खरीप पुर्व हंगामातील कांदाही येणार बाजारात, दरावर काय होणार परिणाम?

कांद्याची आवक त्यात आता खरीप पुर्व हंगामातील कांदा आता बाजारात दाखल होत आहे. त्याआगोदरच पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याला विक्रमी दर मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये कमाल दर हा 4400 प्रति क्विंटलवर पोहचला आहे तर किमान भाव 1600 व सर्वसाधारण दर हा 2400 रुपये राहिलेला आहे.

खरीप पुर्व हंगामातील कांदाही येणार बाजारात, दरावर काय होणार परिणाम?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 5:46 PM

नाशिक : कांद्याची आवक त्यात आता (pre-kharif onion) खरीप पुर्व हंगामातील (Onion) कांदा आता बाजारात दाखल होत आहे. त्याआगोदरच पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याला विक्रमी दर मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये कमाल दर हा 4400 प्रति क्विंटलवर पोहचला आहे तर किमान भाव 1600 व सर्वसाधारण दर हा 2400 रुपये राहिलेला आहे. असे असले तरी सर्वात मोठी बाजारसमिती असलेल्या लासलगावमध्ये 13 नोव्हेंबर रोजी 2575 असा दर होता. यातच आता खरीप पुर्व हंगामातील कांदा पुढील आठवड्यात बाजारात येणार असल्याने दरावर काय परिणाम होणार का याबाबत चर्चा रंगू लागली आहे.

पिंपळगाव आणि लासलगावच्या दरात एवढ्या मोठ्या प्रमाणात तफावत कशी असा सवाल तुम्हाला पडला असेल मात्र, या बाजार समितीमध्ये दाखल होणारा कांदा हा बियाणे तयार करण्यासाठी वापरला जात असल्याने त्याचे दर कायम चढेच असल्याचे मत महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी व्यक्त केले आहे.

आवकमध्ये का होत आहे वाढ

कांद्याची आवक ही वाढलेली आहे. त्यामुळे दरात घट झाली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला 1 ते 2 हजाराचा दर मिळत आहे. मात्र, शेतकऱ्यांचा उत्पादनावर 2 हजारापर्यंत खर्च झालेला आहे. उत्पादनावरील खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना 30 ते 35 रुपये किलेप्रमाणे दर मिळाला तरच फायद्याचे राहणार आहे. मात्र, आता कांद्याची आयात शिवाय पुर्व खरिपात लागवड केलेला कांदा हा बाजारात येत असल्याने अणखीन दर घसरणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यातच दिवाळीमुळे बाजार समित्या ह्या बंद असल्याने आता आवक वाढत आहे. या सर्व बाबींचा दरावर परिणाम होणार आहे.

पुर्व खरीप कांद्याचा दरावर परिणाम होणार नाही : दिघोळे

कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी 65 टक्के कांदा हा रब्बी हंगामात लागवड केलेला असतो. खऱीप हंगामातील केवळ 15 टक्केच कांदा आता बाजारात येणार आहे. शिवाय पावसामुळे या कांद्याचे नुकसानही झालेले आहे. त्यामुळे खरीप पुर्व हंगामातील कांद्याची आवक सुरु होईल पण त्याचे प्रमाण हे कमी असणार आहे. शिवाय हा कांदा केवळ बियाणासाठी वापरला जातो. त्यामुळे याचा ग्राहक हा मर्यादित आहे. या सर्व बाबींमुळे कांद्याच्या दरावर याचा थेट परिणाम होणार नसल्याचे मत महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी व्यक्त केले आहे. व्यापाऱ्यांची लॉबी इतकी मजबूत आहे की त्यांना त्यांचे स्वार्थ दिसते आणि किंमत कमी होते. म्हणून आमच्या संस्थेचे स्वतंत्र विपणन नेटवर्क तयार करायचे असल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन केव्हा घेतले जाते

1. रब्बी हंगाम : या हंगामातील कांदा पेरणी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होते आणि ती जानेवारीपर्यंत चालते. या हंगामातील कांदा फेब्रुवारी ते एप्रिलच्या दरम्यान बाजारात येतो.

2. पुर्व खरीप : जून-जुलैमध्ये लागवड केली जाते. हे पीक नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात येते.

3. खरीप हंगाम : ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये त्याचा कांदा पेरला जातो. तर पीक डिसेंबर ते जानेवारी दरम्यान येते.

संबंधित बातम्या :

किसान क्रेडिट कार्डची वाढली व्याप्ती, मत्स्यव्यवसाय अन् पशुसंवर्धनासाठीही केंद्र सरकारचे राष्ट्रीय अभियान

सकारात्मक : सोयाबीनच्या दरात वाढ, शेतकऱ्यांचा मात्र सावध भूमिका

बंगळुरातल्या कृषी मेळाव्यात दांडग्या ‘कृष्णा’ची कमाल, 1 कोटींच्या बोलीने मालक मालामाल, देशी गोवंशाची किंमत डोकं चक्रावणारी!

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.