पडली होती तर आता चित्र उलटे झाले आहे. तुरीला बााजरपेठेत 6 हजार रुपये क्विंटल म्हणजेच हमीभावापेक्षा 300 रुपये कमी दर आहे. त्यामुळे शेतकरी आता खुल्या बाजारपेठेपेक्षा खरेदी केंद्र जवळ करीत आहे. तुरीप्रमाणेच हरभऱ्याची स्थिती आहे. खरेदी केंद्रावरील दर आणि खुल्या बाजारपेठेतील दर यामध्ये जवळपास 900 रुपयांची तफावत असल्याने शेतकरी खरेदी केंद्राचाच आधार घेऊ लागला आहे.