Nashik : तोडणीला आलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी, कारखान्याची टाळाटाळ अन् महावितरणच्या मनमानीचा शिकार ठरतोय शेतकरी

अतिरिक्त ऊसाचा प्रश्न केवळ मराठवाड्यातच नाही तर उत्तर महाराष्ट्रामध्येही आहे. यामुळे शेतकरी त्रस्त असतानाच महावितरणच्या मनमानी कराभारामुळे उसाच्या फडाला आगीच्या घटनांमध्ये यंदा वाढ झाली आहे. दोन दिवसांवर ऊस तोडणी असताना इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द येथील शिवारात शॉर्टसर्किटमुळे तब्बल 5 एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. शिवाय शेतकरी रामनाथ शिंदे यांनी ऊस तोडणीसाठी कारखान्याकडे आणि लोंबत्या विद्युत तारांचा बदोबस्त करण्यासाठी महावितरणचेही उंबरटे जिझवले होते.

Nashik : तोडणीला आलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी, कारखान्याची टाळाटाळ अन् महावितरणच्या मनमानीचा शिकार ठरतोय शेतकरी
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द येथील शिवारात शॉर्टसर्किटमुळे तब्बल 5 एकर ऊस जळून खाक Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 10:43 AM

नाशिक : (Excess Sugarcane) अतिरिक्त ऊसाचा प्रश्न केवळ मराठवाड्यातच नाही तर उत्तर महाराष्ट्रामध्येही आहे. यामुळे शेतकरी त्रस्त असतानाच महावितरणच्या मनमानी कराभारामुळे (Sugarcane) उसाच्या फडाला आगीच्या घटनांमध्ये यंदा वाढ झाली आहे. दोन दिवसांवर ऊस तोडणी असताना (Igatpuri) इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द येथील शिवारात शॉर्टसर्किटमुळे तब्बल 5 एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. शिवाय शेतकरी रामनाथ शिंदे यांनी ऊस तोडणीसाठी कारखान्याकडे आणि लोंबत्या विद्युत तारांचा बदोबस्त करण्यासाठी महावितरणचेही उंबरटे जिझवले होते. मात्र, कार्यालयांच्या या दुर्लक्षामुळे त्यांच्या 5 एकरातील उसाची राखरांगोळी झाली आहे. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होत आहे. ऊस हे भरवश्याचे पीक असताना कारखान्यांचा कारभाराचा परिणाम या पिकावरही झाला आहे.

शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग

इगतपुरी तालुक्यातील घोटी खु. शिवारातील दारणा धरणालगतच्या आपल्या शेत गट नंबर 165, 166, 168, 172(1) (2) मध्ये 7 एकर उसाची लागवड केली होती. शेतातून गेलेल्या वीज तारांमध्ये मोठ्या प्रमाणावर झोळ पडल्याने हवेची झुळूक आली तरी या तारांचे घर्षण होत होते. याचा संभाव्या धोका लक्षात घेता वीजतारा ताणून घेण्याची मागणी शेतकरी शिंदे यांनी महावितरणकडे केली होती. अनेकवेळा वीज वितरणला याबाबत माहिती देऊनही त्यांच्याकडून कुठलिही दखल न घेतल्याने अखेर या आगीच्या घटनेत त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका बसल्याची तीव्र भावना शेतकरी शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

दोन दिवसामध्ये होणार होती उसाची तोड

कारखान्याचे सभासद असूनही रामनाथ शिंदे यांच्या उसाची तोड होत नव्हती. कार्यक्रमात असूनही संगमनेर व अकोला येथील साखर कारखान्याचे ऊसतोड कामगारांकडून ऊसतोडही केली जात नव्हती. त्यामुळे त्रस्त शिंदे यांनी कारखान्याला निवेदन देऊन लवकरात-लवकर उसतोड करण्याची मागणी केली होती. लेखी निवेदन दिल्याने 2 ते 3 दिवसांमध्ये उसतोड केली जाणार असल्याचे आश्वासन कारखाना प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यामुळे शिंदेही समाधानी होते. पण महावितरणने असा काय शॉक त्यांना दिला आहे की, पाच एकरातील ऊस त्यांच्या डोळ्यादेखत जळाला आहे. त्यामुळे शासनाने त्वरित दखल घेत नुकसानभरपाई मिळवून देण्याची मागणी त्यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

अशी मिळवा महावितरणकडून मदत

महावितरणच्या गलथान कारभारामुळे ऊस जळाला असेल तर शेतकऱ्याला महावितरणच्या विभागीय कार्यालयात संबंधित कागदपत्रे ही अर्जासोबत जमा करावी लागतात. यामध्ये मागील तीन वर्षाचा सातबारा उतारा, महसूल विभागाचा आणि पोलीसांनी केलेला पंचनामा, किती क्षेत्रावरील ऊस जळाला आहे त्याचे फोटो, ऊसाबरोबरच त्या क्षेत्रातील ठिंबक किंवा पाणीपुरवठा करणारे इतर साहित्य हे या घटनेत जळाले असेल तर त्याचे बील. तर साखर कारखान्यांची मागच्या तीन वर्षांची बीलंही अर्जासोबत जोडावी लागणार आहेत.

संबंधित बातम्या :

Turmeric Crop: अवकाळीच्या धास्तीने रखरखत्या उन्हात जगाचा पोशिंदा राबतोय, हळदीच्या विक्रमी दरासाठी धडपडतोय

Vegetable Rate: भाजीपाल्याची उत्पादनावर वाढत्या उन्हाचा परिणाम, आवक घटल्यानंतर काय आहे दराचे चित्र?

Summer Crop : उन्हाळी सोयाबीनचा शेवटचा महिना, योग्य व्यवस्थापनामुळे उत्पादनात होईल वाढ

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.