कापूस खरेदीला दारोदारी फिरत आहेत व्यापारी, दर वाढले पण उत्पादन घटले

कापसाचे वाढते दर हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. दिवसागणिस कापसाच्या दरात वाढ होत आहे. मागणीत वाढ आणि पुवरठा मर्यादित असल्याने भविष्यातही कापसाला दर कायम राहिल असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, यंदा वातावरणातील बदल आणि अतिवृष्टीमुळे कापसाचे नुकसानच अधिक झाले. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. मागणीच्या तुलनेत निम्म्यानेही पुरवठा नसल्याने आता लहान-मोठे व्यापारी थेट गावात येऊन कापसाची विचारपूस करीत आहेत.

कापूस खरेदीला दारोदारी फिरत आहेत व्यापारी, दर वाढले पण उत्पादन घटले
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 4:33 PM

धुळे : कापसाचे वाढते दर हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. दिवसागणिस कापसाच्या (Cotton rate) दरात वाढ होत आहे. मागणीत वाढ आणि पुवरठा मर्यादित असल्याने भविष्यातही कापसाला दर कायम राहिल असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, यंदा वातावरणातील बदल आणि अतिवृष्टीमुळे कापसाचे नुकसानच अधिक झाले. (cotton production decreased) त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. (Demand for cotton) मागणीच्या तुलनेत निम्म्यानेही पुरवठा नसल्याने आता लहान-मोठे व्यापारी थेट गावात येऊन कापसाची विचारपूस करीत आहेत. वाढत्या मागणीमुळे कापसाला उच्चांकी दर मिळालेला आहे. याप्रमाणेच मागणी राहिली तर शेतकरी सांगेल त्या किमतीमध्ये कापसाची विक्री देखील होईल पण दर वाढूनही उत्पादनच घटल्याने काय विकावे हा प्रश्न आहे.

खानदेशात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा मात्र, अनेक भागात कापसाला डावलून सोयाबीनचे उत्पादन घेतले होते. तर कापसाची पेरणी होताच पावसाने उघडीप दिली होती. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच पावसाचे आगमन झाले आणि कापसाला जीवदान मिळाले. मात्र, अंतिम टप्प्यात व्हायचे तेच झाले. अतिवृष्टीमुळे कापसाचे प्रचंड नुकसान झाले तर वातावरणातील बदलामुळे उत्पादनही घटले.

व्यापारी दारोदारी

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला चांगली मागणी असल्याने स्थानिक पातळीवरही कधी नव्हे ते 9 हजाराचा दर मिळत आहे. मात्र, पावसाने उत्पादनात मोठी घट झाली आहे. शिवाय लागवडीपासून तोडणीपर्यंत अमाप खर्च झाल्याने चांगला दर मिळाल्याशिवाय विक्री करायची नाही या भूमिकेत कापूस उत्पादक आहेत. मात्र, मागणी अधिक असल्याने व्यापारी लहान-मोठे वाहन घेऊन थेट खेडेगावे जवळ करीत आहेत. व्यापारी थेट दारात येऊन देखील आवक होत नाही. एकतर उत्पादनात घट झाली आहे तर ज्यांच्याकडे कापसाचे पिक पदरी पडले आहे. त्यांना अधिकच्या दराची अपेक्षा आहे. त्यामुळे दारोदारी फिरणाऱ्या व्यापाऱ्यांनाही रिकामी वाहने घेऊन परतावे लागत आहे.

यंदा उच्चांकी दर मिळण्याची अपेक्षा

सध्या खरेदी केंद्रावर कापसाला 8500 ते 9000 हजाराचा दर मिळत आहे. असे असतानाही कापसाची आवक ही कमीच आहे. जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांना 9 हजाराच्या दराची अपेक्षा होती. मात्र, अपेक्षेपेक्षा कमी कालावधीत कापसाचे दर वाढले आहेत. त्यामुळे भविष्यात अणखिन दर वाढतील याचे वेध कापूस उत्पादकांना लागलेले आहेत. त्यामुळे दर वाढूनही आवक नसल्याचे चित्र बाजारपेठेत आहे. यंदा कापसाला 11 हजाराचा दर मिळेल असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. त्यामुळे उत्पादक विक्रीकडे पाठ फिरवत आहेत.

दिवसागणिस दरात तफावत

गेल्या आठ दिवसांपासून कापसाच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे दोन महिन्यापूर्वी 5 हजार 200 रुपये क्विंटल असलेला कापूस आज 9 हजारावर गेला आहे. यापूर्वी दोन शेतकऱ्यांकडून जरी कापसाची खरेदी केली तरी ट्रक भरत असत. पण आता गावभर फिरुनही भरती होत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे. त्यामुळे भविष्यात दर वाढले तर शेतकऱ्यांचाच फायदा आहे. मात्र, दर वाढले म्हणून जर आवक वाढली तर त्याचे वेगळे परिणामही होतील.

संबंधित बातम्या :

आठ दिवसाचीच रब्बी, अवकाळी पावसाचा परिणाम उगवणीवर, दुबार पेरणीची नामुष्की

कडवट कारल्यात औषधी गुणधर्म, शेतकऱ्यांना भरघोस उत्पान्नाचीही संधी

…म्हणून सोयाबीनची घटत आहे आवक, लातूर बाजार समितीमध्ये केवळ 8 हजार क्विंटलची आवक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.