कांदा उत्पादकांचे योग्य टाईमिंग, साठवलेल्या कांद्यातून शेतकऱ्यांची चांदी

शेतकऱ्यांच्या या चालाकीमुळे साठवूण करुन ठेवलेल्या कांद्याला योग्य दर मिळालेला आहे. पावसामुळे यंदा दक्षिणेकडील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमधून नवीन लाल कांदा उशिराने बाजारात दाखल होणार आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यातील तफावत लक्षात घेता शेतकऱ्यांनी साठवूण ठेवलेला उन्हाळ कांदा बाजारात आणला आहे. या कांद्याला एक दिवसाच्या फरकाने चक्क क्विंटलमागे 230 रुपये वाढवून मिळाले आहेत.

कांदा उत्पादकांचे योग्य टाईमिंग, साठवलेल्या कांद्यातून शेतकऱ्यांची चांदी
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 7:26 PM

नाशिक : (Nashik) उत्पादना बरोबरच शेतकऱ्यांसाठी बाजारभावाचा अभ्यास देखील महत्वाचा आहे. बाजारात योग्य वेळी शेतीमाल दाखल केल्यास त्याचा कसा फायदा होतो हे कांदा (Onion) उत्पादकांनी दाखवून दिले आहे. शेतकऱ्यांच्या या चालाकीमुळे साठवूण करुन ठेवलेल्या कांद्याला योग्य दर मिळालेला आहे. पावसामुळे यंदा दक्षिणेकडील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमधून नवीन लाल कांदा उशिराने बाजारात दाखल होणार आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यातील तफावत लक्षात घेता शेतकऱ्यांनी साठवूण ठेवलेला उन्हाळ कांदा बाजारात आणला आहे. या कांद्याला एक दिवसाच्या फरकाने चक्क क्विंटलमागे 230 रुपये वाढवून मिळाले आहेत.

कांद्यासाठी नाशिकची बाजारपेठ ही प्रसिध्द आहे. राज्यातूनच नव्हे तर आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतूनही कांद्याची आवक होत असते. यंदा मात्र पावसामुळे सर्वच शेतीमालाचे गणित बिघडले आहे. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातून लाल कांद्याची आवक ही आतापर्यंत सुरु झालेली असते. यंदा मात्र, पावसामुळे हा लाल कांदा बाजारात अद्यापही दाखल झालेला नाही. त्यामुळे पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढलेली आहे. ही तफावत लक्षात घेता आता राज्यातील कांदा उत्पादकांनी कांदा चाळीत साठवलेला कांदा बाजारात आणण्यास सुरवात केली आहे.

मागणी जास्त असल्याने एकाच दिवसाच्या फरकाने शेतकऱ्यांना 230 रुपये अधिकचे मिळाले आहेत. शेतकऱ्यांच्या कांद्याला 2120 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. 29 जुलै रोजी उन्हाळ कांदा 2020 होता त्यानंतर कांद्याच्या बाजार भावात घसरण झाली. आज पावणे दोन महिन्यानंतर पुन्हा उन्हाळ कांदा लासलगाव बाजर समिती दोन हजार रुपये पार झाला आहे. आज लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समिती 911 वाहनातून 14 हजार 076 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली होती. त्याला कमाल 2,120 रुपये ,किमान 800 रुपये तर सर्वसाधारण 1,980 रुपये इतका प्रतिक्विंटल ला बाजार भाव मिळाला आहे.

कांदा साठवणुकीचा शेतकऱ्यांना फायदा

योग्य दर मिळला नाही तर शेतकरी हे कांद्याची साठवणूक हे कांदा चाळीत करुन ठेवतात. दरवर्षीप्रमाणे नाशिकसह राज्यातील उत्पादकांना कांद्याची साठवणूक करुन ठेवली होती. दरवर्षी आगोदर आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथील लाल कांदा बाजारात येतो आणि याच कांद्याला अधिकचा दरही मिळतो. यंदा मात्र, पावसामुळे या राज्यातील कांदा नाशिकच्या बाजारात दाखल होऊ शकला नाही. त्याचाच फायदा राज्यातील शेतकऱ्यांना झाला आहे. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला कांदा बाजारात आणल्याने वाढीव दर मिळाला आहे.

25 क्विंटल कांद्याचे 78 हजार रुपये

दरेगाव येथील कौतिक जाधव यांना 25 क्विंटल 40 किलो कांदा हा दोन एकरामध्ये झाला होता. शिवाय काढणीच्या प्रसंगी पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले होते. मात्र, चांगल्या अवस्थेतील कांद्याला 3131 रुपयांचा दर मिळाला. हा मुहुर्ताचा दर असला तरी चांगल्या प्रतिच्या कांद्याला दर कायम राहणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे. या काद्यातूनच जाधव यांना 78 हजार रुपये पदरी पडलेले आहेत.

शेतकऱ्यांमध्ये समाधान

पावसामुळे इतर पिकाचे नुकसान झाले असले तरी साठवलेल्या कांद्याने शेतकऱ्यांना तारलेले आहे. खरिपासह या भागातील फळबागांचे नुकसान झाले असताना कधी ग्राहकंच्या तर कधी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणले हे खरयं. In the onion market at the right time, Farmers get fair compensation in Nashik market,

संबंधित बातम्या :

पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली, शेतकऱ्यांचा माल, व्यापाऱ्यांना फायदा

लाल कांद्याची दोन आठवडे आगोदरच बाजारात एंन्ट्री, दरही

भाजीपाल्याचे उत्पादन 60 दिवसांच्या आत पदरात, भरघोस कमाईही

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.