Central Government: खरिप पिकांच्या आधारभूत किंमतीमध्ये वाढ, सरकारचा उद्देश साध्य अन् शेतकऱ्यांनाही होणार फायदा

वाढत्या आधारभूत किंमतीमुळे शेतकऱ्यांना तर आर्थिक फायदा होणारच आहे पण सरकारही त्याचा उद्देश साध्य करणार आहे. या नव्या दरवाढीमुळे तेलबियांच्या क्षेत्रात वाढ झाली तर जे खाद्यतेल सरकारला आयात करावे लागणार आहे त्यामध्ये घट होण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न शिवाय सरकारचा उद्देश साध्य व्हावा असे धोरण आधारभूत किंमतीच्या दराबाबत ठरविण्यात आले आहे.

Central Government: खरिप पिकांच्या आधारभूत किंमतीमध्ये वाढ, सरकारचा उद्देश साध्य अन् शेतकऱ्यांनाही होणार फायदा
खरीप हंगामातील पिकांच्या आधारभूत किंंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 5:37 PM

मुंबई :  (Agricultural Sector) कृषी क्षेत्राला चालना देणारा निर्णय (Central Government) केंद्राने बुधवारी घेतला असून याचे दुरगामी परिणाम होणार आहे. खरीप हंगामातील तब्बल 14 पिकांची आधारभूत किंमत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये सरकारने भर दिला आहे तो तेलबियांवरती. अन्न-धान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला असला तरी (Edible oil) खाद्यतेलाची आयात दिवसेंदिवस वाढत आहे. तेलबियांचे उत्पादन होत असले तरी यामध्ये म्हणावी अशी वाढ नसल्याने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करुन तेलबियांचे क्षेत्र वाढवण्याचा निर्धार सरकारचा आहे. सरकारने ज्या पिकांच्या आधारभूत किंमती वाढवल्या आहेत त्यामध्ये तेलबियांचा तर समावेश आहेच पण हवामानावरन आधारित असलेले अन्नधान्य यामध्ये ज्वारी आणि मूग डाळीचा समावेश आहे. तर दुसरीकडे धान पिकाचा हमीभाव हा प्रति क्विंटल 2 हजार 40 रुपये करण्यात आला आहे. यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत केवळ 5 टक्क्यांनी वाढ कऱण्यात आली आहे.

तेलबियांचे वाढणार क्षेत्र

वाढत्या आधारभूत किंमतीमुळे शेतकऱ्यांना तर आर्थिक फायदा होणारच आहे पण सरकारही त्याचा उद्देश साध्य करणार आहे. या नव्या दरवाढीमुळे तेलबियांच्या क्षेत्रात वाढ झाली तर जे खाद्यतेल सरकारला आयात करावे लागणार आहे त्यामध्ये घट होण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न शिवाय सरकारचा उद्देश साध्य व्हावा असे धोरण आधारभूत किंमतीच्या दराबाबत ठरविण्यात आले आहे. सध्या युक्रेन आणि रशियाच्या युध्दजन्य परस्थितीमुळे सुर्यफूल तेलाचा पुरवठा खोळंबलेला असून याचा सर्वाधिक परिणाम भारतामध्ये होणाऱ्या पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळेच सोयाबीनच्या एमएसपीमध्ये 8.8 टक्के तर सुर्यफूलाच्या आधारभूत किंमतीमध्ये 6.4 टक्के अशी वाढ करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

म्हणून अन्नधान्याच्या आधारभूत किंमतीमध्ये कमी वाढ

तेलबियांच्या तुलनेत पावसावर अवलंबून असलेल्या अन्नधान्याच्या आधारभूत किंमतीमध्ये म्हणावे त्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली नाही. त्याला कारणही तसेच. इतर तेलबियांमधून उत्पादनापेक्षा खर्च अधिक आणि ही पिके निसर्गाच्या लहरीपणाचा बळी ठरतात. मात्र, अन्नधान्यात असलेल्या बाजरी पिकातून खर्चाच्या तुलनेत सर्वाधिक परतावाही मिळतो. पंजाब हरियाणा आणि उत्तरप्रदेशातील भागामध्ये कमी पर्जन्यमान असलेल्या भागात या पिकाचे उत्पादन घेतले जाते.

अर्थसंकल्पातील घोषणेच्या अनुशंगाने पूर्तताच !

पिकांच्या आधारभूत किंमतीवर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळणार आहे. याच आधारभूत किंमतीवर खुल्या मार्केटमधील दरही ठरणार आहे. त्यामुळे तेलबियांच्या आधारभूत किंमतीमध्ये झालेली वाढ ही शेतीमालाच्या दराला दिशादर्शक ठरणार आहे. यामधून शेतकऱ्यांना सरासरी दरापेक्षा अधिकचा दर तर मिळणारच आहे पण सरकारची ही घोषणा म्हणजे 2018-19 अर्थसंकल्पात दिलेल्या वचनाला कटीबध्द असल्यासारखी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करुन खाद्यतेलाचे उत्पादन वाढविण्याचा सरकारचा मानस आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.