काय सांगता? शास्त्रीय संगीत ऐकूण गायीच्या दूध उत्पादनात वाढ, तरुण शेतकऱ्याचा अनोखा अंदाज
दूधाचे उत्पादन वाढवायचे असेल तर आपण हिरवा चारा किंवा पेंड, कळणा या पशूंच्या खाद्यामध्ये वाढ करतो. त्यामुळे दूधाच्या उत्पादनात काही प्रमाणात वाढही होईल मात्र, दुभत्या जनावराने जर शास्त्रीय संगीत ऐकूण उत्पादनात वाढ होत असल्याचे सांगितले तर ते खरे वाटणार नाही. पण एका तुर्की शेतकऱ्याने हा प्रयोग केला आहे.
मुंबई : (Milk Production) दूधाचे उत्पादन वाढवायचे असेल तर आपण हिरवा चारा किंवा पेंड, कळणा या पशूंच्या खाद्यामध्ये वाढ करतो. त्यामुळे दूधाच्या उत्पादनात काही प्रमाणात वाढही होईल मात्र, दुभत्या जनावराने जर (Classical Music) शास्त्रीय संगीत ऐकले अन् उत्पादनात वाढ होत असल्याचे सांगितले तर ते खरे वाटणार नाही. पण एका (Turki Farmer) तुर्की शेतकऱ्याने हा प्रयोग केला आहे. हे अभासी वास्तव असले तरी या अनोख्या पध्दतीचा त्याला फायदा झाला असल्याचे त्याने सांगितले आहे. आतापर्यंत दूध उत्पादन वाढवण्यासाठी हिरव्या चाऱ्यावर भर देण्याचा सल्ला अनेकवेळा शेतकऱ्यांच्या कानी पडला असले पण या तुरुणाने चक्क दुभत्या गायींना हेडफोन लावून शास्त्रीय संगीत ऐकण्यास लावले आहे. तुर्की येथील हा शेतकरी असून त्याचे नाव इज्जत कोकॅक असे आहे.
100 गायींची जोपासाना, दिवसाला हजारो लिटर दूध
तुर्की येथील इज्जत याने 100 गायी जोपासल्या आहेत. एक गायीचे दिवसाला साधारण: 22 लिटर दूधाचे उत्पादन होते. मात्र, दुभत्या जनावरांनी जेव्हापासून शास्त्रीय संगीत ऐकण्यास सुरवात केली तेव्हापासून उत्पादनात वाढ झाली आहे. ते थोडी नाही 5 लिटरने. आता गायी दिवसाला 27 लिटर दूध देत असल्याचा दावा त्याने केला आहे.
A Turkish farmer wanted to increase the amount of milk his cows produce and has taken the unusual route of virtual reality headsets and classical music ? pic.twitter.com/yuJ0HPKvxi
— Al Jazeera English (@AJEnglish) February 12, 2022
काय आहे तरुणाचा दावा?
शास्त्रीय संगीत भावनिकदृष्ट्या हे जनावरांसाठी चांगले आहे. ज्यावेळी जनावरे मनाने प्रसंन्न असतात त्यावेळी ते अधिकचेही दूधही देतात. एवढेच नाही तर दूधाचा दर्जाही ही दरम्यान सुधारला असल्याचे तरुण शेतकऱ्याने सांगितले आहे. माझ्या गायी ह्या क्लासिकल संगीत ऐकतात. त्यामुळे त्या प्रसन्न आणि शांत असतात. त्यामुळेच दूध उत्पादनात वाढ झाली आहे. हे अवास्तव वाटत असले तरी हा माझा अनुभव असल्याचे इज्जत या शेतकऱ्याने बनवलेल्या व्हिडीओमध्ये सांगितलेले आहे.
दावणीत चारा आणि गायींना हेडफोन
तुर्की तरुण शेतकऱ्यांना 100 गायींना घेऊन दूध व्यवसाय सुरु केला आहे. एका गायीचे दिवसाला 22 लिटर दूधाचे उत्पादन आहे. असे असताना गायींनी क्लासिकल संगीत एकल्याने दूध उत्पादनात 5 लिटरने वाढ झाली आहे. दावणीत चारा आणि गायींना हेडफोन असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
संबंधित बातम्या :
Photo: ऐकावे ते नवलच: महावितरणचे कर्मचारी समोर असताना शॉर्टसर्किटने ऊसाच्या फडाला आग
Rabbi Season: अवकाळी अन् अतिवृष्टीच्या संकटानंतर बहरली रब्बी पिके, खरिपातील नुकसान भरुन निघणार का?
Banana Rate: सर्वकाही नियोजनाप्रमाणे, वातावरण निवळले, केळीची आवक सुधारली अन्…